श्वासोच्छ्वास चालू असताना छाती व पोट वरखाली का होते?

0
64

श्वासोच्छ्वास चालू असताना छाती व पोट वरखाली का होते?

श्वासोच्छ्वास चालू असताना छाती व पोट वरखाली होते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. श्वसनाचा दर देखील डॉटर या पोट व छाती वरखाली होण्यानुसारच सामान्यतः मोजतात. फुफ्फुसाचा श्वसनाशी संबंध आहे, हे आपण जाणताच. त्यामुळे श्वसनात छाती हलणे स्वाभाविकच आहे, असे आपल्याला वाटेल; पण पोट का वरखाली होते, मात्र हे थोडे अनाकलनीय वाटेल. हे समजण्यासाठी प्रथम पोट व छाती यांची रचना बघायला लागेल. पोट व छाती यांचे विभाजन करणारा नावाचा एक आडवा पडद्यासारखा पसरलेला स्नायू असतो. (ऊळरहिीरसा) स्नायूचा पडदा एखाद्या घुमटाप्रमाणे असतो. त्याच्या वरच्या बाजूस छातीतील फुफ्फुसे, हृदय इत्यादी असतात; तर खालच्या बाजूस पोटातील जठर, आतडी, यकृत इत्यादी इंद्रिये असतात. आपण श्वास घेतो म्हणजे काय, हे समजण्यासाठी फुटलेल्या फुग्याचा एक तुकडा तोंडात घेऊन हवा आत ओढा. ओढल्यावर त्यात हवा गोळा होते व एक लहानसा फुगा तयार होऊ शकतो. फुग्यात हवा फुंकली तरीही फुगा फुटतो. फुफ्फुस हा एक प्रकारचा फुगाच असतो. त्यात एक तर फुंकून (धन दाबाखाली) वा आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या भिंती सर्व बाजूंनी ओढून (ऋण दाबाखाली) हवा भरता येईल. हवा भरण्याला आपण श्वास घेणे, तर हवा सोडण्याला आपण उच्छ्वास असे म्हणतो. नाकावाटे येणारी हवा फुफ्फुसात घेण्यासाठी हा पडदा स्नायू फुफ्फुसाच्या तळाला खाली ओढतो. साहजिकच ऋण दाब तयार होतो व हवा फुफ्फुसात शिरते. थोड्या वेळाने हा स्नायू प्रसरण पावतो व फुफ्फुसाला वर ढकलतो. त्यामुळे ऋण दाबाचे प्रमाण कमी होऊन हवा फुफ्फुसाच्या बाहेर टाकली जाते. अशाच प्रकारचे कार्य बरगड्यांना जोडणारे स्नायू व छातीच्या पिंजर्‍याचे स्नायू करत असतात. त्यांच्या कार्यामुळे फुफ्फुस सर्व बाजूंनी ओढले जाऊन त्यात ऋण दाब निर्माण होतो व श्वास आत घेतला जातो. हे स्नायू व पडदा यांच्या संयुक्त कार्यामुळे श्वासोच्छ्वास करताना छाती व पोट वरखाली होते. भरपेट जेवल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो, कारण जठराचे आकारमान वाढल्याने पडद्याच्या आकुंचन-प्रसरणावर मर्यादा येतात. या पडद्याच्या हालचालीमुळेच छाती व पोट वरखाली होते