कॉफी पिणे धोकादायक

अनेक लोकांना जेवताना किंवा जेवण्याच्या आधी किंवा नंतर कॉफी पिण्याची सवय असते. असे करणे नुकसान कारत ठरते कारण याने शरीरात आयरनचे शोषण बाधित होत. आपण ऍनिमिक असाल तर हे अधिक आवश्यक होऊन जाते.
फायदे पोर्टेबिलिटीचे

अलिकडच्या काळात पोर्टेबिलिटी सुविधेला महत्त्व आहे. जर एखादी मोबाईल कंपनी चांगली सेवा देत नसेल आणि अव्वाच्या सव्वा बिल आकारात असेल तर तोच नंबर कायम ठेवत आपण कंपनी बदलू शकतो आणि चांगल्या सेवेचा लाभ घेऊ शकतो. या प्रक्रियेला पोर्टेबिलिटी असे म्हणतात. अर्थात ही प्रक्रिया सर्वांनाच ठावूक आहे. त्याचबरोबर बँक खातेसुद्धा पोर्टेबिलिटी करता येते. आता आरोग्य विमा पोर्टेबिलिटीसुद्धा करता येणे शक्य झाले आहे. या सुविधेच्या माध्यमातून विमा पॉलिसीधारक उपलब्ध फायदे न गमावता चालू पॉलिसी अन्य कंपनीत स्थलांतरित करू शकतो. मग संबंधित पॉलिसीधारक नव्या कंपनीत नव्याने पॉलिसी काढू शकतो किंवा जुनी चालू ठेवू शकतो. आरोग्य विमा पॉलिसी स्थलांतरित करण्याचे फायदे आपल्याला सांगता येतील. आरोग्य विमा पॉलिसीची कंपनी बदलून घेताना काही फायदे आपल्या पदरात पडतात. त्याअनुषंगाने नवीन कंपनी आपल्याला चांगली आणि तत्परसेवेचा लाभ देऊ शकते. त्याचबरोबर तातडीने क्लेम सेटलमेंटची हमीही देते. नवीन आरोग्य विमा आपल्याला नवीन वैशिष्ट्यासह आणि लाभासह मिळू शकते. उदा. ज्येष्ठ नागरिकांना काही कंपन्या आरोग्य विम्याचा लाभ देत नाहीत. अशावेळी नवीन कंपनीत हा लाभ मिळू शकतो.
नवीन आरोग्य विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी स्वरूपात राहू शकते. अन्य कंपन्यांच्या तुलनेत हप्ता कमी बसवण्यासाठी आपण कंपनीशी वाटाघाटी करू शकतो. पोर्टेबिलीटीचा पर्याय हा सर्व वैयक्तिक, समूह स्वरुपात काढलेल्या आरोग्य विमा पॉलिसीला लागू आहे. त्याचबरोबर फॅमिली फ्लोटर पॉलिसीलाही ही सुविधा लागू आहे. समूह पॉलिसी असेल तर ती पॉलिसी वैयक्तिक पॉलिसीत रुपांतरित करता येऊ शकते. त्याचबरोबर वैयक्तिक पॉलिसी असेल तर समूह पॉलिसीत त्याचा समावेश करता येतो. त्याप्रमाणे वैयक्तिक पॉलिसीचे फॅमिली फ्लोटर पॉलिसीतही आपण रुपांतर करून त्याचा लाभ गेऊ शकतो. आपल्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार पॉलिसीत बदल करू शकतो. जुनी पॉलिसी अन्य कंपनीत बदलून घेताना जुन्याबरोबर नवीन लाभही त्यात समाविष्ट करू शकतो. कंपनीच्या अनेक ऑफर्स आपण पदरात पाडून पोर्टेबिलिटीचा लाभ घेता येतो. जुन्या पॉलिसीत बोनसचा समावेश नसेल तर नव्या पॉलिसीत बोनसचा पर्याय आहे का याची चौकशी करून त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यमान कंपनी बोनस देत असेल तर तो बोनस नवीन कंपनीसुद्धा पॉलिसीधारकाला प्रदान करू शकते.
निवृत्तीनंतरच्या सुखमय जीवनासाठी

बचतीला सुरवात करा – तुम्ही अजुनही बचतीला किंवा गुंतवणूकीला सुरवात केली नसेल तर आतापासूनच बचतीची सवय लावून घ्या. सध्याचा खर्च खूप असला तर कमीत कमी किती बचत करता येईल, याचा विचार करून त्यानुसार नियोजन करणे गरजेचे ठरतेे. मुख्यत्वे पेन्शन प्लॅनला प्राधान्य दिले पाहिजे. बचतीसाठी सरकारी आणि खासगी वित्तीय संस्थेच्या अनेक योजना आहेत. या योजनेबाबत आर्थिक सल्लागाराकडून माहिती घेऊन आपले उत्पन्न आणि गुंतवणूक याचा मेळ बसवून बचतीला सुरवात केली पाहिजे.
पेन्शन प्लॅनची माहिती घ्या : नोकरदार असाल तर आपल्याला मिळणार्या पेन्शनची आणि लाभाची माहिती घेणे गरजेचे आहे. आपली नोकरी, वय आणि मिळणारा लाभ याचा ताळेबंद करून मिळणारी पेन्शन समाधानकारक असेल का, याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. वैयक्तिक लाभ किती मिळणार आहेत, याचीही कंपनी किंवा सरकारी कार्यालयातून माहिती घेणे हिताचे ठरू शकते. जर आपण नोकरी बदलणार असू तर पेन्शनच्या योजनेत किती फरक पडणार आहे, हेही जाणून घेतले पाहिजे. पूर्वीच्या नोकरीतून निवृत्ती योजनेतून किती फायदा झाला, जोडीदाराला किती लाभ मिळू शकतो याचा अभ्यास केला पाहिजे.
निवृत्तीनंतरची गरज – निवृत्तीनंतरचे जीवनमान खर्चिक असते. आजारपणे, लग्नसमारंभ, घरखर्च आदी बाबींचा याच समावेश होतो. तरुणवयात असणारा उत्पन्नाचा स्त्रोत निवृत्तीमुळे थांबल्याने आपण केलेल्या बचतीवरच उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या मते, निवृत्तीसाठी सुमारे 70 टक्क्यांपर्यत बचत केली पाहिजे. त्यापेक्षा चांगली कमाई करणार्या व्यक्तीने तर ही बचत 90 टक्क्यांपर्यत न्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवृत्तीनंतरही आपल्या राहणीमानात, जीवनशैलीत फरक पडू नये याची काळजी आपण अगोदरच घेणे गरजेचे आहे.
बचत मोडू नका – आपण नियोजन करून केलेली बचत किंवा गुंतवणूक मोडण्याची वेळ येते. उदा. अचानक उदभवलेले आजारपण, शिक्षण, घर आदी गोष्टीसाठी पैसे जमविताना होणारी दमछाक करण्यापेक्षा केलेली बचत, गुंतवणूक काढण्याचा विचार करतो. विशेषत: भविष्य निर्वाह निधीतून पैसा काढण्याचा अनेक जण विचार करतात. शक्यतो अशा योजनातील पैसे काढल्यामुळे व्याजावर आणि करसवलतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी तात्पुरते कर्ज काढून किंवा अन्य खर्चात कपात करून निधी उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक किंवा बचत केली तर फायदे चांगले मिळतात. कमी जोखमीचे आणि जादा परताव्याचे फंड घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. योग्य आर्थिक नियोजन केल्यास निवृत्तीनंतरचे जीवन सुखमय होऊ शकते.
आयपीओ म्हणजे काय?

प्राथमिक खुला देकार म्हणजे ‘आयपीओ’. हा एक खासगी किंवा भागिदारीतील कंपन्यांमधील समभाग पहिल्यांदा जनतेस विकत घेण्यासाठीचा प्रस्ताव ठेवत असतो. याद्वारे कंपनी आपले सर्व समभाग विकू शकते किंवा काही भाग राखीव ठेवून उरलेली मालकी जनतेला समभागाद्वारे विकत देत असते. बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या आयपीओतून कंपनी भांडवल उभारणी करत असते. कालांतराने कंपनीला फायदा झाल्यास शेअरवर लाभांश जाहीर करून सभासदांना आर्थिक सुरक्षा आणि कंपनीबाबतची विश्वासर्हता प्रदान करते. आयपीओ किती विकायचा हे कंपनी ठरवत असते. आयपीओचा सरळ साधा अर्थ म्हणजे पैसा जमविण्यासाठीची एक पद्धत आहे. जनतेला जास्तीत जास्त शेअर किंवा समभाग विकून कंपनीसाठी भांडवल गोळा करण्यात येते. यामाध्यमातून जमविलेला पैसा कंपनी अनेक ठिकाणी गुंतवते किंवा पायाभूत सुविधेसाठी त्याचा वापर करते. कंपनीच्या विस्तारासाठीही आयपीओच्या माध्यमातून पैसा जमविला जातो. कंपनीचे जेवढे जास्त शेअर विकले जातात तेवढ्या प्रमाणात भांडवल जमा होते. सरकारी उपक्रमातील अनेक कामे, प्रकल्प हे आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या पैशातून पूर्ण केले जातात.
आयपीओ म्हणजे काय? : जर कंपनीने सर्वसामान्यांसाठी शेअर खुले करण्याचे ठरविले तर त्याला आयपीओ म्हणतात. अशा पद्धतीने पैसा उभारल्यास कंपनी ही खासगीतून सार्वजनिककडे वाटचाल करत असते. शेअर बाजारात व्यवहार सुरू केल्यानंतर तीन ते चार महिन्यात आयपीओ आपण घेऊ शकतो. दरमहिन्यात अनेक कंपन्या, सार्वजनिक कंपन्या, सरकारी उपक्रम हे बाजारात आयपीओ आणत असतात. त्याचे मूल्यही कंपनीच्या धोरणानुसार ठरत असते. पहिली पायरी: आयपीओ घोषित करण्यापूर्वी कंपनी ही एखादी गुंतवणूक करणारी बँक किंवा आर्थिक संस्था ही करारतत्वावर ताब्यात घेते. ही बँक ताब्यात घेतल्यानंतर कंपनी आणि बँकेचे अधिकारी भांडवल उभारणीबाबत चर्चा करतात आणि कंपनीला किती भांडवलीची गरज आहे, किती शेअर्स बाजारात आणायचे, आयपीओ किती ठेवायचा, आयपीओची मुदत किती दिवस ठेवायची आदींबाबत चर्चा केली जाते. त्यानुसार कंपनीचा किंवा सरकारी उपक्रमाचा आयपीओ निश्चित केला जातो. त्यात बँकेच्या कमिशनचाही समावेश असतो. बँकेचा सहभाग: बँक किंवा बँकेचा समूह हा आयपीओतून पैसा उभारणीसाठी मदत करत असतात. आयपीओतून मिळणार्या पैशातून बँका नफा काढत असतात. आयपीओपूर्वीची किंमत आणि आयपीओ यातील तफावतीमधून जमा होणारा पैसा बँकेकडे जातो. समभाग हे विक्रीसाठी खुले केल्यानंतर आणि बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर बँका हे ग्राहकाच्या खरेदीवरून विश्वासर्हता मिळवत असतात. जसजसी आयपीओची तारीख जवळ येते तसतसे बँकर्स आणि कंपन्या हे किंमत ठरवतात. ही किंमत बाजाराची सद्यस्थिती आणि कंपनीचे धोरण यावर ठरविले जात असते.
क्रेडिट शिफ्ट करताना…
आपले बिल आणि कर्ज हे एका बँकेतून दुसर्या बँकेत ट्रान्सफर करता येते, हे आपल्याला ठाऊक आहे का. या प्रक्रियेलाच आपण बॅलेन्स ट्रान्सफर असेही म्हणतो. मात्र प्रामुख्याने त्याचा वापर हा व्याजाचे ओझे कमी करण्यासाठी केला जातो.

क्रेडिट कार्डमध्ये कर्जाची विभागणी : एखादे मोठे कर्ज असेल तर त्याची विभागणी वेगवेगळ्या क्रेडिट कार्डमध्ये करणारे अनेक कार्डधारक दिसतात. ते अशा प्रकारची कृती का करतात, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. यामागे कारण म्हणजे कार्डवर कमी भरणा असेल तर आपसूक व्याजाचे ओझे कमी राहू शकते. मात्र उर्वरित कर्जावर वार्षिक 40 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते. बॅलेन्स ट्रान्सफरने आपण एवढ्या मोठ्या प्रमाणातील व्याज देण्यापासून वाचू शकता. क्रेडिट कार्ड देणार्या अनेक बँका अशा आहेत की, दुसर्या बँकच्या क्रेडिट कार्डमध्ये रक्कम ट्रान्सफर केली तरी काही महिन्यांपर्यंत व्याजही आकारत नाहीत. साधारणत: 6 महिन्यांचा सवलतीचा कालावधी असतो. मात्र यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागते. काही प्रकरणात तर आपल्याला एकूण आऊटस्टँडिंगवर दर महिन्याला एक ते दोन टक्क्यांपर्यंत दराने व्याज द्यावे लागते.
असा लाभ उचला : बॅलेन्स ट्रान्सफरच्या सुविधेवर काही ठिकाणी सहा महिन्यांपर्यंत व्याजात सवलत मिळते असल्याने कर्जदाराला मोठी सवलत मिळते.यादरम्यान कर्जाच्या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी बर्यापैकी कालावधी मिळतो. अर्थात व्याजमुक्तीच्या काळात आऊटस्टँडिंग क्लिअर न झाल्यास सामान्य दराने व्याजाची आकारणी होते. काही कार्ड असेही असतात की त्यात सहा महिन्याच्या अगोदर बॅलेन्स ट्रान्सफरची सुविधा मिळत नाही. तीन मुद्दे महत्त्वाचे : बॅलेन्स ट्रान्सफर करताना नवीन बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि प्रोसेसिंग फीस आणि त्याच्या व्याजदराबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. कधी कधी छुप्या मार्गाने शुल्क आकारणी होते. जर आपण सध्याच्या क्रेडिट कार्डचे बिल किंवा कर्ज भरू शकत नसाल आणि भरभक्कम व्याज द्यावे लागणार असेल तर आपण क्रेडिट ट्रान्सफर करू शकता. आपला पुरेसा वेळ देणार्या बँकेच्या क्रेडिट कार्डची निवड करावी. जेणेकरून कर्ज फेडण्यासाठी वेळ मिळेल.
चक्रवाढ व्याजाचे फायदे

गुंतवणुकीसाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी सोने, जमीन किंवा मुदत ठेव याठिकाणी गुंतवणुकीला प्राधान्य असायचे. आज शेअर बाजार, म्युच्युअल फंड, गोल्ड इटिएफ, सरकारी बॉंड याचा अधिक विचार होताना दिसून येतो. आर्थिक गुंतवणुकीबात नवीन पिढी सजग झाली असून मुदत ठेव किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणुकीची कायम संधी देणार्या शेअर बाजाराकडे ओढा वाढला आहे. तरीही अनेक गुंतवणुकदार पैसा बुडेल या भीतीपोटी शेअर बाजारात पैसा टाकण्यात टाळाटाळ करतात. परंतु यातूनही एक मध्यमार्ग आहे. तो म्हणजे म्युच्युअल फंड आणि त्यातही एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). तुमचे वय 25 असेल तर तुम्ही चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून लखपती होण्याची शक्यता अधिक आहे. जर तुम्ह 35 ओलांडली असेल तर गुंतवणूक डबल करून लखपती होऊ शकता. चक्रवाढ पद्धतीतून मिळणारा परतावा हा कधी कधी कल्पनेपेक्षा अधिक देणारा ठरतो. ठराविक काळानंतर जमा झालेली रक्कम ही पाल्याच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी,कर्जफेडीसाठी किंवा घर घेण्यासाठी मदतगार सिद्ध होते. चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज हे मागील गुंतवणुकीपेक्षा अधिक गुंतवणूक वाढवणारे ठरते. त्याचबरोबर एखादा कर्जदार असेल तर त्याची अनेक वर्षे चक्रवाढ व्याजाने आकारल्या जाणार्या व्याजदरातून त्याची सुटका होत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त कर्जखात्यात आगावू रक्कम भरणे हिताचे ठरते.
चक्रवाढ व्याज कसे काम करते? – बारा वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये बचत केल्याचे गृहीत धरा. आठ टक्के चक्रवाढ व्याजदराने ही रक्कम साधारणत: 1 लाख 84 हजार इतके होते. जर पुढे बचत सुरु ठेवली नाही तर ती पंधरा वर्षांनंतर त्याची किंमत सुमारे 2 लाख 70 हजार इतकी होते. एसआयपीतून किमान दहा आणि जास्तीत जास्त 18 ते 20 टक्के व्याज मिळालेले आहे. बाजारातील प्रवेश आणि बाहेर पडण्याची वेळ कशी निवडता त्यावर फायदा-नुकसान अवलंबून असते. दीर्घकाळ गुंतवणूक सुरू ठेवल्यास फायदाही तेवढ्याच प्रमाणात आपल्या पदरात पडतो. किमान तीन वर्षे तरी एसआयपी सुरू ठेवावी, असे मानले जाते.
नफा-तोट्यात समतोल – चक्रवाढ पद्धतीत गुंतवण्यात येणारी रक्कम ही स्थिर राहते. जर त्यात नियमित गुंतवणूक करत असाल तर त्यात फारसे नुकसान होत नाही. कालांतराने झालेले नुकसान भरून निघते. कधी कधी कमी कालावधीतही चांगला नफा मिळवून बाहेर पडू शकता. एसआयपीचा विचार केला तर नुकसानीच्या काळात जास्तीत जास्त यूनिट आपल्या खात्यात जमा होतात आणि बाजार वरच्या पातळीवर असताना त्याच युनिटला अधिक भाव येतो. त्यातील नफा काढून आपण मुद्दल बाजारात ठेवू शकतो. त्यामुळे बाजार पडतो तेव्हा गुंतवणुकीची संधी असते, असे नेहमी म्हटले जाते.
कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल ? – जर तुमची एसआयपी सुरू करण्यासाठी पुरेशी तयारी झाली नसेल तर तुम्ही कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. कर्जाचे मुद्दल कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न करून नियमित इएमआय व्यतिरिक्त जादा रक्कम कर्जात भरण्याचा विचार करा, जेणेकरून चक्रवाढ व्याजातून मुक्ती मिळेल. जर तुम्हाला कर्जमुक्तीचे जीवन हवे असेल तर तुम्ही नेहमीच अधिक रक्कम भरण्याची तयारी करायला हवी. यामुळे लवकर तुमचे कर्ज फिटेल आणि नव्याने गुंतवणूक करण्यासाठी मार्ग मोकळा होईल.
व्याजपद्धत सर्वांनाच फायदेशीर ? चक्रवाढ व्याजपद्धतीने मिळणारी रक्कम ही सर्वांनाच फायदेशीर ठरते. उच्च गटातील किंवा उच्च उत्पन्न गटातील मंडळींना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय असतात. परंतु ज्याचे उत्पन्न मर्यादित आणि कमी आहे, अशा मंडळींना गुंतवणुकीवर मर्यादा येतात. त्यामुळे कमी गुंतवणुक असूनही चक्रवाढ व्याज मिळत असेल तर त्याचा निश्चितच फायदा मिळतो. बारा वर्षांसाठी आठ टक्के चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज हे गुंतवणूक दुप्पट करणारे ठरते. चोवीस वर्षात हीच गुंतवणूक चौपट झालेली असते.
आज बचत, उद्या फायदा ? आजच्या खर्चातून काही पैसे वाचवता आले तर भविष्यासाठी ही गुंतवणूक किंवा बचत निश्चित फायदेशीर ठरते. प्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफे यांच्या मते, अगोदर गुंतवणूक करा आणि राहिलेल्या पैशातून खर्च करा. बफे यांचा हा संदेश मोलाचा आहे आणि फायदेशीर आहे. आज खिशाला किंवा काही प्रमाणात सुखसोयीना कात्री लावत बचत, गुंतवणूक केल्यास उद्याचा दिवस निश्चितच सुवर्णकाळ घेऊन येणारा ठरू शकतो.
विक्रमी घोडदौड, पुढे काय?

देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांची घोडदौड कायम असून, सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक गतसप्ताहाखेरीस नव्या विक्रमी टप्प्यावर विराजमान झाले.भांडवली बाजारात तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 295.72 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 803.14 अंशांनी वधारून 64,718.56 पातळीपर्यंत झेपावला. दिवसभरात त्याने 64,768.58 अंशांची सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 216.95 अंशवाढीने 19,189.05 वर स्थिरावला. निफ्टीने दिवसभरातील सत्रात 19,201.70 अंशांची सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. धातूक्षेत्र वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचा झंझावात दिसून आला. साप्ताहिक स्तरावर विचार करता निफ्टीमध्ये 2.8 टक्क्यांची वाढ झाली असून जून महिन्याचा विचार करता ही वाढ 3.53 टक्के इतकी आहे.
टेक्निकल चार्टवर पाहिल्यास निफ्टी50 मधील 43 समभाग आणि बीएसई सेन्सेक्समधील 27 समभाग आपल्या 200 डीएमए (डेली मूव्हिंग ऍव्हरेज) च्यावर आहेत. 200 डीएमएला गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स सर्वाधिक महत्त्वाचा मानतात. या स्तराच्या वरच्या पातळीवर समभाग असणे यातून त्याची ताकद दिसून येत असते. तसेच अल्पावधीत किंवा मध्यम काळात त्या समभागामध्ये तेजी दिसून येऊ शकते असेही मानले जाते. त्याचबरोबर या महत्त्वाच्या पातळीच्या खाली किंमत आल्यास तो घसरणीचा संकेत मानला जातो आणि त्यानुसार गुंतवूकदार अशा समभागांची विक्री करु लागतात. गतसप्ताहातील तेजीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एचडीएङ्गसी बँक आणि एचडीएङ्गसीच्या विलीनीकरण. 1 जुलैपासून याचा प्रभाव दिसणार असल्याने या समभागामध्ये जबरदस्त खरेदी झाली. या समभागांचे निर्देशांकातील प्राबल्य अधिक असल्याने निफ्टी-बँकनिफ्टीला बूस्टर मिळाला. जागतिक बाजारातही हळूहळू वातावरण बदलत आहे. अमेरिकेमध्ये पहिल्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे सकारात्मक आले आहेत. बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे अमेरिकन बाजारातही तेजीचे वारे वाहू लागले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर चालू आठवड्याचा विचार करणे गरजेचे आहे. एसजीएक्स निफ्टीमध्ये शुक्रवारी 73 अंकांची वाढ झाली आहे. डाऊ फ्युचर्स 257.1 अंकांनी वधारला आहे. त्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात पुन्हा एकदा मोठ्या गॅपऍपने होण्याची शक्यता आहे. निफ्टीसाठी आता 19200 च्या पातळीवर सर्वांत पहिला अडथळा आहे; तर त्यानंतर 19300 च्या पातळीवर अडथळा आहे. हे दोन्ही अडथळे पार केल्यास 19500 ची पातळी निफ्टी गाठताना दिसू शकते दुसरीकडे निफ्टीसाठी 19050 च्या पातळीवर पहिला आधार आहे. तो टिकला नाही तर 18900 आणि 18800 ची आधारपातळी आहे. याखाली निर्देशांक रेंगाळू लागल्यास किंवा बंदपातळी आल्यास घसरण दिसू शकते. परंतु बाजारातील तेजीचा प्रवाह कायम असल्याने या आठवड्यात बाय ऑन डिप्स ही रणनीती प्रभावी टरेल. बँक निफ्टीसाठी 45000 ते 45,200 या अडथळा पातळी असून 44500 च्या स्तरावर भक्कम आधार आहे. वास्तविक, या सार्वकालिक उच्चांकी पातळी असल्याने टेक्निकल चार्टसाठी येथे मोकळे आकाश आहे. याला अनचार्टेड टेरीटरी म्हणतात. त्यामुळे ट्रेडर्ससाठी हा काळ जोखमीचा आहे. बाजार येत्या काळात आणखी वधारणार असला तरी सध्याच्या उच्चांकी पातळीवर खरेदी करणे प्रचंड जोखमीचे ठरू शकते. तरीही आयसीआयसीआय लोंबार्डचा समभाग 1340 च्या पातळीवर खरेदी करुन 1550 चे मध्यमकालीन लक्ष्य ठेवता येईल. वाहनविक्रीच्या आकड्यांमध्ये मारुती सुझुकीची विक्री 2 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. याचा प्रभाव या समभागावर दिसू शकतो. टीसीएसचा समभाग 3420 रुपयांचे लक्ष्य आि 3265 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. ज्युबिलंट ङ्गूडस्चा समभग 530 रुपयांचे लक्ष्य आणि 490 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज बाजारातील घसरणीच्या काळात ऑटो, रिअल इस्टेट, सिमेंट, ग्राहकोपयोगी वस्तू आदींच्या समभागात खरेदीची संधी साधता येईल.
अर्थजगत

भारतीय नवउद्यमींना म्हणजेच स्टार्टअपना मिळणार्या निधीचा ओघ चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत आटला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नवउद्यमींना मिळणारा निधी 79 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतीय नवउद्यमी कंपन्यांमध्ये मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल 18.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. यंदा याच कालावधीत ही गुंतवणूक 3.8 अब्ज डॉलरवर घसरली आहे. देशातील नवउद्यमींनी यंदा 293 भांडवल मिळवण्याचे व्यवहार केले आहेत. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ही संख्या 727 होती, अशी माहिती व्हेंचर इंटेलिजन्सने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. मागील काळात काही नवउद्यमी कंपन्यांतील गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. भारत पे, ट्रेल, झिलिंगो, गोमेकॅनिक आणि मोजोकेअर या कंपन्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे चर्चेत आल्या होत्या. याचा परिणाम नवउद्यमी कंपन्यांमध्ये होणार्या गुंतवणुकीवर होत आहे.
आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र बालकांचे आजार

एचआयव्हीग्रस्त रुग्णामध्ये मात्र या दोन पेशींम धील प्रमाण उलटे होते. CD4 पेशींची संख्या कमी होऊ लागते व CD8 पेशींची संख्या वाढू लागते. त्यामुळे CD4 पेशींचे प्रमाण वाढण्याची चिकित्सा करावी लागते. कारण रुग्णांचे मानसिक दौर्बल्य असेल तर व्याधिक्षमत्व कमी होते व आजार वाढीस लागतो. एचआयव्हीग्रस्त रुग्ण वर्षानुवर्षे दैनंदिन आयुष्य जगू शकतो. आणि तेही औषधोपचाराशिवाय. मात्र जेव्हा रक्तातील व्हायरल लोड वाढू लागतो आणि CD4 व CDB पेशींची संख्या कमी होते तेव्हा आम्ही औषधोपचार सुरू करतो. आधुनिक उपचारांमध्ये CD4 CDB पेशींची संख्या बघून रुग्णाला अँटिरेट्रोव्हायरल उपचार सुरू करतात. आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सेमध्ये रुग्णाचे मनोबल वाढण्यासाठी शिरोधारा अत्यंत उपयुक्त ठरते. शारीरिक दौर्बल्य कमी करण्यासाठी स्नेहन, घृतपान, पिंडस्वेदन, तिक्तक्षीर बस्ती, मांसरस बस्ती यांचा उपयोग करता येतो. पंचकर्म चिकित्सेबरोबर अभ्यंतरतः रसायन चिकित्सा करता येते. अश्वगंधा, शतावरी, वसंत कुसुमाकर असे व्याधिप्रतिकारशक्ती वाढवणारे सुवर्णकल्प तसेच च्यवनप्राशसारखे अवलेह उपयोगी पडतात. आयुर्वेदीय उपचारांनी आजार पूर्ण बरा होत नसला, तरी शारीरिक व मानसिक बल वाढून CD4 व CDS पेशींची संख्या बरेच दिवस कायम ठेवता येते. CD4 चे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे रुग्णाची व्याधिप्रतिकारशक्ती, आयुर्मान वाढते व ते चांगल्या पद्धतीचे आयुष्य जगू शकतात, असा आत्मविश्वास येतो.
डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे
दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर
अहमदनगर मोबाईल नं- 8793400400



