सुविचार

 

प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो, तेव्हा तो स्वर्गाचे फूल बनवतो. – रवींद्रनाथ टागोर

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ?


पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ?
सकाळी उठल्या-उठल्या ३ ग्लास
पाणी प्यावे.
उपयोग : आंतरिक ऊर्जा कार्यरत
होते.
१ ग्लास आंघोळ केल्यानंतर.
उपयोग : रतदाबाचा त्रास नाहीसा
होतो.
२ ग्लास खाण्याआधी ३० मिनिटे.
उपयोग : पचनाच्या सर्व समस्या
नाहीशा होतात.
अर्धा ग्लास झोपण्यापूर्वी
उपयोग : हार्ट अटॅकपासून संरक्षण
होते.
                                   संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

कोंड्याची समस्या


थोड्याशा दह्यात लिंबाचा रस मिसळा
व ते मिश्रण केसांना मुख्यत्वे डोक्याच्या
त्वचेला लावा. नंतर शाम्पूने व्यवस्थित केस
धुवा. असे काही दिवस करीत राहिल्यास
कोंड्याची समस्या दूर होईल.

वास्तू


असे असावे भोजनगृह

भोजनगृहात सर्वप्रथम भरपूर उजेड
आणि स्वच्छता असावी. तसेच, ते पश्चिमेला
असेल, तर अधिक उत्तम. भोजनगृहाला
फिकट रंग असावा. तेथे निसर्गरम्य पोस्टर
किंवा फळांच्या भरलेल्या परडीचे चित्र असावे.
भोजनगृहाचा आणि मुख्य दरवाजा समोरासमोर
असू नये. भोजनगृहाच्या ईशान्येला पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था असावी.

ओव्हन चॉकलेट वड्या

ओव्हन चॉकलेट वड्या


साहित्य – दूध एक कप, साखर एक
कप, ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको पाव कप,
लोणी पाव कप, कॉर्नफ्लोअर किंवा आरारूट
पाव कप, काजूपूड पाव कप, साखर पिठी
दोन टेबलस्पून.
कृती – दूध, साखर, कोको, लोणी,
कॉर्नफ्लोवर एकत्र करून मंद विस्तवावर
ठेवावे. सारखे ढवळावे. घट्ट होऊ लागले की
विस्तव मध्यम ठेवावा. मिश्रण पातेल्यापासून
सुटू लागले व थर्मामीटरवर ११० सें.ग्रे.
तपमान झाले की खाली ते उतरवून खूप
घोटावे. ताटात पसरावे. वाटीने गुळगुळीत
करून वड्या कापाव्या. आवडत असेल तर
वरती पांढरी वर्खाचा कागद चिकटवावा.

बध्दकोष्ठता

हाडांच्या मजबुतीसाठी मटार

बध्दकोष्ठतेच्या त्रासावरही मटार
फायदेशीर आहे, कारण मटारमध्ये फायबरची
मात्रा अधिक असते. मटारमध्ये प्रथिन्यांबरोबरच
‘क’ जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी मटार उपयुक्त
ठरतो

दैनिक पंचांग रविवार, दि. १६ जून २०२४

दशहरा समाप्ति, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, हस्त ११|१३
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील.

वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील.

मिथुन : मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल. अजीर्णचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन यात रस वाटेल.

सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम करायला उत्साह वाटणार नाही. मित्र व स्नेही
भेटल्यामुळे आनंदात असाल.

कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.

तूळ : आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून दूर
राहणच आज फायदेशीर होईल.

वृश्चिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा- वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धन आणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.
आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडे लक्ष द्या.

कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे. कामात
सांभाळूनच पुढे चला.

मीन : जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

घरातील पिण्याचे पाणी शुद्ध कसे करावे?

घरातील पिण्याचे पाणी शुद्ध कसे करावे?

प्रदूषित पाणी पिण्याने विविध रोग होऊ शकतात. नळाला कधीकधी एवढे घाण पाणी येते, की अगदी विचारायलाच नको. अशा वेळी नगरपालिकेला सगळेच शिव्या देतात; पण पुढे काय? असे पाणी प्यायचे की नाही? घरच्या घरी करण्याचे पाण्याच्या शुद्धीकरणाचे उपाय आता पाहू. पाणी भरताना शयतो स्वच्छ फडयातून गाळून मगच भरावे. पाण्यात तुरटी फिरवावी. यामुळे धूळ, तरंगणारे कण इ. न विरघळणारी पाण्यातील अविद्राव्य घाण भांड्याच्या तळाशी गोळा होते. नंतर हे पाणी चौपदरी स्वच्छ कॉटनच्या फडयातून गाळून मग स्वच्छ भांड्यात भरावे. पाणी गाळून घेतल्यास नारू या रोगापासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो.

पाणी १० ते १५ मिनिटे खळखळा उकळवून घेतल्यास ते निर्जंतुक होते. असे पाणी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यास योग्य असले तरी या पद्धतीत पाणी बेचव झाल्याने प्यावेसे वाटत नाही. दुसरे म्हणजे इंधनाचा खर्चही येतो. त्यामुळे घरातील खूप पाणी तापवणे कठीण होऊन बसते. यासाठी पाणी शुद्धीकरणाचा दुसरा एक प्रभावी मार्ग वापरता येतो. तो म्हणजे पाण्यात लोरीन टाकणे. लोरीनच्या गोळ्या वा द्रव लोरीन विशिष्ट प्रमाणात (हे प्रमाण गोळ्यांच्या पाकिटावर वा द्रव लोरीनच्या बाटलीवर लिहिलेले असते) पाण्यात टाकावा. अर्ध्या ते पाऊण तासाने असे पाणी पिण्यास योग्य बनते. सुरक्षित पाणी पिल्यास बरेचसे आजार आपण टाळू शकतो. स्वतःचे पाणी सुरक्षित करण्याचे हे घरगुती उपाय भारतात सर्वांनी वापरल्यास प्रदूषित पाण्यामुळे होणारे रोग व त्यामुळे होणारे लाखो बळी टाळता येतील.

सुविचार

पायदळी चुरगळली जाणारी फुले, चुरगळणार्‍या पायांना सुगंध देतात.

गुडघेदुखी कमी होण्यासाठी

गुडघेदुखी कमी होण्यासाठी
भाकरीच्या गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल
तेल घ्या. त्याची भाकरी १५ दिवस रोज
रात्री जेवताना खा. गुडघेदुखी, पाठदुखी कमी
होईल.
बाभळीची साल : बाभळीची साल पाण्यात
टाकून ती चांगली उकळवा. त्या पाण्याने गुडघे
किंवा पाय दुखत असेल त्याभागावर टाका.
१० मिनिटांत फरक पडतो.