मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज मनुष्याप्रमाणे प्राण्यांमध्येही चरबीचे प्रमाण वाढते का?

कोणताही प्राणी माणसा प्रमाणे जाड होत नाही, over weight होत नाही किंवा माणसासारखे रोग सहसा त्यांना होत नाहीत. निसर्गाप्रमाणे प्राणी व मानव हे दोन वेगळे species आहेत. दोघांचे सर्व वेगळे आहे. माणसाचे नियम त्यांना लागू पडत नाहीत किंवा त्यांचे नियम माणसाला लागू होत नाहीत. उलट माणसापेक्षा सर्व प्राणी healthy असतात. याचे प्रमुख कारण ते पूर्ण निसर्ग नियमांप्रमाणे वागतात. ते भूक लागेल तेव्हाच खातात, तहान लागेल तेव्हाच पाणी पितात, त्यांच्या जीवनशैली प्रमाणे त्यांना आपोआप व्यायाम होतो, मल, मुत्र ते थांबवून ठेवत नाहीत, काय खायचे काय नाही हे त्यांना अचूक समजते. कुत्रा प्रथम पदार्थ हुंगतो त्याप्रमाणे तो खायचे कि नाही ते ठरवतो, माणूस येवढा हुशार असून अजून त्याला कोणता आहार घ्यायचा कळत नाही.

आहारतज्ञ ना हजारो रुपये मोजून काय व कसा आहार घ्यायचा ते जाणून घेतो. एवढे करूनही ते पाळतोच असे नाही. माणूस जे चविष्ट लागेल तेच जास्त खातो, आहारात आवश्यक ते सर्व vitamin,protin jma क्षार वगैरे प्रमाणात आले का म्हणजे चौरस आहार घेतो का तपासत नाही व्यायाम करत नाही, इ. सर्व निसर्गाविरुध्द वागतो म्हणून जाड होतो, अनेक रोग होतात. आता असे परिस्थितीमुळे, नोकरीमुळे मनावर ताबा नसल्याने कशानेही घडत असले तरी निसर्गाकडे क्षमा नाही. त्याप्रमाणे नाही वागले कि तो शिक्षा हि देणारच. हे सर्व मनुष्याला माहिती आहे. पण त्याला जास्त बुद्धी असल्याने तो आपल्याला काय रुचते तेच करतो.त्याची फळे भोगतो. अग्नीत हात घातला तर तो भाजणार हे नक्की. मग तो चुकून गेला तरी निसर्ग फार कडक आहे. त्याच्या शिस्ती बाहेर गेले कि शिक्षा ! जाड न होणे वगैरे आपल्या हातात आहे. परिस्थिती प्रमाणे जमत नाही ते सोडून शक्य तेवढे निसर्गाविरुध्द न वागणे हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

हसा आणि शतायुषी व्हा!

पोलीस – बाई तुमचा नवरा कसा मेला?

स्त्री – विष खाऊन

पोलीस – मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय?

स्त्री – खातच नव्हता मेला…

सल्ला

साखरेचा पाक केल्यावर त्यात थोडे लिंबू पिळावे. साखरेचे कण तयार होत नाहीत.

सौंदर्य

केसांना आठवड्यातून एकदा तेल लावावे. (विशेषत: हिवाळ्यात केस चांगले राहतात.)

लाभदायी बेडरुमसाठी

काही कारणाने एखाद्या खोलीत नैसर्गिक प्रकाश, ऊन, हवा येत नसेल तर अशा खोल्या बेडरूम म्हणून वापरण्याच्या दृष्टीने लाभदायी ठरत नाहीत. अशा खोल्यांमध्ये 2-3 जागी चिनी माती, काच व प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये थोडे खडे मीठ ठेवा. यामुळे हा दोष कमी होतो. किचन हे नेहमी साफसूफ व भरपूर प्रकाश, हवा देणारे असावे. मोडके तोडके किचन हे गृहिणीचे जीवन संघर्षमय बनविते.किचनची फारशी गुलाबी, हिरवी वा पांढरी फरशी उपयुक्त ठरते. टॉयलेट व किचन यांची रचना समोरासमोर नसावी.

बोराचे आरोग्यदायी फायदे

रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचे काम बोर करते. अ जीवनसत्व असल्यामुळे नियमित बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते. बोर वजन कमी करण्यासही मदत करते. त्वचेचे तारुण्य टिकवण्यासाठी या फळाची मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी याचे सेवन केल्यास सर्दीपासून बचाव होतो. बोर खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- मेलेला माणूस काही काळाने उठून बसला असे होते का?

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना! मृत व्यक्तीला तिरडीवर ठेवताच ती व्यक्ती उठून बसते. सगळ्या नातेवाईकांची धावपळ उडते. मग कळते की, ती व्यक्ती खरोखर मेलीच नव्हती. हृदयाचे ठोके बंद पडले व श्‍वसन बंद पडले. तरीही काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत व्यक्ती जिवंत राहू शकते. या अवस्थेला ‘सस्पेंडेड ऍनिमेशन’ किंवा ‘तात्पुरती मृतावस्था’ असे म्हणता येईल. ही अवस्था योगी-ध्यानधारणा करणारे लोक स्वतःच्या इच्छेने आणू शकतात; पण मेंदूचे रोग, दुखापती, बधिरीकरणानंतर, विजेचा धक्का वा उष्णता, बार्बीट्यूरेट वा अफूची अधिक मात्रा घेतल्याने बेशुद्धावस्थेत गेलेल्या व्यक्तींमध्ये सस्पेंडेड ऍनिमेशन ही अवस्था आढळून येते.

त्यामुळेच मृत्यूचे निदान करताना ते फार काळजीपूर्वक करावे लागते. हृदयाचे ठोके स्टेथास्कोपने तपासून, तसेच श्‍वसनाची क्रिया होते का हे तपासून, पुरेसा वेळ गेल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर व्यक्तीला मृत घोषित करतात. मेंदूच्या कार्याचा विद्युत आलेख घेण्याची सोय असल्यास तो घेतात. 5 मिनिटे मेंदूच्या पेशींनी कोणत्याच प्रकारच्या कार्याचे प्रदर्शन आलेखात न केल्यास (हा आलेख म्हणजे केवळ एक सरळ रेषाच येते) व्यक्ती मृत आहे, असे समजता येते. मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सस्पेंडेड ऍनिमेशन मधील माणूस पुन्हा जिवंत होतो, कारण तो खरोखर मेलेलाच नसतो. नाहीतर तुम्हाला वाटेल की, ती व्यक्ती नसून भूतच आहे. जगात भूत नसते, हे पक्के लक्षात ठेवा म्हणजे झाले!

हसा आणि शतायुषी व्हा!

प्रवासी     –  (कन्डक्टरला) काहो बसमध्ये मी विडी पिऊ शकतो का?

कन्डक्टर    –  नाही साहेब

प्रवासी       –  काहो! या बसमध्ये विडीचे तुकडे कसे पडलेत!

कन्डक्टर    –  ते त्या लोकांचे आहेत की,

ज्यांनी आपल्यासारखे मला प्रश्न विचारले नाहीत!

सौंदर्य

चेहर्‍याचा तेलकटपणा जाण्यासाठी ज्येष्ठमध पूड पाण्यात कालवून रात्री लावावी.

मेथीची पाने वाटून केसांना लावल्यास व मेथ्या अर्धा-अर्धा चमचा सकाळ-सायंकाळ खाल्ल्यास केस गळणे बंद होते.

वास्तू

स्टोव्ह, चूल शेगडीजवळ पाण्याचा हंडा वा सिंक ठेवू नये. घरात भांडणे होतात.