आरोग्य

पालक खाण्याचे ‘हे’ फायदे


आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने
शाकाहार करणार्‍या व्यक्तींनी पालकाच्या
भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन,
चिकन, अंडी, मासे यांच्या मांसातून जेवढ्या
प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढ्याच
प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात.
पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा
(कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता या
आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे.
पालक रक्त शुद्ध करतो व हाडांना मजबूत
बनविण्याचे काम करतो.

बीमदोष


घरात ‘बीमदोष’ असेल तर असा बीम
एकतर सिलींग टाईल्सनी झाकून टाकावा किंवा
त्याच्या दोन्ही बाजूस बासर्‍या लटकवल्यानेही
हा वास्तुदोष निष्प्रभ होतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

टोमॅटोची आंबट-गोड चटणी


टोमॅटोची आंबट-गोड चटणी
तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.
फ्लॉवर वाळवायचा असेल, तर त्याची
फुले तोडून माळेत ओवून उन्हात वाळवावीत.

केस काळे करण्यासाठी


केस काळे करण्यासाठी
* एका लिंबाचा रस व दोन चमचे
आवळ्याचा खिस लोखंडी कढईत रात्री
भिजत घालावे. केसांना लावावे. धुतल्यावर
काळे होतात.
* नाश्त्यामध्ये केळाचे सेवन करणेसुध्दा
लाभकारी आहे. नाश्त्यात अथवा सायंकाळी
१ केळ जरूर खावे. याने आपले ब्लडप्रेशर
नियंत्रित राहील.
* थर्मास स्वच्छ करण्यासाठी
साबणाच्या पाण्यात वर्तमानपत्राचे तुकडे टाकून
१०-१५ मिनिटे ठेवून हलवून धुवावा

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

कोळ्याचे जाळे

एका माणसाने आपल्या घरात रेशमाचे किडे
पाळले होते. ते तेथे मजेने राहत असता एके दिवशी
तेथे जवळच एक कोळी जाळे विणू लागला. तेव्हा
रेशमाचा किडा त्याला म्हणाला,”
अरे मित्रा, इतया कष्टाने तू हे जाळे विणतोस,
त्याचा काही उपयोग आहे का कोणाला?”
त्यावर कोळी त्याच्यावर खेकसून म्हणाला,
“मूर्खा, तुला यातले काही कळते का? कशाला
मध्येच तोंड खुपसून माझ्या कामाचा खोळंबा
करतोस? असे फालतू प्रश्न मला पुन्हा विचारु
नकोस. मी जे जाळे विणतो,
ते जगाच्या कल्याणासाठी, एवढेही तुला
समजत कसे नाही?”
असे तो म्हणत आहे, तोच घराचा मालक तेथे
आला आणि त्याने झाडूच्या फटकार्‍याने कोळ्याला
जाळ्यासह झाडून दूर फेकून दिले.
तात्पर्य ः जे कृत्य आपल्याला महत्त्वाचे वाटते
तसे ते इतरांनाही वाटावे, हा तर मूर्खपणाच.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

जीभ बाहेर काढायला सांगून डॉटर काय तपासतात?

डॉटरांकडे गेल्यावर स्टेथास्कोपने तपासणे आणि जीभ बाहेर काढून तपासणे, या दोन गोष्टी डॉटर करतात; हे आपण लहानपणापासून बघत आलो आहोत. प्रसंगी कोणी डॉटरांना वाकडे दाखवून पूर्वी दिलेला इंजेशनाचा, कडू औषधाचा सूडही घेतला असेल! बर्‍याच आजारांचा परिणाम आपल्या जीभेवर दिसून येत असतो. जिभेला पचनसंस्थेचा आरसाच म्हटले जाते. काही काही आजारांचे निदान केवळ जीभ पाहून होऊ शकते. जीभ बाहेर काढायला लावून डॉटर जीभेचा रंग, जिभेवर जमलेला थर, चिरा, व्रण, जिभेचा आकार, जिभेच्या हालचाली आणि जिभेवरील स्वादांकुर बघतात. निरोगी व्यक्तीची जीभ लालसर, ओली आणि विशिष्ट आकाराची असते. जिभेवर थोडासा थर असतो, परंतु तो फक्त जिभेच्या मागच्या बाजूस असतो. काविळीमध्ये जीभ लाल न दिसता पिवळसर दिसते. शरीरात रक्त कमी झाले असेल, तर जीभ लाल न दिसता फिकट दिसते. ऑसिजनच्या कमतरतेमुळे जीभ निळसर दिसते. जिभेवर पांढरट- पिवळट थर जमला असेल तर आजारपणाचे किंवा अस्वच्छतेचे लक्षण असते. तापामध्ये तोंड आलेले असेल किंवा दातांच्या आजारामुळे किंवा कुठल्याही आजारामुळे तोंड उघडावयास त्रास होत असे किंवा तोंडाची स्वच्छता नीट राखली नसेल, तर जीभेवर थर जमतो, नाकाच्या काही आजारात, नाक चोंदल्यामुळे, तोंडाने श्वासोच्छ्वास करण्यानेही जिभेवर थर जमतो. टॉयफाइडच्या तापात जीभ ही फक्त मध्यभागीच थरयुक्त असते. या आजाराचे निदान करण्यासाठी जीभ बघण्याचा चांगला उपयोग होतो. पचनसंस्थेच्या आजारामध्ये, अजीर्ण झालेले असल्यास, क्षयरोगामध्ये, मधुमेहामध्ये जिभेवर थर जमतो. मोठ्या प्रमाणात शरीरातून पाणी गेले असेल तर; उलट्या-हगवण यांत, जीभ कोरडी दिसते. तीव्र आजारातही जीभ कोरडी दिसते. अर्धवट तुटलेल्या दातांमुळे जीभेवर जखमा दिसतात. जिभेच्या कडकपणा जाऊन ती शिथिल दिसत असेल, एका बाजूला झुकलेली दिसत असेल, तर ते पक्षाघाताचे लक्षण असते. बघा, डॉटरांना किती गोष्टी एवढ्याशा जिभेवरून कळतात!

पाककला

बाजरीची शंकरपाळी


साहित्य – बाजरीचे पीठ ३५ ग्रॅम, मैदा १० गॅ्रम, बेसन १० ग्रॅम, शेंगदाणे १५ ग्रॅम, गूळ
३० ग्रॅम, वेलदोडा १, दूध १० ग्रॅम.

कृती – प्रथम दुधात गूळ मिसळावा. नंतर त्यामध्ये वाटलेले शेंगदाणे, वेलदोड्याची पूड, बेसन आणि बाजरीचे पीठ मिसळून घट्ट मळून घ्यावे. आता हे पीठ अर्धा इंच जाडीत थापून सपाट करावे आणि आपल्याला हव्या त्या आकारात कापून शंकरपाळ्या कापून घ्याव्यात. नंतर गरम तुपात तळून घ्याव्यात.

आरोग्य

दररोज किती पाणी प्यावे?


पोषण विशेषज्ञ म्हणजेच न्यूट्रीशनिस्ट
यांच्या अनुसार, हे महत्त्वपूर्ण आहे की, आपण
आपल्या जीवनशैलीनुसार पाणी प्यावे. केवळ
दररोज आठ ग्लास पाणी पिण्याच्या नियमात
बांधून राहू नये.
पाणी आपल्या शरीराचे मुख्य रासायनिक
तत्व आहे आणि याचबरोबर हे एक नैसर्गिक
डीटॉसीफायरही आहे.

दैनिक पंचांग रविवार, दि. ३० जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, रेवती ०७|३४
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल.

वृषभ : आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयर संदर्भातील नवी संधी मिळण्याची शयता. कुटुंबाबरोबर आज घालवलेले आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात रहातील.

मिथुन : ठरविलेले काम पूर्ण करण्यासाठी काही प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. आपणास
आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. वेळ अनुकूल आहे.

कर्क : निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस.

सिंह : आजचा दिवस आपल्या कार्य- योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल.

कन्या : अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या.

तूळ : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील.

वृश्चिक : सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागेय्पुढे पाहू नका. व्यापार-व्यवसायात देवाणय्घेवाण टाळा.

धनु : हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. कोणाला संताप येईल कोणी दुखावले जाईल असे कही बोलू नका. मनावर संयम ठेवा. ार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल.

मकर : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ : आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कआपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा.

मीन : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

काही लोक झोपेत का चालतात?

काही लोक झोपेत का चालतात?

झोपेत चालणार्‍यांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. झोपेत बडबडणारे खूप असतात. त्यामानाने झोपेत चालणार्‍यांचे प्रमाण बरेच कमी असते. मोठ्या माणसांपेक्षा मुलांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी व्यक्ती झोपेतच उठते. घरात फिरते वा घराबाहेर पडून अनेक ठिकाणी जाऊ शकते. स्वतःला इजा करण्याची शयता मात्र फार कमी असते. अर्थात अपघात होऊ शकतात. खरेच का अशी व्यक्ती झोपलेली असते? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. ही व्यक्ती जागी नसतेच. पण झोपलेलीही नसते! ती मधल्याच कोणत्यातरी भ्रमिष्ट अवस्थेत असते. अशा वेळी व्यक्तीच्या मेंदूच्या कार्याचा आलेख तपासला, तर तो झोप वा जागेपणा या दोन्हींच्या सामान्यपणे आढळणार्‍या आलेखांपेक्षा वेगळा असल्याचे लक्षात येते.

गमतीची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता इतकी एकाग्र होऊ शकते की, दिवसभर न सुटलेले एखादे गणित ती व्यक्ती अशा अवस्थेत सोडवू शकते. वाईट म्हणजे अशा अवस्थेत ती व्यक्ती चोरी वा खूनही करू शकते. झोपेतून उठल्यावर मात्र त्या व्यक्तीला केलेल्या कृत्याबद्दल काही स्मरण नसते. साहजिकच बरेचसे गुन्हेगार शिक्षा टाळण्यासाठी झोपेत चालण्याचा विकार असल्याचे नाटक करतात; पण परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्यांच्या दाव्याची शहानिशा करता येते. झोप आपल्याला खूप आवश्यक असते. थकलेले शरीर झोपेनंतर ताजेतवाने होते; पण काही मनोविकारात वा इतर रोगांमध्ये झोपेवर परिणाम होतो. झोपेत चालण्याचा प्रकारही आढळून येतो. अशा व्यक्तीना मानसोपचाराचा उपयोग होऊ शकतो.