ओट्स बिस्कीट

0
727

साहित्य  मार्वो 125 ग्रॅम, पिठीसाखर 75 ग्रॅम, साखर (अख्खी) 50 ग्रॅम, ओट्स 75 ग्रॅम, दूध 50 मि.लि., मिल्क पावडर 12 ग्रॅम, कोकोनट पावडर 25 ग्रॅम, मैदा 125 ग्रॅम, व्हॅनिला पावडर 2 ग्रॅम, बेकिंग पावडर 2 ग्रॅम, मीठ 1 ग्रॅम, अमोनिया 1.5 ग्रॅम.

कृती  मैद्यात ओट्स, मिल्क पावडर, मीठ, व्हॅनिला पावडर व अमोनिया घालणे. मार्वो, पिठीसाखर व अख्खी साखर फेटणे. थोडे-थोडे दूध घालून मिश्रण हलके होईपर्यंत फेटणे. तयार मैदा त्यात टाकून हलका डो तयार करावा. हे पीठ मळून घ्यावे. बिस्किटे कापून बेक करावीत.

टीप – ओव्हन 180 अंश सेंटिग्रेडवर दहा मिनिटे, 160 अंश सेंटिग्रेडवर 20 मिनिटे प्रिहीट करावा.