शाही मशरूम
साहित्य – साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किंवा दीड वाटी टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा
गरम मसाला, १ मोठा चमचा धने-जिरे पूड, १ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा कसुरी मेथी, ६-७ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे, १ मोठा चमचा हेवी क्रिम, २ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार, १ टीय्स्पून चमचा साखर.
कृति – बटन मशरुम्स अर्धे करून घ्या. टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरून घ्या. १ कांदा उभा जरा जाडसर
चिरा. सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या. पळीभर तेलावर चौकोनी चिरलेला कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धने-जिरे पूड घालून परता. कसूरी मेथी घाला आणि काजूचे तुकडे घाला व थोडे परता. या सर्व मिश्रणाची मिसरमधून पेस्ट करा. सिल्किश टेश्चर येईल. कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात उभा चिरलेला कांदा घाला व परता. कांदा, टोमॅटोची पेस्ट घाला. थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्या म्हणजे चांगली
ग्रेव्ही होईल. त्याला एक उकळी आणा. आता चिरलेला मशरुम्स घाला व शिजू द्या. खूप शिजवू नका. मशरुम्स मेण होता कामा नये. हेवी क्रिम घाला. मीठ व साखर घाला. कोथिंबिरीने सजवा. शाही मशरुम मसाला तयार आहे. नान/पराठा/रोटीबरोबर सर्व्ह करा.