अर्थजगत

0
76

भारतीय नवउद्यमींना म्हणजेच स्टार्टअपना मिळणार्‍या निधीचा ओघ चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत आटला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नवउद्यमींना मिळणारा निधी 79 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतीय नवउद्यमी कंपन्यांमध्ये मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल 18.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. यंदा याच कालावधीत ही गुंतवणूक 3.8 अब्ज डॉलरवर घसरली आहे. देशातील नवउद्यमींनी यंदा 293 भांडवल मिळवण्याचे व्यवहार केले आहेत. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ही संख्या 727 होती, अशी माहिती व्हेंचर इंटेलिजन्सने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. मागील काळात काही नवउद्यमी कंपन्यांतील गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. भारत पे, ट्रेल, झिलिंगो, गोमेकॅनिक आणि मोजोकेअर या कंपन्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे चर्चेत आल्या होत्या. याचा परिणाम नवउद्यमी कंपन्यांमध्ये होणार्‍या गुंतवणुकीवर होत आहे.