समुपदेशन-सुखातही वेदना?

0

तिच्या मुख्य तक्रारी तीन होत्या

1) न्यूनगंड – सासरच्या श्रीमंती वातावरणात तिला न्यूनगंड वाटत होता. शिवाय नोकर चाकर, वागण्याच्या पद्धती, मॅनर्स, याचं दडपण होतं. त्याबद्दल तिला म्हटलं श्रीमंती असून त्यांनी तुला मागणी घातली ना? म्हणजे त्यांनी तुला स्वीकारले आहे म्हटल्यावर न्यूनगंड वाटण्याचे कारण नाही.

2) अपराधीपणा – आजारी आईला सोडून गेले. माहेरी सगळे गरिबीत असताना आपण ऐशारामात राहतो. यावर तिला म्हटले, उलट तुझे लग्न चांगल्या घरी आणि विनासायास पार पडल्यामुळे त्यांचे मोठे दडपण कमी झाले. मोठी जबाबदारी सहज पार पडली. त्यांची आज जरी गरिबी असली तरी भावाचे शिक्षण झाले की परिस्थिती बदलेल. कोणतीच परिस्थिती कायम राहत नाही. यावर तिचा पती स्वतःहून म्हणाला, आपण तुझ्या माहेरी मदत करू शकतो, भावाच्या शिक्षणालाही मदत करू. हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात कृतकृत्यता आणि कृतज्ञता ओतप्रोत जाणवली.

3) पोकळी – सासरी कोणतेच काम नसल्यामुळे पोकळी जाणवत होती आणि विचारांचा त्रास होत होता.

तिला विचारलं तुला कॉलेजमध्ये जायला आवडेल का? तिच्या डोळ्यात चमक दिसली. पण ती म्हणाली आता कसे शक्य आहे? का नाही? तिच्या पतीने लगेच विचारले. जूनपासून लगेच सुरू कर. बीए, बीकॉम, बीएससी, तुला हवे ते. हे ऐकल्यावर सारे प्रश्न सुटल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसले. बहुधा तसेच झाले असावे म्हणून तिने फोन केला होता. मॅडम.. गुड न्यूज आहे माझे एसवायबीकॉम पूर्ण झाले पण टीवाय जमेल असे वाटत नाही. का गं? अहो मुलगा झाला आहे मला त्यामुळे जमणार नाही. अरे वा अभिनंदन! आता तू एमए तर झालीस ना? टीवाय बीए नंतरही करू शकशील सध्या तो विचारच नको. मोकळेपणाने बोलल्यावर सारेच प्रश्न सहज सुटले अर्थात यात तिच्या पतीचा मोठेपणा खूपच होता. पण समुपदेशनामुळे हे सहज शक्य झाले. यासाठी तीन सेशन लागले.

शांभवी मंगेश जोशी

9673268040 इन साईट कौन्सिलिंग सेंटर

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

शक्तियां अपने हाथ रखने की इच्छा है। दूसरों पर शासन करने की इच्छा है। चाहे वे कैसे भी हो उनको देखते ही बाबा को याद करें और शांति या प्रेम की तरंगे दे। अगर तरंगे देते समय मन में असुविधा हो तो उस समय किसी अन्य स्नेही आत्मा को तरंगे दो और कठिन व्यक्ति को उसके पास खड़ा हुआ देखे। आपकी तरंगे उसको भी पहुँच रही हैं। कठिन लोग अर्थात् आपकी बहू, सास, ससुर, पति, बोस या कोई अन्य है। जैसे ही ऐसे लोगों से आमना-सामना हो तो तुरंत मन में किसी स्नेही आत्मा को देखो, भगवान को देखो या इष्ट को देखो। स्नेही आत्मा में आपकी मम्मी, पापा, भैया या कोई भी अन्य व्यक्ति चाहे वह बचपन के दोस्त हों या वर्तमान में हो, किसी एक को चुन लें। उन्हें मन में शांति की तरंगे देते रहो। इससे आपको तनाव नहीं होगा। इससे आपके मन में से निकली शांति की तरंगे कठिन व्यक्ति को भी बदल देंगी। याद रखो हम किसी को भी सिर्फ स्नेह से बदल सकते हैं या योग से। याद रखो कि ऐसे लोगों का शक्ति का केन्द्र कहीं और होता है।

कई बार ड्राइवर और कुक भी शक्ति के केन्द्र होते हैं वह तो केवल कठपुतली होते हैं कठिन लोग अक्सर कमजोर होते हैं वे दूसरों को डरा-धमका कर रखते हैं ताकि उनकी कमजोरी पता न चले। वह अपने क्षेत्र में अक्सर निपुण नहीं होते। ऐसे व्यक्ति प्यार के भूखे होते हैं। इसलिये मन को हर समय उनकी सेवा में और स्नेह की तरंगे देने में लगाये रखो। अवसाद अर्थात् अकेलापन, उदासी, निराशा, चिड़चिड़ापन दर्शाता है कि व्यक्ति अवसाद की तरफ बढ़ रहा है। गुमसुम रहना, चुपचाप रहना, थकान महसूस होना, बहुत ज्यादा सोना, नींद नहीं आना, भूख नहीं लगना या बहुत ज्यादा लगना, यह अवसाद के ही लक्षण हैं। मुँह सूखने लगे, सीने में भारीपन रहने लगे, दिल की धड़कन बार-बार बढ़ती है, बदन में दर्द रहने लगे, हर बात में व्यक्ति अपने को दोषी मानने लगे तो यह भी अवसाद ही है। इसका कारण बचपन में मिली प्रताड़ना, तिरस्कार, कठोरता, अधिक दण्ड अवसाद का मूल कारण है।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

याउलट शिष्याने भक्ती भावाने गुरूंची आराधना (उपासना) करायला शिकले पाहिजे. जर त्याने असे केले तर नक्कीच सर्व दुःखांपासून मुक्ती मिळविण्यासाठी किंवा दुःख हलके करण्यासाठी सर्वतोपरी मदत त्याच्यापर्यंत पोहचते. त्याचा आत्माही आयुष्याचा (जीवनाचा) खुराक मिळवून व अमृतपान केल्याने बळकट होतो. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यावर मनुष्याचे नियंत्रण नसते जसे रूपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग घरी गेला. त्याने त्या चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत, आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत का वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला.

1) जीवनातील सुख – दुःख, शारीरिक म ानसिक आराम किंवा त्रास.

2) श्रीमंती – गरीबी, संपत्ती, संपन्नता, सत्ता, दारिद्रय किंवा समृद्धी.

3) मान सन्मान, यश – अपयश, उपेक्षा व तिरस्कार हे सर्व सामान्य जीवनाशी निगडीत आहे. आणि ते पूर्व निर्धारीत आहे मनुष्याचे सर्व प्रयत्न जास्तीत जास्त सुख सुविधा, आनंद मिळविणे व दुः खांना टाळण्यासाठी होत असतात. त्याला हे समजत नाही की जीवन हे ढगांसारखे क्षणभंगुर आहे, सावली सारखे आहे, एक आभास किंवा मृगजळासारखे आहे, जे वाळवंटात फिरणार्‍या पथिकाला छळत असते व फसवत असते. संत सद्गुरू यांच्या सत्संग व भजन अभ्यासाद्वारे (ध्यानधारणेद्वारे) जीवाला संसार व त्यातील पदार्थांचे मायावी स्वरूप समजते व त्यामध्ये त्यास चिरंतर जीवनाचा स्त्रोत सापडतो ज्यास प्राप्त करून त्याचा रोम रोम तृप्त होतो व त्यास सदा सर्वदाच्या समाधानाची प्राप्ती होते. त्यानंतर आयुष्य किंवा जीवन त्याच्यासाठी एक मधुर गीत बनते. हे कर्म असे आहेत ज्यांना आपण पृथ्वीवर आपल्या वर्तमान जीवनात दररोज करतो. ह्या कर्मापासुन वाचण्यासाठी प्रत्येक शिष्याने आपल्या जीवनाच्या मन- वचन-कृतीला, सदाचारी शुद्ध पवित्र बनवावे आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी टाळाव्यात अशी सुचना केली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर संकटे येणार हे निश्चित आहे. कारण पापाची शिक्षा मृत्यु आहे म्हणजेच जीवनाचा आधार किंवा मुल्यांचा मृत्यु.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

हा नोकर चोर आहे.

एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, ‘‘माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.’’ बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, ‘‘की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.’ शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज विजेचा शॉक बसल्यास काय होते?

लहान मुले फार उद्योगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडचा बल्ब काढून दुसरीकडे लाव, असली काही कामे करायला मुले नेहमीच तयार असतात. कधी कधी मात्र या गोष्टी अंगलट येतात. जुनाट वायरवर ओले कपडे वाळत घालणे, प्लगमध्ये खिळा घालणे, बल्ब होल्डरमध्ये बोट घालणे इत्यादीमुळे विजेचा शॉक बसतो. विजेचा शॉक बसला नाही, असा माणूस सापडणे अवघडच आहे. पाणी तापवण्यासाठी बर्‍याच घरात वापरल्या जाणार्‍या इमर्शन रॉडचे बटण चालू असताना पाण्यात हात घातला तरी शॉक बसतो. विजेचा शॉक हा तसा आपल्याला बारीकसा वा दोन मिनिटे झिणमिण्या आणणारा अपघात वाटला, तरी प्रत्यक्षात मात्र तो जीवघेणा असा गंभीर अपघात ठरू शकतो. आकाशात चमकणारी वीज कोणाच्या अंगावर पडली, तर ती व्यक्ती वाचत नाही. तिचा जळून अगदी कोळसा होऊन जातो. घरगुती विजेमुळे मात्र कमी-अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात. डीसी वीज ही एसीपेक्षा जास्त घातक असते. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडची वीज एसी आहे. आकाशातून पडणारी वीज मात्र डीसीप्रमाणे कार्य करते.

विद्युत धक्क्याचे व शॉकचे दोन प्रकारे परिणाम होतात. एक म्हणजे भाजणे व दुसरे म्हणजे मज्जासंस्था, स्नायू व हृदय यांच्यावर विद्युतप्रवाहाचा परिणाम होणे. विद्युतधक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित होण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. शॉकमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे दूर फेकले जाणे, खाली पडणे अशा मोठ्या हालचाली होऊ शकतात. विजेचा शॉक खूप मोठा असेल, तर बेशुद्धी येते किंवा मृत्यूही ओढवतो. वीज आणि विकास यांची सांगड आहे, हे आपण औद्योगिक क्रांतीपासून अनुभवतोय. पण वीज आणि विनाश यांच्या परस्परसंबंधाची जाणीव आपल्याला अपघातातून अधूनमधून होत असते. वीज हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना नीट काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.

वास्तू

घरातील वस्तूंचे स्वतःचे योग्य असं स्थान असते. त्या ठिकाणीच त्या असाव्यात. वाटेल तिथे वस्तू ठेवल्यास आपल्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो. अशामुळे मनःशांती ढळते. जर घरामधील पलंग दाराजवळ ठेवला असेल तर रात्री शांत झोप लागत नाही. सतत बेचैन वाटत राहते. यात्रीची झोपही पूर्ण होत नाही. म्हणून दरवाज्याजवळ पलंग कधीही नसावा.

सल्ला

डोळ्यांना आराम मिळण्यासाठी कापडी घडी बर्फाच्या पाण्यात बुडवून ही पट्टी डोळ्यावर ठेवावी.

त्वचा उजळण्यासाठी

गळा, मान येथील त्वचेची स्वच्छता करण्यासाठी हळद + लिंबू रस + दूध यांचे मिश्रण करून भागावर चोळावे. याने त्वचा उजळते.

चॉकलेट बिस्किट

साहित्य – मैदा 1 किलो, पिठीसाखर 500 ग्रॅम, लोणी 500 गॅ्रम, चॉकलेट सॉस गरजेनुसार.

कृति – मैदा व साखर चाळून घ्या व लोण्यासोबत मळून घ्या. मैद्याची बिस्किटे बनवा व ती ओव्हन ट्रेत मांडा. 200 डिग्रीवर प्रथम ओव्हन तापवून ठेवा व त्याच तापमानावर बिस्किटे आत ठेवा. गुलाबीसर झाल्यावर बाहेर काढा. चॉकलेट सॉसमध्ये बुडवून काढा. हवा तर त्यावर सुकामेवा पेरा.

जळालेल्या त्वचेवर हे उपाय करा

जळालेल्या त्वचेवर मध लावल्यास डागही राहत नाही.

केळीची साल त्वचेवर लावल्याने आराम मिळतो, याला तोपर्यंत लावून ठेवावे जोपर्यंत त्वचा काळी पडत नाही.

त्वचा कशानेही भाजली गेली तर लगेच त्यावर उपाय म्हणून कोरफड लावावे.

कोरफड जखमेवर ताजे लावल्यास त्याचे डागही राहत नाहीत.