
* त्वचा मुलायम आणि चमकदार
होण्यासाठी दोन लहान चमचे टोमॅटो रस +
एक छोटा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चम
चा ग्लिसरीन यांचे मिश्रण चेहर्याला लावा.
तृप्त वैवाहिक जीवनासाठी

तृप्त वैवाहिक जीवनासाठी
* शयनगृहात राधा-कृष्ण, शिवय्पार्वती, लव्हबर्डस् अशा प्रतिमा ठेवल्यास
वैवाहिक जीवन तृप्त होते.
* शयनगृहात स्वतंत्र पलंग असतील,
तर ते जोडून घ्यावे आणि त्यावर एकच
बेडशीट घालावे.
* दक्षिणेकडे असणारा आड/विहीर
यामुळे अशुभ प्रभाव पडतो व घरात पुत्रसंतती
जन्म घेत नाही. जरी झाली तरी ती सदोष
असते.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
म्हणाला, “महाराज तुम्हाला ठार करणार आहेत, तेव्हा जिवाला जपा.” हे ऐकून आपल्याला सावध केल्याबद्दल योग्य वेळ येताच तुला चांगले बक्षीस देईन, असे राजाच्या भावाने त्याला वचन दिले. एकदा राजा आजारी पडला आणि त्यातच तो मरण पावला. राजाचा भाऊ गादीवर बसला. मग प्रथम त्याने नोकराला बोलावून घेतले आणि याचे शिर छाटावे, असा हुकूम फर्माविला. हे ऐकून तो विश्वासघातकी नोकर गयावया करीत राजाचे पाय धरून म्हणाला, “महाराज हेच का माझे बक्षीस? त्यावर राजा म्हणाला,” हेच तुझे योग्य बक्षीस. जो नोकर आपल्या राजाचे गुपित बाहेर फोडतो, त्याला देहान्ताशिवाय शिक्षा नाही. तू हा अपराध केला आहेस, म्हणून तू या शिक्षेस पात्र आहेस. ज्याने माझ्या मोठ्या भावाचा विश्वासघात केला, तो माझाही करणार नाही हे कशावरुन? (पूर्ण) तात्पर्य ः विश्वासघातकी माणसाकडून नेहमी सावध राहावे. त्यांच्या करणीने ते जीव गमावून बसतात.
जंतूचा शोध कुणी लावला?
जंतूचा शोध कुणी लावला?
१८६० च्या आधी कोणालाच जंतू म्हणजे काय याची माहिती नव्हती. रोग कशामुळे होतात, याबद्दलचे अनेक समज प्रचलित होते. देवाचा कोप, भूत-प्रेत यांची बाधा, जादूटोणा अशा अनेक कारणांचा यात समावेश होता. त्यामुळे रोगांवरचे उपाय हे दैवाची आराधना करणे, बळी देणे, मांत्रिकाकडून भूत उतरवणे, गळ्यात ताईत-गंडे बांधणे आणि गावातच कुणाला औषधी वनस्पतीबद्दल माहिती असेल तर त्याच्याकडून उपचार करून घेणे-याप्रकारचे असत. आपल्या देशातील आयुर्वेद उपचार पद्धतीतील त्रिदोष संकल्पनेनुसार खूप पूर्वीपासून उपचार केले जातात. सर्वप्रथम १८६० मध्ये लुईस पाश्चर या फ्रेंच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाने ‘हवेत जिवाणू असतात’ हे दाखवून दिले. त्यामुळे रोग का होत असावेत याचा नवीन विचार सुरु झाला. पाश्चरने रोगजंतूमुळे रोग होतात, या संकल्पनेचा विकास व पाठपुरावा केला. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने १८७७ मध्ये अँथ्रँस हा रोग जिवाणूपासून होतो हे दाखवून दिले. यानंतर सूक्ष्म जीवशास्त्राचे सुवर्णयुग सुरू झाले व एकामागे एक अनेक जीवजंतूंचा शोध लागला. या जंतूंचे जिवाणू इरलींशीळर व विषाणू तर्ळीीी हे दोन प्रकार पडतात. यापैकी विषाणू केवळ इलेट्रॉन सूक्ष्मदर्शिकेखालीच दिसू शकतात. जिवाणू मात्र साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली सुद्धा दिसतात. आकारातील बदलाखेरीज त्यांच्यात पुष्कळ फरक असतात. कॉलरा, टायफॉईड, क्षयरोग हे जिवाणूंमुळे होणारे रोग आहेत; तर पोलिओ, कावीळ, गोवर, गालफुगी हे रोग विषाणूंमुळे होतात. जिवाणूंना मारणारी प्रभावी औषधे आजकाल उपलब्ध आहेत पण विषाणूंना मारतील अशी प्रभावी औषधे आजही उपलब्ध नाहीत.
पाककला
पाकातले चिरोटे

साहित्य – अर्धा किलो मैदा, पाव किलो साखर, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी डालडा, पाणी, अर्धा लिटर दूध, तळण्यासाठी तेल. पाव वाटी तांदळाची पिठी, बेकींग पावडर.
कृति – प्रथम मैदा चाळून घ्यावा. त्यात डालडा गरम करून पाव वाटी घालावे. पाव चमचा बेकींग पावडर मीठ घालून दूध घालावे व चपातीच्या कणकेप्रमाणे भिजवावे. नंतर एका ताटात उरलेला डालडा व तांदळाची पिठी फेसून ठेवणे. नंतर मैद्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करणे व लाटणे व प्रत्येक चपातीला तांदळाची फेसलेली पिठी लावून एकावर एक
ठेवणे व वळकटी करणे व गोल-गोल काप करावेत व ते गोल काप अलगदपणे लाटावेत. नंतर तेलात तळून काढणे व पाकात सोडणे. पहिले तळलेले पाकात टाकणे व दुसरे तळून होईपर्यंत ते पाकात मुरवत ठेवणे. अशा प्रकारे
सर्व चिरोटे तयार.
आरोग्य
आरोग्यदायी साबुदाणा

पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या
आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो.
साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला
आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा मन
झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून
खातो. या छोट्या दिसणार्या साबुदाण्याचे
अनेक मोठे फायदे आहेत.
शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते,
पोटाच्या समस्या दूर होतात ब्लडप्रेशरवर
नियंत्रण राहते. शरीराला ऊर्जा मिळते. हाडे
मजबूत होतात. वजन वाढण्यास मदत होते.
लवकर थकवा येत नाही
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४
दर्श अमावास्या, पुनर्वसु रवि, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, आर्द्रा २८|०६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
मेष : प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.
मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.
वृषभ : महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक
वातावरण आनंदाचे राहील. आर्थिक प्रकरणां मध्ये काळजीपूर्वक कार्ये करा.
मिथुन : लेखन कार्यातील अडचणी दूरहोतील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक
विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत
होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. वाहने सावकाश चालवा.
सिंह : राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने
काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
कन्या : वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे.
मानसिक स्थिरता वाढेल.
तूळ : मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद
स्थितीचे वातावरण राहील. स्त्री पक्षाचा आधार राहील.
वृश्चिक : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला
जाईल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.
धनु : व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.
कामात सावधगिरी बाळगा.
मकर : मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक
विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. मानय्सन्मानात वाढ होईल.
मीन : कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्यांमध्ये आपली प्रगती
आपणास संतुष्टी देईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
हसा आणि शतायुषी व्हा!
प्रेत घेऊन जाणार्या माणसास भरधाव सायकल वरून जाणार्या
एका सायकल स्वाराचा धक्का लागल्याने प्रेत खाली पडते. लोक
चिडून सायकल स्वाराला म्हणाले, “मूर्खा! दिसत नाही का तुला!
लाज वाटत नाही.” प्रेताला धक्का लागून ते खाली पडले ना!
सायकलस्वार : धक्का लागून जो माणूस खाली पडलाय तो
गप्प आहे आणि तुम्ही उगाचच मला बोलताय.
ही काय पद्धत झाली का राव?
त्वचेला ओलसरपणा आणण्यासाठी

त्वचेला ओलसरपणा आणण्यासाठी
मॉइश्चरायझर वापरतात. आपल्याला ते घरच्या
घरी तयार करता येतो. ते असे ताज्या
लिंबाचा रस २ चमचे + २ चमचे ग्लिसरीन.
यात ६ थेंब रोझ वॉटर टाका. हे सर्व मिश्रण
चांगले हालवून एक करा. नंतर ते स्वच्छ
कोरड्या बाटलीत घालून फ्रीजमध्ये ठेवावे.
रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण अर्धा तास
चेहर्यावर चोळून जिरवावे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.






