
दिव्यात गाईचे तूप घालून तो जळत
ठेवल्यास त्या घरात आनंद व शांती निर्माण
होते.
घाई केली अंगाशी आली
घाई केली अंगाशी आली
त्या रानातील ससे नेहमीच भेदरलेले असत. एक गरूडपक्षी आकाशात घिरट्या घालीत- घालीत एखाद्या सशाला अलगद पंज्यात पकडून क्षणात पळवून नेत असे. ससे खायला तो गरूड अगदी सोकावला होता. त्यामुळे ससे दबकत, दबकत लपून छपून गवत खाऊन लगोलग आपल्या बिळात लपून बसत. पण एकदा एक रानमांजर भक्ष्याच्या शोधात तेथे आले आणि दबा धरून बसले. आकाशात घिरट्या घालणार्या गरुडाला वाटले हा जरा मोठाच ससा दिसतो आहे. त्याने मागचा पुढचा विचार न करता क्षणात झडप घालून त्या रानमांजराला उचलून आकाशात नेले, पण थोड़्याच वेळात त्याला आपण भलतेच कोणाला तरी पकडून आणले, याची जाणीव झाली. ससा समजून आपण चक मांजरीला पकडून आणले हे त्याला कळले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, कारण मांजरीने आपले पंजे गरूडाच्या मानेला लावून त्याचा गळा आवळण्यास सुरूवात केली होती. थोडयाच वेळात गरूड़ गुदमरून मेला आणि जमिनावर पडला.
तात्पर्य : घाईने एखादे कार्य करायला गेले, तर कधी कधी त्याचे परिणाम उलटे होऊन अनर्थ ओढवतो.
आजकाल देवीची लस का देत नाहीत?
आजकाल देवीची लस का देत नाहीत?
‘देवीचा रोगी कळवा, हजार रूपये मिळवा’ हे वाय तुम्ही वाचले असेल. आता तर अशा घोषणाही बंद झाल्या आहेत. कारण जगातून देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दि. ८ मे १९८० रोजी ‘जगातून देवी’ या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे’, असे जाहीर केले. त्यानंतर जगात देवीचा एकही रूग्ण सापडलेला नाही. देवीच्या विषाणूंचेच जगातून पूर्णपणे उच्चाटन झाले आहे. पूर्वी देवी हा एक भयंकर रोग मानला जात असे. या रोगामुळे पुरळ येई. चेहर्यावर व्रणांमुळे विद्रुपता येई. कधी कधी अंधत्व येत असे वा मृत्युही होई. देवी झालेल्या व्यक्तीला ताप असे व तिला प्रचंड थकवा येई. देवी हा रोग भयंकर असल्याने तो होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस द्यावी लागे. ती लस देणे, देवीचे निर्मूलन झाल्याने १९८० नंतर बंद करण्यात आले. साहजिकच त्यांचा जन्म १९८० नंतर झाला आहे. त्यांना ही लस देण्यात आली नाही. देवीचे पुनरागमन होण्याचा धोका लक्षात घेऊन संघटनेने न्यूयॉर्क व मॉस्को या दोन ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये देवीच्या लसीचा पुरेसा साठा करून ठेवलेला आहे. त्यामुळे अचानक उद्भवणार्या गंभीर प्रसंगाला यशस्वीपणे तोंड देता येईल. देवीचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ञ सध्या कार्यरत आहेत.
पाककला
शाही मशरूम
साहित्य – साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किंवा दीड वाटी टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा
गरम मसाला, १ मोठा चमचा धने-जिरे पूड, १ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा कसुरी मेथी, ६-७ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे, १ मोठा चमचा हेवी क्रिम, २ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार, १ टीय्स्पून चमचा साखर.
कृति – बटन मशरुम्स अर्धे करून घ्या. टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरून घ्या. १ कांदा उभा जरा जाडसर
चिरा. सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या. पळीभर तेलावर चौकोनी चिरलेला कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धने-जिरे पूड घालून परता. कसूरी मेथी घाला आणि काजूचे तुकडे घाला व थोडे परता. या सर्व मिश्रणाची मिसरमधून पेस्ट करा. सिल्किश टेश्चर येईल. कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा घाला व परता. कांदा, टोमॅटोची पेस्ट घाला. थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्या म्हणजे चांगली
ग्रेव्ही होईल. त्याला एक उकळी आणा. आता चिरलेला मशरुम्स घाला व शिजू द्या. खूप शिजवू नका. मशरुम्स मेण होता कामा नये. हेवी क्रिम घाला. मीठ व साखर घाला. कोथिंबिरीने सजवा. शाही मशरुम मसाला तयार आहे. नान/पराठा/रोटीबरोबर सर्व्ह करा.
आरोग्य
शुगर घेताना हे ध्यानात घ्या

कोंडायुक्त गव्हाच्या पिठाची रोटी,
मिसळलेली धान्ये आणि भुरे तांदूळ यांचा
खाण्यात उपयोग करावा. थंड पेयपदार्थ जसे
कोकाकोला इत्यादींचा उपयोग कमी करावा.
मधून मधून काही दिवसांसाठी शूगरचा उपयोग
बंद करावा.
साखरेऐवजी फळे, मेवे अथवा स्नॅसचा
उपयोग करावा. दररोज वयानुसार तीस ते साठ
मिनिटांपर्यंत व्यायाम करावा. याने शरीरामध्ये
कोलेस्टेरॉल आणि एसिटेट वाढण्यापासून
रोखले जाईल. पेस्ट्रिज, चॉकलेट यांसारखे
पदार्थ कमी मात्रेत खावेत
वास्तू
* देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा
अधिक मूर्ती अथवा फोटो ठेवू नयेत.
* वास्तुत कोणत्याही प्रकारची
अस्वस्थता वाटू लागल्यास देवापुढे अखंड
(चोवीस तास) नंदादीप तेवत ठेवण्याची पद्धत
आहे. यायोगे घरात हळूहळू शांतता निश्चितपणे
निर्माण होते, असा अनुभव आहे. हा नंदादीप
वार्याने वगैरे चुकून विझला, तर एवढे मनाला
लावून घेऊ नये. तो पुन्हा लावावा व त्याला
नमस्कार करावा. ह्या नंदादीपाच्या वातीचे
तोंड नेहमी पूर्व वा उत्तर दिशेलाच असावे.
त्यायोगे वास्तुत राहणार्या व्यतींना सुख
मिळून दीर्घायुष्यही लाभते.
* घरात प्रवेश करताना लगेच चूल,
शेगडी नजरेस पडता कामा नये. घरातील धन
नष्ट होऊ लागते. पार्टीशन करा.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
तुझी पर्वा कोण करतो?
कुरणात चरता चरता ऊन फार कडक पडू लागले. म्हणून उन्हाने त्रासलेला बैल जरा गारव्याला थांबावे, म्हणून ओढ्याच्या वाहणार्या पाण्यात जाऊन उभा राहिला. तेवढ्यात एक माशी उडत उडत आली आणि बैलाच्या शिंगावर बसली. बैल आपल्याकडे लक्ष देत नाही, ते पाहून ती बैलाला गर्वाने म्हणाली, “अहो बैलोबा मी तुम्हाला न विचारता तुमच्या शिंगावर येऊन बसले, त्याबद्दल मला माफ करा. शिवाय माझ्या वजनाचा भार तुम्हाला सहन होण्यासारखा नसेल, तर मी आपली पलीकडच्या झाडावर बसेन बापडी.” त्यावर बैल म्हणाला, “बये जा नाही तर बस. मला तुझ्याशी काही देणे घेणे नाही. आता तू बोललीस, म्हणून मला कळले की तू येथे बसली आहेस. न पेक्षा तू येथे आहेस हे मला कळले देखील नसते. मग मी तुझी पर्वा कशाला करु?” तात्पर्य ः काहींना वाटते लोक आपल्याला फार किंमत देतात. पण खरे तर त्यांचे कवडीइतकेही महत्व नसते
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
गोळ्या चांगल्या की इंजेशन
आजकालचे जग हे वेगवान आहे. कोणालाही निवांत असा वेळच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत माणसे धावत असतात. साहजिकच आजारी माणसालाही पटकन बरे व्हायचे असते. त्यामुळे ते डॉटरांकडून लवकरात लवकर बरे व्हायची अपेक्षा करतो. रूग्ण व डॉटर या दोहोंमुळे सध्या इंजेशन घेण्याचा वाढता कल समाजात दिसून येत आहे. डॉटरांकडे गेल्यावर इंजेशन मिळतेच. असा समज रूढ होतोय. घसा बसल्यावर मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. नाकातोंडातून गरम पाण्याची वाफ घ्या. हा सल्ला रुग्णांना फारसा रूचत नाही. त्यांना हवी असतात औषधे. त्यातही विशेषतः इंजेशन. पण इंजेशन घेणे खरंच आवश्यक असते का? बहुतेक सर्वच औषधे तोंडाने घेऊन उपयोग होऊ शकतो? औषध तोंडाने घेण्याचा हा मार्ग जास्त सुरक्षित, स्वस्त व सोपा आहे. तोंडाने घेतलेले औषध अर्ध्या तासात रक्तात पोहोचते. तर इंजेशनने घेतलेली औषधे पाच मिनिटात रक्तात पोहोचतात. एवढ्यात फरकासाठी खूप किंमत मोजावी लागते. इंजेशनाच्या एका डोसची किंमत गोळीपेक्षा निदान तिप्पट तरी असते. शिवाय टोचण्यासाठी डॉटर घेतील ते पैसे वेगळे. अर्थात याचा अर्थ इंजेशन केव्हाच घेऊ नये असा नाही. जेंटामायसिन, सर्पविषावरील प्रतिद्रव्य पोटातून शोषले जात नाही वा परिणामकारक ठरत नाही. सिफिलीसमध्ये पेनिसिलीन इंजेशन प्रभावी ठरते. धनुर्वात प्रतिबंधक, द्विगुणी, त्रिगुणी या लसीही इंजेशनद्वारेच दिल्या जातात. रूग्णाला खूप उलट्या होत असतील, तो बेशुद्धाअवस्थेत असेल; तर इंजेशनशिवाय पर्यायच राहत नाही. इंजेशनचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. प्राणघातक रिअॅशन येणे (ज्यात मृत्यूही होऊ शकतो) इंजेशनच्या जागी जंतुसंसर्ग होऊन गळू होणे, नसेला इजा होऊन हात किंवा पाय लुळा पडणे यांचा त्यात समावेश होईल. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे पूर्णपणे निर्जंतुक न केलेल्या सुया इंजेशनसाठी वापरल्यास एक प्रकारची कावीळ (कावीळ-बी) होऊ शकते व एड्ससारख्या महाभयंकर रोगदेखील होऊ शकतो. म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करून गोळ्या व इंजेशन यांत शयतो गोळ्यांचीच निवड आपण कराल असे वाटते. अन्यथा भरमसाठ पैसे डॉटरांना देऊन ‘विकतचे दुखणे’ घरात आणल्याचा पश्चाताप आपल्याला करावा लागेल




