मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
41

गोळ्या चांगल्या की इंजेशन

आजकालचे जग हे वेगवान आहे. कोणालाही निवांत असा वेळच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत माणसे धावत असतात. साहजिकच आजारी माणसालाही पटकन बरे व्हायचे असते. त्यामुळे ते डॉटरांकडून लवकरात लवकर बरे व्हायची अपेक्षा करतो. रूग्ण व डॉटर या दोहोंमुळे सध्या इंजेशन घेण्याचा वाढता कल समाजात दिसून येत आहे. डॉटरांकडे गेल्यावर इंजेशन मिळतेच. असा समज रूढ होतोय. घसा बसल्यावर मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. नाकातोंडातून गरम पाण्याची वाफ घ्या. हा सल्ला रुग्णांना फारसा रूचत नाही. त्यांना हवी असतात औषधे. त्यातही विशेषतः इंजेशन. पण इंजेशन घेणे खरंच आवश्यक असते का? बहुतेक सर्वच औषधे तोंडाने घेऊन उपयोग होऊ शकतो? औषध तोंडाने घेण्याचा हा मार्ग जास्त सुरक्षित, स्वस्त व सोपा आहे. तोंडाने घेतलेले औषध अर्ध्या तासात रक्तात पोहोचते. तर इंजेशनने घेतलेली औषधे पाच मिनिटात रक्तात पोहोचतात. एवढ्यात फरकासाठी खूप किंमत मोजावी लागते. इंजेशनाच्या एका डोसची किंमत गोळीपेक्षा निदान तिप्पट तरी असते. शिवाय टोचण्यासाठी डॉटर घेतील ते पैसे वेगळे. अर्थात याचा अर्थ इंजेशन केव्हाच घेऊ नये असा नाही. जेंटामायसिन, सर्पविषावरील प्रतिद्रव्य पोटातून शोषले जात नाही वा परिणामकारक ठरत नाही. सिफिलीसमध्ये पेनिसिलीन इंजेशन प्रभावी ठरते. धनुर्वात प्रतिबंधक, द्विगुणी, त्रिगुणी या लसीही इंजेशनद्वारेच दिल्या जातात. रूग्णाला खूप उलट्या होत असतील, तो बेशुद्धाअवस्थेत असेल; तर इंजेशनशिवाय पर्यायच राहत नाही. इंजेशनचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. प्राणघातक रिअ‍ॅशन येणे (ज्यात मृत्यूही होऊ शकतो) इंजेशनच्या जागी जंतुसंसर्ग होऊन गळू होणे, नसेला इजा होऊन हात किंवा पाय लुळा पडणे यांचा त्यात समावेश होईल. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे पूर्णपणे निर्जंतुक न केलेल्या सुया इंजेशनसाठी वापरल्यास एक प्रकारची कावीळ (कावीळ-बी) होऊ शकते व एड्ससारख्या महाभयंकर रोगदेखील होऊ शकतो. म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करून गोळ्या व इंजेशन यांत शयतो गोळ्यांचीच निवड आपण कराल असे वाटते. अन्यथा भरमसाठ पैसे डॉटरांना देऊन ‘विकतचे दुखणे’ घरात आणल्याचा पश्चाताप आपल्याला करावा लागेल