मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
25

घाई केली अंगाशी आली

त्या रानातील ससे नेहमीच भेदरलेले असत. एक गरूडपक्षी आकाशात घिरट्या घालीत- घालीत एखाद्या सशाला अलगद पंज्यात पकडून क्षणात पळवून नेत असे. ससे खायला तो गरूड अगदी सोकावला होता. त्यामुळे ससे दबकत, दबकत लपून छपून गवत खाऊन लगोलग आपल्या बिळात लपून बसत. पण एकदा एक रानमांजर भक्ष्याच्या शोधात तेथे आले आणि दबा धरून बसले. आकाशात घिरट्या घालणार्‍या गरुडाला वाटले हा जरा मोठाच ससा दिसतो आहे. त्याने मागचा पुढचा विचार न करता क्षणात झडप घालून त्या रानमांजराला उचलून आकाशात नेले, पण थोड़्याच वेळात त्याला आपण भलतेच कोणाला तरी पकडून आणले, याची जाणीव झाली. ससा समजून आपण चक मांजरीला पकडून आणले हे त्याला कळले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, कारण मांजरीने आपले पंजे गरूडाच्या मानेला लावून त्याचा गळा आवळण्यास सुरूवात केली होती. थोडयाच वेळात गरूड़ गुदमरून मेला आणि जमिनावर पडला.

तात्पर्य :  घाईने एखादे कार्य करायला गेले, तर कधी कधी त्याचे परिणाम उलटे होऊन अनर्थ ओढवतो.