मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
19

तुझी पर्वा कोण करतो?

कुरणात चरता चरता ऊन फार कडक पडू लागले. म्हणून उन्हाने त्रासलेला बैल जरा गारव्याला थांबावे, म्हणून ओढ्याच्या वाहणार्‍या पाण्यात जाऊन उभा राहिला. तेवढ्यात एक माशी उडत उडत आली आणि बैलाच्या शिंगावर बसली. बैल आपल्याकडे लक्ष देत नाही, ते पाहून ती बैलाला गर्वाने म्हणाली, “अहो बैलोबा मी तुम्हाला न विचारता तुमच्या शिंगावर येऊन बसले, त्याबद्दल मला माफ करा. शिवाय माझ्या वजनाचा भार तुम्हाला सहन होण्यासारखा नसेल, तर मी आपली पलीकडच्या झाडावर बसेन बापडी.” त्यावर बैल म्हणाला, “बये जा नाही तर बस. मला तुझ्याशी काही देणे घेणे नाही. आता तू बोललीस, म्हणून मला कळले की तू येथे बसली आहेस. न पेक्षा तू येथे आहेस हे मला कळले देखील नसते. मग मी तुझी पर्वा कशाला करु?” तात्पर्य ः काहींना वाटते लोक आपल्याला फार किंमत देतात. पण खरे तर त्यांचे कवडीइतकेही महत्व नसते