आयपीओ म्हणजे काय?

0
61

प्राथमिक खुला देकार म्हणजे ‘आयपीओ’. हा एक खासगी किंवा भागिदारीतील कंपन्यांमधील समभाग पहिल्यांदा जनतेस विकत घेण्यासाठीचा प्रस्ताव ठेवत असतो. याद्वारे कंपनी आपले सर्व समभाग विकू शकते किंवा काही भाग राखीव ठेवून उरलेली मालकी जनतेला समभागाद्वारे विकत देत असते. बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या आयपीओतून कंपनी भांडवल उभारणी करत असते. कालांतराने कंपनीला फायदा झाल्यास शेअरवर लाभांश जाहीर करून सभासदांना आर्थिक सुरक्षा आणि कंपनीबाबतची विश्‍वासर्हता प्रदान करते. आयपीओ किती विकायचा हे कंपनी ठरवत असते. आयपीओचा सरळ साधा अर्थ म्हणजे पैसा जमविण्यासाठीची एक पद्धत आहे. जनतेला जास्तीत जास्त शेअर किंवा समभाग विकून कंपनीसाठी भांडवल गोळा करण्यात येते. यामाध्यमातून जमविलेला पैसा कंपनी अनेक ठिकाणी गुंतवते किंवा पायाभूत सुविधेसाठी त्याचा वापर करते. कंपनीच्या विस्तारासाठीही आयपीओच्या माध्यमातून पैसा जमविला जातो. कंपनीचे जेवढे जास्त शेअर विकले जातात तेवढ्या प्रमाणात भांडवल जमा होते. सरकारी उपक्रमातील अनेक कामे, प्रकल्प हे आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या पैशातून पूर्ण केले जातात.

आयपीओ म्हणजे काय? : जर कंपनीने सर्वसामान्यांसाठी शेअर खुले करण्याचे ठरविले तर त्याला आयपीओ म्हणतात. अशा पद्धतीने पैसा उभारल्यास कंपनी ही खासगीतून सार्वजनिककडे वाटचाल करत असते. शेअर बाजारात व्यवहार सुरू केल्यानंतर तीन ते चार महिन्यात आयपीओ आपण घेऊ शकतो. दरमहिन्यात अनेक कंपन्या, सार्वजनिक कंपन्या, सरकारी उपक्रम हे बाजारात आयपीओ आणत असतात. त्याचे मूल्यही कंपनीच्या धोरणानुसार ठरत असते. पहिली पायरी: आयपीओ घोषित करण्यापूर्वी कंपनी ही एखादी गुंतवणूक करणारी बँक किंवा आर्थिक संस्था ही करारतत्वावर ताब्यात घेते. ही बँक ताब्यात घेतल्यानंतर कंपनी आणि बँकेचे अधिकारी भांडवल उभारणीबाबत चर्चा करतात आणि कंपनीला किती भांडवलीची गरज आहे, किती शेअर्स बाजारात आणायचे, आयपीओ किती ठेवायचा, आयपीओची मुदत किती दिवस ठेवायची आदींबाबत चर्चा केली जाते. त्यानुसार कंपनीचा किंवा सरकारी उपक्रमाचा आयपीओ निश्‍चित केला जातो. त्यात बँकेच्या कमिशनचाही समावेश असतो. बँकेचा सहभाग: बँक किंवा बँकेचा समूह हा आयपीओतून पैसा उभारणीसाठी मदत करत असतात. आयपीओतून मिळणार्‍या पैशातून बँका नफा काढत असतात. आयपीओपूर्वीची किंमत आणि आयपीओ यातील तफावतीमधून जमा होणारा पैसा बँकेकडे जातो. समभाग हे विक्रीसाठी खुले केल्यानंतर आणि बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर बँका हे ग्राहकाच्या खरेदीवरून विश्‍वासर्हता मिळवत असतात. जसजसी आयपीओची तारीख जवळ येते तसतसे बँकर्स आणि कंपन्या हे किंमत ठरवतात. ही किंमत बाजाराची सद्यस्थिती आणि कंपनीचे धोरण यावर ठरविले जात असते.