विक्रमी घोडदौड, पुढे काय?

0
57

देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांची घोडदौड कायम असून, सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक गतसप्ताहाखेरीस नव्या विक्रमी टप्प्यावर विराजमान झाले.भांडवली बाजारात तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 295.72 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 803.14 अंशांनी वधारून 64,718.56 पातळीपर्यंत झेपावला. दिवसभरात त्याने 64,768.58 अंशांची सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 216.95 अंशवाढीने 19,189.05 वर स्थिरावला. निफ्टीने दिवसभरातील सत्रात 19,201.70 अंशांची सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. धातूक्षेत्र वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचा झंझावात दिसून आला. साप्ताहिक स्तरावर विचार करता निफ्टीमध्ये 2.8 टक्क्यांची वाढ झाली असून जून महिन्याचा विचार करता ही वाढ 3.53 टक्के इतकी आहे.

टेक्निकल चार्टवर पाहिल्यास निफ्टी50 मधील 43 समभाग आणि बीएसई सेन्सेक्समधील 27 समभाग आपल्या 200 डीएमए (डेली मूव्हिंग ऍव्हरेज) च्यावर आहेत. 200 डीएमएला गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स सर्वाधिक महत्त्वाचा मानतात. या स्तराच्या वरच्या पातळीवर समभाग असणे यातून त्याची ताकद दिसून येत असते. तसेच अल्पावधीत किंवा मध्यम काळात त्या समभागामध्ये तेजी दिसून येऊ शकते असेही मानले जाते. त्याचबरोबर या महत्त्वाच्या पातळीच्या खाली किंमत आल्यास तो घसरणीचा संकेत मानला जातो आणि त्यानुसार गुंतवूकदार अशा समभागांची विक्री करु लागतात. गतसप्ताहातील तेजीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एचडीएङ्गसी बँक आणि एचडीएङ्गसीच्या विलीनीकरण. 1 जुलैपासून याचा प्रभाव दिसणार असल्याने या समभागामध्ये जबरदस्त खरेदी झाली. या समभागांचे निर्देशांकातील प्राबल्य अधिक असल्याने निफ्टी-बँकनिफ्टीला बूस्टर मिळाला. जागतिक बाजारातही हळूहळू वातावरण बदलत आहे. अमेरिकेमध्ये पहिल्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे सकारात्मक आले आहेत. बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे अमेरिकन बाजारातही तेजीचे वारे वाहू लागले आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीवर चालू आठवड्याचा विचार करणे गरजेचे आहे. एसजीएक्स निफ्टीमध्ये शुक्रवारी 73 अंकांची वाढ झाली आहे. डाऊ फ्युचर्स 257.1 अंकांनी वधारला आहे. त्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात पुन्हा एकदा मोठ्या गॅपऍपने होण्याची शक्यता आहे. निफ्टीसाठी आता 19200 च्या पातळीवर सर्वांत पहिला अडथळा आहे; तर त्यानंतर 19300 च्या पातळीवर अडथळा आहे. हे दोन्ही अडथळे पार केल्यास 19500 ची पातळी निफ्टी गाठताना दिसू शकते दुसरीकडे निफ्टीसाठी 19050 च्या पातळीवर पहिला आधार आहे. तो टिकला नाही तर 18900 आणि 18800 ची आधारपातळी आहे. याखाली निर्देशांक रेंगाळू लागल्यास किंवा बंदपातळी आल्यास घसरण दिसू शकते. परंतु बाजारातील तेजीचा प्रवाह कायम असल्याने या आठवड्यात बाय ऑन डिप्स ही रणनीती प्रभावी टरेल. बँक निफ्टीसाठी 45000 ते 45,200 या अडथळा पातळी असून 44500 च्या स्तरावर भक्कम आधार आहे. वास्तविक, या सार्वकालिक उच्चांकी पातळी असल्याने टेक्निकल चार्टसाठी येथे मोकळे आकाश आहे. याला अनचार्टेड टेरीटरी म्हणतात. त्यामुळे ट्रेडर्ससाठी हा काळ जोखमीचा आहे. बाजार येत्या काळात आणखी वधारणार असला तरी सध्याच्या उच्चांकी पातळीवर खरेदी करणे प्रचंड जोखमीचे ठरू शकते. तरीही आयसीआयसीआय लोंबार्डचा समभाग 1340 च्या पातळीवर खरेदी करुन 1550 चे मध्यमकालीन लक्ष्य ठेवता येईल. वाहनविक्रीच्या आकड्यांमध्ये मारुती सुझुकीची विक्री 2 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. याचा प्रभाव या समभागावर दिसू शकतो. टीसीएसचा समभाग 3420 रुपयांचे लक्ष्य आि 3265 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. ज्युबिलंट ङ्गूडस्चा समभग 530 रुपयांचे लक्ष्य आणि 490 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज बाजारातील घसरणीच्या काळात ऑटो, रिअल इस्टेट, सिमेंट, ग्राहकोपयोगी वस्तू आदींच्या समभागात खरेदीची संधी साधता येईल.