दैनिक पंचांग मंगळवार, दि. १८ जून २०२४

0
31

निर्जला एकादशी, शके १९४६ क्रोधीनाम संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, स्वाती १५|५६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे
सफल होतील. संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शयता.

वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न
करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. कौटुंबिक चिंता दूर होईल. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.

मिथुन : दूर किंवा विदेशात असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. आय पेक्षा व्यय
अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता.

कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करणार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल.व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात.

सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम करायला उत्साह वाटणार नाही. कार्यात
अडचणी येण्याची शयता आहे. प्रवासाचे योग संभवतात.

कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल.

तूळ : आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून
दूर राहणच आज फायदेशीर होईल. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल.

वृश्चिक : शारीरिक व मानसिक  स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल.आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा-वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धन आणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर : हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना
प्रेरणा मिळेल. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील.

कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे. कामात
सांभाळूनच पुढे चला. कोर्ट कचेरीपासून दूरच राहा.

मीन : राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. भागीदाराबरोबर सुद्धा
मतभेद होऊ शकतात. वाहने व उपकरणे जपून चालवा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर