सुविचार

चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय. : स्वामी विवेकानंद

हिवाळ्यात ओठांची काळजी

हिवाळ्यात ओठांची काळजी

हिवाळा म्हटलं की, लहानांपासून
मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच ओठांची समस्या
निर्माण होते. ओठ शुष्क होतात आणि
त्यावरील त्वचा निघते. त्यातच लहान बाळांचे
ओठ हे प्रचंड नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्या
ओठांवर थंडीचा लवकर परिणाम होतो. त्यामुळे
त्यांच्या ओठांना रोज घरी तयार केलेलं तूप
किंवा दुधावरील साय लावावी.

गुळपापडी

गुळपापडी

साहित्य : कणीक जाडसर एक कप,
गूळ किसून पाव कप, तूप तीन टेबलस्पून,
वेलदोडे पूड अर्धा चमचा.
कृती : कढईत तुपावर मंद विस्तवावर
कणीक भाजून त्यात गूळ व वेलदोड्यांची पूड
घालून मिश्रण चांगले कालवावे. ताटाला तूप
लावून त्यावर मिश्रण पसरावे. गरम असतानाच
वड्या कापाव्या.

वास्तू

दिवाणखान्यातील बैठक
* दिवाणखान्यात घड्याळाचे तोंड
शयतो पूर्वेकडे असावे. दिवाणखान्याच्या
भिंतींना काळा वा गडद लाल रंग देऊ नये.
दिवाणखान्यातील भारतीय बैठक पूर्वेला किंवा
उत्तरेला असावी.
* वास्तूच्या कोणत्याही भागात अथवा
दिशेत आलेला कट्स हा अनिष्ट असतो व तो
वास्तुदोष निर्माण करणारा असतो.
* प्रत्येक दिशेतील कट्स वास्तुदोष
निर्माण करणारा असतो तसेच प्रत्येक दिशेतील
कट्स हे विविध प्रकारचे दुष्परिणाम घडवून
आणण्यास कारणीभूत ठरत असतात.

मसाले टिकवण्यासाठी

* मसाले टिकवण्यासाठी मसाल्यात
तमालपत्राची २-३ पाने किंवा एखादे पान
जरी ठेवले तरी ते खराब होत नाहीत.
* केक मऊ होण्यासाठी केकच्या
मिश्रणात एक चमचा ग्लिसरीन मिसळावे.

जर ओठ फुटले असतील तर..!

* जर ओठ फुटले असतील तर तुपात
थोडे मीठ मिसळून ओठांना लावा. ओठांचे
फुटणे बंद होईल.
* पायाच्या टाचेस भेगा पडल्यास तेल व
हळद एकत्र करून लावावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

‘पांडोबाला साप चावला.’
‘मग?’
‘त्याच्या मित्रांनी त्याला दोन बाटल्या दारू पाजली.‘
‘उतरलं का पांडोबाचं विष?‘
छे!… छे!… विष उतरलं नाही…
पण सुखात मेला.

दैनिक पंचांग बुधवार, दि. १९ जून २०२४

प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, विशाखा १७|२३
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. मागील उधारी वसुल होईल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील.

वृषभ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद देतील. उल्हासाचा अनुभव येईल.

मिथुन : व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

कर्क : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. सुख-शांतीचे वातावरण राहील. आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे.

सिंह : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल.

कन्या : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. आपल्या खाण्या-पिण्याच्या
सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा.

तूळ : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.

वृश्चिक : शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. वाहने सावकाश चालवावीत व सांभाळावीत चोरी होण्याची शयता आहे. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.

धनु : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील.

कुंभ : मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील. मित्रांचा सहयोग मिळेल. त्याची कसोटी घेणारा हा दिवस आहे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल.

मीन : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

वजन व उंचीचे प्रमाण नेमके किती असावे

वजन व उंचीचे प्रमाण नेमके किती असावे

व्यक्तीची वाढ किती व्हावी याच्या मर्यादा आहेत. आनुवंशिकता हे वजन व उंची जास्तीत जास्त किती वाढेल याचे कारण असले तरी कुपोषण, गंभीर रोग, जंतांची लागण, थायरॉईड ग्रंथीचा रोग आदी कारणांनी वाढीवर परिणाम होतात. त्यामुळे एखादी व्यक्ती अनुवंशिकतेमुळे खुजी आहे वा खूप लठ्ठ आहे असे म्हणण्यापूर्वी, इतर सर्व रोग नाहीत याची तपासण्यांनी खात्री करणे अत्यंत आवश्यक असते. जन्माच्या वेळी बाळाचे वजन २.८ किलो असते. ते पहिल्या वाढदिवसाला तिप्पट म्हणजे ८.४ किलो, तर दुसर्‍या वाढदिवसाला ११.२ किलो इतके होते. त्यानंतर दर वर्षाला (१८ वर्षांपर्यंत) २ ते २.५ किलो वजन वाढते. त्यानंतर तुमचे वजन किती आहे हे पाहण्यासाठी एक सोपे समीकरण आहे.

सें. मी. मधील तुमच्या उंचीतून १०० वजा केल्यास येणारी संख्या म्हणजे तुमचे कि. ग्रॅ. मधील वजन. अर्थात यापेक्षा १०% कमी वा जास्तही वजन चालू शकेल. जन्माच्या वेळी बाळाची लांबी ५० सें. मी. तर पहिल्या वाढदिवसाला ती ७५ सें. मी. इतकी असते. दुसर्‍या वाढदिवसाला ती ८७.५ सें. मी. आणि त्यानंतर दरवर्षी ५ ते ६ सें. मी. इतकी वाढते. जास्तीत जास्त वयाच्या २५ वर्षेपर्यंत उंची वाढू शकते. भारतात पुरुषांची सरासरी उंची वाढू शकते. भारतात पुरुषांची सरासरी उंची साडेपाच फूट, तर स्त्रियांची उंची ५ फूट असते. पुरुषाचे सरासरी वजन ६० किलो, तर स्त्रियांचे सरासरी वजन ५० किलो असते. कोणत्या वयासाठी किती वजन व उंची असावी, याचे तक्ते उपलब्ध असतात. तत्यावरूनही उंची व वजन काढता येते.

सुविचार

फुले म्हणजे पृथ्वीवर सुगंधाची उधळण करणारे व हृदयाला प्रकाशित करणारे तारे आहेत. : लाँगफेलो