मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
26

आजकाल देवीची लस का देत नाहीत?

‘देवीचा रोगी कळवा, हजार रूपये मिळवा’ हे वाय तुम्ही वाचले असेल. आता तर अशा घोषणाही बंद झाल्या आहेत. कारण जगातून देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दि. ८ मे १९८० रोजी ‘जगातून देवी’ या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे’, असे जाहीर केले. त्यानंतर जगात देवीचा एकही रूग्ण सापडलेला नाही. देवीच्या विषाणूंचेच जगातून पूर्णपणे उच्चाटन झाले आहे. पूर्वी देवी हा एक भयंकर रोग मानला जात असे. या रोगामुळे पुरळ येई. चेहर्‍यावर व्रणांमुळे विद्रुपता येई. कधी कधी अंधत्व येत असे वा मृत्युही होई. देवी झालेल्या व्यक्तीला ताप असे व तिला प्रचंड थकवा येई. देवी हा रोग भयंकर असल्याने तो होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस द्यावी लागे. ती लस देणे, देवीचे निर्मूलन झाल्याने १९८० नंतर बंद करण्यात आले. साहजिकच त्यांचा जन्म १९८० नंतर झाला आहे. त्यांना ही लस देण्यात आली नाही. देवीचे पुनरागमन होण्याचा धोका लक्षात घेऊन संघटनेने न्यूयॉर्क व मॉस्को या दोन ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये देवीच्या लसीचा पुरेसा साठा करून ठेवलेला आहे. त्यामुळे अचानक उद्भवणार्‍या गंभीर प्रसंगाला यशस्वीपणे तोंड देता येईल. देवीचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ञ सध्या कार्यरत आहेत.