थंडीत बाळाचे कपडे
बर्याच वेळा बाळाला थंडी वाजेल म्हणून
स्त्रिया त्याला जाड कपडे घालतात, मात्र या
कपड्यांमुळेही त्यांना त्रास होऊ शकतो.
त्यांच्या अंगावर हिट रॅशेस येऊ
शकतात. त्यामुळे बाळाला जाड कपडे
घालण्याऐवजी लोकरीचे किंवा उबदार कपडे
घालावेत. त्यामुळे त्यांच्या त्वचेला कोणतीही
इजा पोहोचत नाही.
पावाच्या वड्या
पावाच्या वड्या

साहित्य : पाव तीन तुकडे, खवा
पाव कप, पिठी साखर दोन टेबलस्पून, तूप
तळण्यासाठी अर्धा कप, चार दाणे वेलदोडे.
कृती : पावाच्या कडा काढून त्याचे
एकेक इंचाचे चौकोनी तुकडे करावेत. खवा
परतून त्यात पिठीसाखर एकत्र करावी. पाव
मंद विस्तवावर तेलात गुलाबी तळावे. त्या
प्रत्येकावर साखर मिसळलेला खवा लावून
त्याच्यावर मधोमध एकेक वेलदोड्याचा दाणा
दाबून बसवावा. खवा नसल्यास साखर व
खोबरे शिजवून त्याचा थर द्यावा किंवा तीळ
भिजवून त्यात साखर घालून शिजवून ते
सारण लावावे. पावाचे तुकडे निरनिराळ्या
आकाराचे कापावेत. सारणातही वेगवेगळे
इसेन्स घालावेत.
ऑईली त्वचेसाठी
ऑईली त्वचेसाठी
* अशा त्वचेतील तेलग्रंथीतून बाहेर
पडणार्या तेलामुळे मुरमे व टॅनिंगचा धोका
असतो. तो टाळण्यासाठी चंदन पावडरमध्ये
थोडीशी तुळशीची पाने व गुलाबपाणी मिसळून
चेहर्यावर लावावे व वाळल्यानंतर धुवावे.
या मास्कने त्वचा तुकतुकीत होते व रोमछिद्रे
बंद होतात.
* अर्धा चमचा मध आणि चार चमचे
दही एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही
पेस्ट, चेहरा, हातापयांना चोळून लावावी व
१५ मिनिटांनी स्नान करावे. त्वचा तजेलदार
व उजळ होईल.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. १८ जून २०२४
निर्जला एकादशी, शके १९४६ क्रोधीनाम संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, स्वाती १५|५६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे
सफल होतील. संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शयता.
वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न
करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. कौटुंबिक चिंता दूर होईल. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.
मिथुन : दूर किंवा विदेशात असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. आय पेक्षा व्यय
अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता.
कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करणार्यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल.व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात.
सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम करायला उत्साह वाटणार नाही. कार्यात
अडचणी येण्याची शयता आहे. प्रवासाचे योग संभवतात.
कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल.
तूळ : आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून
दूर राहणच आज फायदेशीर होईल. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल.
वृश्चिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल.आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.
धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा-वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धन आणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
मकर : हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना
प्रेरणा मिळेल. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील.
कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे. कामात
सांभाळूनच पुढे चला. कोर्ट कचेरीपासून दूरच राहा.
मीन : राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. भागीदाराबरोबर सुद्धा
मतभेद होऊ शकतात. वाहने व उपकरणे जपून चालवा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
हसा आणि शतायुषी व्हा!
एक छोटा मुलगा रोज गणपतीची पूजा करीत होता. एके दिवशी
गणपती खूश होऊन म्हणाले, ‘बोल काय पाहिजे तुला?’
छोटा मुलगा ः ‘मारुती कार.’
गणपती बाप्पा ः ‘हे नाही जमणार, जिथे मीच नेहमी उंदरावर
बसून बुद्धि देण्याचे कार्य करीत फिरतो तर तुला मी मारुती कार
कुठून देणार?’ कार मागणारे सहकार सोडून बहुतेक सरकारमध्ये
जातात. (म्हणून तू मला बुद्धी माग, बुद्धीनेच सर्वकाही मिळते.)
श्वासोच्छ्वास चालू असताना छाती व पोट वरखाली का होते?
श्वासोच्छ्वास चालू असताना छाती व पोट वरखाली का होते?
श्वासोच्छ्वास चालू असताना छाती व पोट वरखाली होते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. श्वसनाचा दर देखील डॉटर या पोट व छाती वरखाली होण्यानुसारच सामान्यतः मोजतात. फुफ्फुसाचा श्वसनाशी संबंध आहे, हे आपण जाणताच. त्यामुळे श्वसनात छाती हलणे स्वाभाविकच आहे, असे आपल्याला वाटेल; पण पोट का वरखाली होते, मात्र हे थोडे अनाकलनीय वाटेल. हे समजण्यासाठी प्रथम पोट व छाती यांची रचना बघायला लागेल. पोट व छाती यांचे विभाजन करणारा नावाचा एक आडवा पडद्यासारखा पसरलेला स्नायू असतो. (ऊळरहिीरसा) स्नायूचा पडदा एखाद्या घुमटाप्रमाणे असतो. त्याच्या वरच्या बाजूस छातीतील फुफ्फुसे, हृदय इत्यादी असतात; तर खालच्या बाजूस पोटातील जठर, आतडी, यकृत इत्यादी इंद्रिये असतात. आपण श्वास घेतो म्हणजे काय, हे समजण्यासाठी फुटलेल्या फुग्याचा एक तुकडा तोंडात घेऊन हवा आत ओढा. ओढल्यावर त्यात हवा गोळा होते व एक लहानसा फुगा तयार होऊ शकतो. फुग्यात हवा फुंकली तरीही फुगा फुटतो. फुफ्फुस हा एक प्रकारचा फुगाच असतो. त्यात एक तर फुंकून (धन दाबाखाली) वा आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या भिंती सर्व बाजूंनी ओढून (ऋण दाबाखाली) हवा भरता येईल. हवा भरण्याला आपण श्वास घेणे, तर हवा सोडण्याला आपण उच्छ्वास असे म्हणतो. नाकावाटे येणारी हवा फुफ्फुसात घेण्यासाठी हा पडदा स्नायू फुफ्फुसाच्या तळाला खाली ओढतो. साहजिकच ऋण दाब तयार होतो व हवा फुफ्फुसात शिरते. थोड्या वेळाने हा स्नायू प्रसरण पावतो व फुफ्फुसाला वर ढकलतो. त्यामुळे ऋण दाबाचे प्रमाण कमी होऊन हवा फुफ्फुसाच्या बाहेर टाकली जाते. अशाच प्रकारचे कार्य बरगड्यांना जोडणारे स्नायू व छातीच्या पिंजर्याचे स्नायू करत असतात. त्यांच्या कार्यामुळे फुफ्फुस सर्व बाजूंनी ओढले जाऊन त्यात ऋण दाब निर्माण होतो व श्वास आत घेतला जातो. हे स्नायू व पडदा यांच्या संयुक्त कार्यामुळे श्वासोच्छ्वास करताना छाती व पोट वरखाली होते. भरपेट जेवल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो, कारण जठराचे आकारमान वाढल्याने पडद्याच्या आकुंचन-प्रसरणावर मर्यादा येतात. या पडद्याच्या हालचालीमुळेच छाती व पोट वरखाली होते
जिवंत सोडतील का?
कोल्ह्याची थाप
जिवंत सोडतील का?
का उगीच मला संकटात लोटतोस? संकटात सापडण्यापेक्षा मी येथेच सुरक्षित आहे.” त्यावर कोल्हा म्हणाला, “अरे तुला भितीचे कसलेही कारण नाही. प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये तसा करार झाला आहे. जो कोणी कराराविरुद्ध वागेल, त्याला कडक शिक्षा होईल, असाही ठराव झाला आहे. ही गोष्ट तर सर्वांना समजली. मग तुलाच कशी कळली नाही?” असे दोघांचे बोलणे चालू असता मध्येच कोंबडा वाकडी मान करुन दूरवर पाहू लागला असता कोल्हा म्हणाला,” मित्रा, वाकडी मान करुन दूरवर काय बघतो आहेस? त्यावर कोंबडा म्हणाला, ”अरे भाऊ, तिकडून चार-पाच शिकारी कुत्रे इकडेच येताहेत, असे मला दिसते आहे.” कोंबड्याचे हे बोलणे ऐकताच कोल्ह्याची पाचावर धारण बसली. मनात घाबरुन तो म्हणाला,” अरे मित्रा, असे आहे तर मला येथून गेले पाहिजे. बरं, नमस्कार. हा मी निघालोच बघ. तेव्हा कोंबडा त्याला थांबवीत म्हणाला, “अरे भाऊ, असे पळतोस कशाला? थोड्या वेळातच मी खाली उतरतो. तू मला कराराची जी गोष्ट सांगितलीस, ती जर खरी असेल, तर तुला भीती वाटण्याचे काही कारण नाही.” त्यावर कोल्हा म्हणाला,” नाही रे बाबा. असा करार झाला आहे हे जरी खरे असले, तरी तो कुत्र्यांना अजून समजला नसेल, तर ते मला ठार केल्याशिवाय सोडतील का?” असे म्हणत कोल्ह्याने तेथून पोबारा केला. तात्पर्य : शेरास सव्वाशेर भेटतो, हेच खरे.




