ताण दूर करायचा तर…

0
978

आपण आनंदी राहण्याचा, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक वेळी यश मिळतंच असं नाही. अर्थात काही मागार्र्ंनी आपण मानसिक आरोग्य संतुलित राखण्यात यश मिळवू शकतो. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यक्त होणं. मनातल्या भावभावना व्यक्त करा. आसपासच्या माणसांशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे तुमचा ताण, अस्वस्थता कमी होईल. दररोज एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोला. अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपल्यावर अपेक्षांचं ओझं नसतं. कोणताही ताण नसतो. यामुळे ताण कमी व्हायला मदत होते. वाचनाची सवय ला- वून घ्या. स्वत:चं कौतुक करा. मदत करणार्‍यांचे आभार माना. आळशीपणा सोडा, आवडीच्या गोष्टी करा. मानसिकदृष्ट्या कार्यरत रहा.