विक्रमी पावलांची महिला

भुताखेतांबाबत ज्या काल्पनिक गोष्टी असतात त्यामध्ये त्यांच्या उलट्या पावलांचाही समावेश असतो. याचा मतितार्थ इतकाच की, माणसाला पावलं वळवण्यासारखे प्रकार करता येणार नाहीत; मात्र एक महिला असे करू शकते. तिच्याकडील ही कला क्षमता अनेक लोक थक्क होतात. ही महिला आपल्या दोन्ही पावलांना बर्‍याच अंशी मागे फिरवू शकते. याबाबत तिच्या नावाची गिनिज बुकमध्येही नोंद झाली आहे. केल्सी गु्रब असे या महिलेचे नाव. 32 वर्षांची केल्सी न्यू मेक्सिकोमध्ये राहते. ती तिचे पाय 171.4 अंशांपर्यंत मागे फिरवू शकते. केल्सी म्हणाली, माझे पाय खूपच लवचिक आहेत. मात्र, त्याची मलाही जाणीव नव्हती. बहुतेक लोक त्यांचे पाय काही अंशच फिरवण्यात यशस्वी होतात. सुरूवातीला मलाही वाटले की, मी 90 अंशांपर्यंतच असे करू शकेन: मात्र मला ज्यावेळी याबाबतच्या रेकॉर्डबाबत समजले, त्यावेळी मी त्याचा सराव करण्यास सुरूवात केली. अखेर याबाबतचा विक्रम माझ्या नावावर झाला. केल्सीच्या नावे पावले मागे वळवण्याचा विक्रम महिला गटात आहे, तर पुरूष गटात असा विक्रम अमेरिकेच्या आरोन फोर्डच्या नावावर आहे. तो त्याचे पाय 173.03 अंशांपर्यंत फिरवू शकतो. केल्सीला या कौशल्याचा फायदा आणखी एका कामासाठी होतो. आईस स्केटिंगमध्ये तिला हे उपयोगी पडते, असे तिने म्हटले आहे.

‘ट्विवटर’… ‘दोन पाऊल पुढे

एलन मस्क यांनी ‘ट्विटर’ची मालकी घेतल्यापासून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल दिसून येत आहेत. आता ट्विवटरचे ब्ल्यू टिकसह व्हेरिफाईड सदस्य ट्विवटर प्लॅटफॉर्मवर 2 तासांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकतील. ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विट करून या नव्या फीचरची माहीती दिली आहे. तथापि, वापरकर्ते कमाल 8 जीबीपर्यंतचेच व्हिडीओ अपलोड करू कशतात. यापूर्वी, हे वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर 1 तास (जास्तीत जास्त 2 जीबी) पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करू शकत होते. सामान्य ट्विटर वापरकर्ते (ब्लू टिक नसलेले सदस्य) हे फीचर वापरू शकणार नाहीत. ज्याला ट्विवटरवर दोन तासांपर्यंत व्हिडीओ अपलोड आणि शेअर करायचा असेल, त्याला ट्विटरचे मासिक ब्ल्यू सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. नॉन-ब्ल्यू टिक सदस्य सध्या फक्त 140 सेकंद (2 मिनिटे, 20 सेकंद) पर्यंतचे व्हिडीओ ट्विवटरवर अपलोड करू शकतात.

ब्लू सबस्क्रिप्शन सेवेची किंमत भारतातील अँड्रॉईड आणि आयओएस मोबाईल वापरकर्त्यांसाठी दरमहा 900 रूपये आहे. वेब वापरकर्ते 650 रूपये प्रति महिना ब्लू सबस्क्रिप्शन सेवा घेऊ शकतात. मस्क यांना 2023 च्या अखेरीस ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शन सेवेत बदल केले आहेत. ट्विटरने गेल्या महिन्यात अक्षर मर्यादा 280 वरून 10,000 पर्यंत वाढवली. म्हणजेच तुम्ही इथे कोणताही अथडळा न येता संपूर्ण लेख लिहू शकता. एवढेच नाही तर आता ट्विटरवर बोल्ड आणि इटालिक असे टेक्स्ट फॉरमॅटिंग देखील वापरता येणार आहे.

फ्रीझर वरतीच का असते?

बर्‍याच वेळा आपण नेहमी वापरत असलेल्या वस्तूंचीही आपल्याला पुरेशी माहिती नसते. रेफ्रिजरेटर हे किचनमधील सर्वात महत्त्वाच्या अप्लायन्सपैकी एक आहे. उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होण्यापासून रोखण्यासाठी आणि पदार्थ थंड करण्यासाठी याचा वापर केला जातो. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरात फ्रीज दिसतील. गरजेनुसार कंपन्या वेगवेगळ्या क्षमतेचे फ्रीज तयार करतात. घरात वापरल्या जाणार्‍या बहुतेक रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीजरवरती असल्याचे तुम्ही पाहिले असेलच; पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का? फ्रीजर फ्रीजच्या तळाशी का ठेवले जात नाही? (काही लोकांना वाटते की फ्रीजर वर ठेवले आहे, जेणेकरून लहान मुले त्यात ठेवलेली आईस्क्रीम बाहेर काढून खाऊ शकणार नाहीत. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. फ्रीजमध्ये वरच्या दिशेने का दिलेे जाते ते जाणून घेऊया.

सर्वात आधी, आपण जाणून घेऊया की, गरम हवा हलकी असते आणि थंड हवा जड असते. फ्रीजमधील फ्रीझर कंपार्टमेंटचे तापमान सर्वात कमी राहते. त्यामुळे आजूबाजूची हवाही थंड राहते. आता थंड हवा जड असते. म्हणूनच ती खाली येते आणि खालील गरम हवा किंवा वरीलपेक्षा किंचित जास्त तापमान असलेली हलकी हवा वर जाते. ही गरम हवा वर जाते आणि फ्रीझरवर आदळते आणि पुन्हा थंड होते. तेव्हा ती थंड होते, तेव्हा ती पुन्हा खाली येते आणि खाली असलेली गरम हवा रिप्लेस करून पुऩ्हा वर पाठवते. अशाप्रकारे हे चक्र चालू राहते आणि संपूर्ण फ्रीजमध्ये तापमान योग्य राहते. फ्रीझर खाली ठेवल्यास, जड असलेली थंड हवा तळाशी राहील आणि वरची उबदार हवा वरच्या बाजूला राहिल. या कॉम्बिनेशनमध्ये फ्रीजमध्ये योग्य कूलिंग होत नाही. फ्रीजरवरती ठेवण्याचा एक फायदा म्हणजे फ्रीज बंद केल्यावर, फ्रीजरला टक्कर देऊन हवेचे थंड होऊन खाली येण्याची सायकल चालत राहते. ज्यामुळे फ्रीजमध्ये प्रॉपर कूलिंग बॅलेन्स राहते.

विश्वविक्रमी आइस्क्रीम

जपानच्या एका कंपनीने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनवण्याचा विक्रम गिनिज बुकमध्ये नोंदवला आहे. या आइस्क्रीमची किंमत 8 लाख 73 हजार 400 जपानी येन इतकी आहे. भारतीय रूपयांत याची किंमत 5.2 लाख इतकी आहे. असे काय खास आहे या आहे इतकी किंमत जाणून घेऊ या सर्व काही…. जपानच्या आईस्क्रीम ब्रँडने जगातील हे सर्वात महागडे आईस्क्रीम तयार केले आहे. हे आइस्क्रीम विकसित करण्यासाठी या कंपनीला तब्बल दीड वर्ष लागला. या आइसक्रीमला बायकुया असे नाव देण्यात आले आहे. सेलाटोने यासाठी जपानमधील रिवी या रेस्टॉरंटमधील मुख्य शेफ तदायोशी यामदा यांना नेमले होते. यामदा हे कल्पनारम्य फ्यूजन पाककृती बनवण्यासाठी ओळखले जातात. या आईस्क्रीममध्ये ब नि वापरलेले घटक हे या आईस्क्रीमचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असून हेच घटक इतक्या अवाढव्य किंमतीसाठी कारणीभूत ठरले. बायकुया नावाचे सर्वात महागडे आईस्क्रीम बनवणे हे सेलाटोचे एकमेव ध्येय नव्हते. त्यांना आइस्क्रीमच्या स्वरूपात युरोपियन आणि जपानी घटक एकत्र करायचे होते. या आईस्क्रमध्ये इटलीत उगवणारा दुर्मिळा पांढरा ट्रफल, ज्याची किंमत प्रति किलो 2 दशलक्ष जपानी येन इतकी आहे. आईस्क्रीमच्या टेस्टिंग दरम्यान ज्या कर्मचार्‍यांनी याचा आस्वाद घेतला, त्यांनी या आईस्क्रीमविषयी सांगितले की आईस्क्रीम समोर येताच पांढर्‍या ट्रफलचा मजबूत सुगंध तुम्हाला आकर्षित करतो. नंतर त्यामध्ये पारमिगियानो आणि रेगियानो फळाची चव येते.

बैलाचेमुखी बाऊलचा शोध

ब्रिटनच्या वेल्समध्ये एका मेटल डिटेक्टोरिस्टने लोह युगातील भांडी शोधून काढले आहे. तसेच याठिकाणी रोमन काळातील नाणीही सापडली आहेत. मात्र, या खजिन्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे बैलाचे मुख असलेले वैशिष्ट्यपूर्ण बाऊल. हे वाडगे कलाकुसरीच्या दृष्ठीनेही अतिशय सुंदर आहे. या शोधाला खुद्द ब्रिटीश सरकारनेच ‘खजिना’(ट्रेजर) घोषित केले आहे. जॉन मॅथ्युज या माणसाने हा खजिना शोधला. नैऋत्य वेल्समधील मॉनमाऊथशायर या कौंटीमध्ये हा खजिना शोधण्यात आला. हा खजिना खरोखरच अत्यंत सुंदर आहे असे त्याने म्हटले आहे. त्याने हा शोध घेतल्यानंतर त्याने स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधून तिथे पुढील संशोधन करण्याची विनंती केली. या खजिन्यात इसवी सन पूर्व 750 ते इसवी सन 43 या काळातील अनेक भांड्यांचा समावेश आहे. त्यामध्येच मुठीवर बैलाचे मुख असलेल्या या बाऊलचा समावेश होतो. त्याचे मुख आणि बाकदार शिंगे उठावदार आहेत.

डेटिंगसाठी ‘एआय क्लोन’!

‘क्लोनिंग’चे तंत्र आता जगभरातील लोकांना ठावूक आहे. ‘डॉली’मेंढीचा क्लोनिंगच्या तंत्राने जन्म जगभर प्रसिद्ध झाले होते. यामध्ये एखाद्या प्राण्याची हुबेहुब ‘कॉपी’असलेला प्राणी जन्माला घालता येऊ शकतो. आता एका तरूणीने आपले ‘एआय क्लोन’बनवले आहे. त्याचा उद्देश अनेक तरूणांशी डेटिंग करून त्या माध्यमातून कमाई करणे हा आहे! या तरूणीचे नाव आहे कॅरिन मार्जोरी. जॉर्जियामधील या तरूणीने आता जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपले ‘एआय क्लोन’ बनवून ती जे काम करीत आहे ते सध्या जगभर चर्चेचा विषय बनलेले आहे. तिने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या मदतीने आपले एक आभावी क्लोन बनवले आहे. त्याचा वापर करून ती बॉयफ्रेंरड बनवते आणि त्याच्याशी डेट करते. आतापर्यंत ती अशा एक हजार मुलांसमवेत डेट करीत आहे. आपल्या एआय क्लोनच्या माध्यमातून डेटिंग करीत ती प्रतिमिनिट 1 डॉलर म्हणजेच 80 रूपये शुल्क आकारते. कॅरीन मार्जोरीच्या या एआय बॉटने आतापर्यंत 71,610 डॉलर्स म्हणजे 58 लाख रूपयांपेक्षाही अधिक कमाई केली आहे. मार्जोरीचे म्हणणे आहे की ‘एआय साथीदार’हा भविष्यात ऑनलाईन टॉकचा इक अभिन्न हिस्सा बनू शकतो. ‘कॅरिनएआय’च्या यशाने तिची मासिक कमाई 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 41.12 कोटी रूपयांची होऊ शकते. जर तिच्या 1.8 फॉलोअर्सपैकी वीस हजार लोकांनीही लॉगइन केले तर हे सहजशक्य आहे. लोक कॅरिनच्या व्हर्च्युअल क्लोनबरोबर वेळ घालवण्यासाठी ‘कॅरिनएआय’वर साईनअप करीत आहेत. तिचे म्हणणे आहे की जगात एकाकी माणसांची संख्या मोठी आहे. एकाच वेळी एक व्यक्ती अनेकांना सोबत करू शकत नाही. अशावेळी हे काम ‘एआय’करू शकते!

फुलपाखरांबाबत नवा दावा

निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार म्हणजे फुलपाखरं, रंगीबेरंगी, फुलांवरून भिरभिरणारी फुलपाखरं डोळ्यांनान सुखद विसावा देत असतात. आता संशोधकांनी फुलपाखरांचा जगातील सर्वात मोठा वंशवृक्ष बनवला आहे. त्यानुसार सध्याच्या मध्ये आणि उत्तम अमेरिकेतील पतंगांपासून पहिल्यावहिल्या फुलपाखरांचा विकास झाला. तब्बल दहा कोटी वर्षांपूर्वी अशा पद्धतीने तिथे फुलपाखरं विकसित झाली. त्या काळात पृथ्वीवरील सुरूवातीचा एकच खंड असलेला ‘पँजिया’ भंगण्याच्या मार्गावर होता. उत्तर अमेरिका खंड पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन भागांमध्ये विभाजित झाला. या खंडांच्या पश्‍चिमेकधील भागात फुलपाखरं विकसित झाली. सध्या फुलपाखरांच्या अंदाजे 20 हजार प्रजाती अस्तित्वात आहेत. त्या अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व खंडांमध्ये आढळतात. यापूर्वीही संशोधकांना फुलपाखरं कधी विकसित झाली याबाबतची माहिती होती; पण ती नेकमी कधी विकसित झाली आणि त्यांचा सुरूवातीच्या काळातील आहार काय होता, हे माहिती नव्हते. फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील क्युरेटर आणि फुलपाखरांचे अभ्यासक अकितो कावाहारा यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने याबाबतचे संशोधन केले. त्यांनी 90 देशांमधील 2300 प्रजातींच्या फुलपाखरांमधील 391 जनुकांची संगती लावून त्यांचा नवा वंशवृक्ष तयार केला. त्यामध्ये सध्याच्या ज्ञात अशा 92 टक्के प्रजातींचा समावेश झालेला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’या नियतकालिकाच्या 15 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात देण्यात आली आहे.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

कला व छंद जोपासा – या वयापर्यंत आपण नोकरी, व्यवसाय तसेच संसारातील जबाबदार्‍यांमध्ये बर्‍यापैकी स्थिर झालेलो असतो. आपल्यामधील कर्तृत्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने काही स्त्रिया अति कष्ट व मानसिक ताणतणाव सहन करतात. रोजच्या कामामधून थोडा विरंगुळा हवा यासाठी काही छंद, कला जोपासणे गरजेचे असते. यामधून शरीर व मनाचे संतुलन होते. रोजच्या दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्याचा बर्‍याच जणींना कंटाळा येतो. एवढे दिवस नांगराला बैल जुंपल्याप्रमाणे बहुसंख्य स्त्रिया काम करत असते. परंतु चाळिशीमध्ये स्वतःचे मन रमेल, ज्या कलेमध्ये आनंद वाटेल असा एखादा छंद जोपासावा. तारुण्यात शिक्षणामुळे, घरच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे, एखादीला गाणे म्हणणे, नृत्य करणे या गोष्टी करायला जमल्या नसतील, तर नक्कीच तुम्ही या वयात त्या गोष्टी करा. शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चाळिशीमध्ये उगाचच उदास वाटणे, एकदम रडायला येणे, हताश झाल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे, माणसांमध्ये असूनही एकटे असण्याची भावना निर्माण होणे ही लक्षणे दिसून येतात. असे होऊ नये म्हणून शरीर व मन कायम आनंदी व प्रफुल्लित ठेवणे गरजेचे आहे. मन आनंदी ठेवण्यासाठी छंद जोपासायला हवा. चित्र काढणे, कॉम्प्युटर शिकणे, इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करणे, चांगली पुस्तके वाचणे, वृद्धाश्रमांना भेट देऊन तेथील वृद्धांना मदत करणे, अनाथालयाला भेट देऊन तेथील मुलांना एखादी कला शिकवणे हे सर्व या वयात करू शकतो. मुले मोठी झाल्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. तेव्हा स्वतःचा छंद जोपासावा.

हसणे ही एक कला आहे, ती आत्मसात करा – मानसिक ताण कमी करण्यासाठी खळखळून हसणे उत्तम होय. हसण्यामुळे चिंता आणि नैराश्य भावना कमी होते. चेहन्यावर काळजीने पडणार्‍या आठवा कमी होतात. इतरांशी संवाद साधताना नातेसंबध दृढ होतात. याकरिता सध्याच्या काळात हास्यक्लब सुरू झाले आहेत. हास्य ही कला जोपासल्यामुळे शरीर व मन नेहमी आनंदी राहते. त्यामुळे तारुण्य टिकण्यास मदत होते. सुरक्षितता पाळा तारुण्यामध्ये शरीर व मनाचा जोश उत्साहपूर्वक असतो. परंतु चाळिशीमध्ये शरीराची एक-एक तक्रार सुरू होते. मनावर कामाचा अतिताण आल्यामुळे व ’ब’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश बर्‍याच स्त्रियांमध्ये आढळून येतो. एखादे काम करत असताना हे काम कशासाठी करत आहे, फ्रिज कशासाठी उघडला हेच आठवत नाही. त्यामुळे कोणतेही काम करताना, वाहन चालवताना, एखादे उपकरण हाताळताना जाणीवपूर्वक, सावकाशपणे व सुरक्षितता बाळगून वापरावे. वाहन चालवताना पाठीचा कणा ताठ ठेवून सावकाश वाहन चालवावे. सनकोट, गॉगल हेल्मेटचा वापर करावा. चार चाकी वाहन चालवताना किंवा बसताना सीट बेल्टचा वापर करावा. कारण या वयामध्ये अपघात झाल्यास शरीराची हानी भरून येण्यास वेळ लागतो. या वयात शरीराला कमी प्रमाणात कॅल्शिअम मिळते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व एखादा अपघात झाला.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

भाई साहब बीमार पड़े तो यहीं मधुबन में रहने लगे। हम उनसे मिलने आते थे और वे खुद हम से पूछते थे कि कैसे हैं, ठीक हैं ? घरपरिवार में सब ठीक हैं ? इस प्रकार, सिर्फ क्लास में आने वालों के प्रति उनका स्नेह नहीं था, उनके घर-परिवार वालों के प्रति भी उनकी उतनी ही शुभ-भावना और शुभ-कामना होती थी। भाई साहब से मिलकर मैं दिल्ली वापस चली गयी। कुछ दिनों के बाद एक दिन मैं बाबा के कमरे में योग कर रही थी। बाबा को देखते-देखते ऐसा होने लगा कि भाई साहब और ब्रह्मा बाबा एक होते जा रहे हैं। यह अनुभव एक बार नहीं, अनेक बार हुआ। मैंने दीदी से कहा, दीदी, भाई साहब और ब्रह्मा बाबा एक होते जा रहे हैं। मैं बैठती थी शिव बाबा को याद करने लेकिन मुझे अनुभव होता था यह। मैं दीदी से बार-बार कहती थी कि मुझे ऐसा अनुभव हो रहा है। मुझे लगा, भाई साहब का अन्तिम समय का पुरुषार्थ भी बहुत ऊँचे स्तर का था। उनका पुरुषार्थ गुप्त था, किसी को पता नहीं लगता था कि वे पुरुषार्थ कर रहे हैं।

जब उनके पार्थिव शरीर को हिस्ट्री हॉल में रखा तो हम उनके अन्तिम दर्शन करने गये। उनके शरीर के चारों तरफ़ चक्कर लगा रहे थे तब भी। मुझे अच्छे अनुभव हो रहे थे। कहते हैं ना, सन्त-महात्मा, योगी-ऋषि के शरीर छोड़ने के बाद भी उनके शक्तिशाली वायब्रेशन्स उनके पार्थिव । शरीर के आस-पास रहते हैं। मैंने उस पूरी रात वहॉं बैठकर योग कि मुझे बहुत अच्छे-अच्छे अनुभव हुए। उन्होंने शरीर छोड़ने से पहले पर नगर की सब माताओं और बहनों के लिए चिट्ठी भी लिखकर रखी थी।

बाबा कभी अनन्य बच्चों की बात टाल नहीं सकते – जब उनके शरीर को अन्तिम संस्कार के लिए ले जाना था, उस समय। आबू में बहुत तेज धूप थी। अन्तिम यात्रा निकलने से पहले हल्की-सी। बूंदाबारी हुई और मौसम ठंडा हुआ। बाद में जब भाई साहब का सन्देश । आया, उससे पता पड़ा कि भाई साहब ने बाबा से कहा, बाबा, अन्तिम संस्कार में इतने सारे भाई-बहनें आये हैं, इतनी तेज धूप है, थोड़ी बूंदीबारी। होनी चाहिए। बाबा भी ऐसे अनन्य बच्चों की बात टाल नहीं सकते हैं॥ बाबा ने हल्की-सी वर्षा वर्षायी। – आज भी हमें कोई भी समस्या आती है तो भाई साहब का वो हँसता हुआ चेहरा सामने आता है। उनका सदैव यही कहना होता था कि बाबा को अपने साथ रखकर चलो तो सब समस्यायें भाग जायेंगी। भाई साहब का यह कहना मैं हमेशा याद रखती हैं और बाबा को बार-बार शुक्रिया कहती हूँ कि बाबा, हमें ऐसी महान आत्मा से पालना और मार्गदर्शन पान का मौका मिला इसके लिए आपको और जगदीश भाई को बहुत-बहु…धन्यवाद।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

परम संत कृपालसिंहर्जीचे देहावसान होऊन एक वर्ष झाले होते संगत आपल्या येणार्‍या मार्गदर्शकाचे खुप अधिरपणे वाट पाहत होती. या घोर दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराजजींच्या रूपात एक तेजःपुंज प्रकट झाला. काही काळानंतर महाराजजींनी मुंबईचा दौरा करण्याचे ठरविले. महाराजजी मुंबईला आणि आपल्या अमृत वचनाने सर्व संगतला कृतकृत्य केले. यानंतर महाराजींनी अमुल्य नामदान देऊन संगतला संतुष्ट केले. मला पण हुजूरांनी नामदान दिले. मी नामदान घेऊन एवढी खुष होती की या संपत्तीच्या समोर जगाचे कोणतेही ऐश्वर्य कमीच होते. मुंबईच्या नंतर महाराजजींचा ठाणे जिल्ह्यात दोन जागी सत्संग करायचा कार्यक्रम होता. महाराजजींनी सत्संगमध्ये प्रामाणिक कमाईच्या बाबतीत सांगितले आणि म्हणाले. कोणाकडून काहीही घेतले तर तुम्हाला ते परत करायला लागेल, हे कर्ज उतरण्यासाठी कदाचित दुसरा जन्मही घ्यावयास लागेल. हे ऐकताच मी बेचैन झाले कारण मी घरोघरी जाऊन सफाईचे काम करते आणि मला लोक काही ना काही देतच राहतात. मला वाटले की महाराजजींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल. माझ्या अंगावर शहारे आले आणि मी महाराजजींना भेटण्याचा निश्चय केला कारण नंतर परत भेटण्याची संधी मिळेल ना मिळेल. सत्संग संपताच मी स्टेजकडे जाऊ लागले कारण महाराजजी बरोबर बोलू शकेन. जवळ जाऊन मी प्रार्थना केली, महाराजजी मी तर अस्पृश्य आहे, खालच्या जातीची आहे. मला घरोघरी जाऊन सफाईची कामे करावी लागतात. लोक मला काहीतरी देत असतात. तर त्यांचे कर्जफेड करावयास मला परत जन्म घ्यावा लागेल काय? मला काहीच समजत नाही मी काय करू? हे ऐकून महाराजजींनी मला प्रेमळ आशिर्वाद दिला आणि जशी एक आई आपल्या मुलांची वेडीवाकडी बडबड ऐकून आपल्या मुलाला छातीशी कवटाळून घेते, मला पण तसाच अनुभव झाला. महाराजजींनी आपल्या पवित्र वाणीने मला समजावले आणि म्हणाले, अरे खुळी की काय तू? तू स्वतः ला अस्पृश्य का समजतेस? तू माझ्या हृदयाला विचार, मी तुला किती प्रेम करतो ते. तु कधीही स्वतःला खालच्या जातीची समजू नकोस. मी या देण्या-घेण्याच्या भानगडीतून तुला मुक्त करतो. तु आपल्या मनातून सारी भीती काढून टाक. एवढे महान होते माझे सद्गुरू परमसंत दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराज.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)