डेटिंगसाठी ‘एआय क्लोन’!

0
49

‘क्लोनिंग’चे तंत्र आता जगभरातील लोकांना ठावूक आहे. ‘डॉली’मेंढीचा क्लोनिंगच्या तंत्राने जन्म जगभर प्रसिद्ध झाले होते. यामध्ये एखाद्या प्राण्याची हुबेहुब ‘कॉपी’असलेला प्राणी जन्माला घालता येऊ शकतो. आता एका तरूणीने आपले ‘एआय क्लोन’बनवले आहे. त्याचा उद्देश अनेक तरूणांशी डेटिंग करून त्या माध्यमातून कमाई करणे हा आहे! या तरूणीचे नाव आहे कॅरिन मार्जोरी. जॉर्जियामधील या तरूणीने आता जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपले ‘एआय क्लोन’ बनवून ती जे काम करीत आहे ते सध्या जगभर चर्चेचा विषय बनलेले आहे. तिने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या मदतीने आपले एक आभावी क्लोन बनवले आहे. त्याचा वापर करून ती बॉयफ्रेंरड बनवते आणि त्याच्याशी डेट करते. आतापर्यंत ती अशा एक हजार मुलांसमवेत डेट करीत आहे. आपल्या एआय क्लोनच्या माध्यमातून डेटिंग करीत ती प्रतिमिनिट 1 डॉलर म्हणजेच 80 रूपये शुल्क आकारते. कॅरीन मार्जोरीच्या या एआय बॉटने आतापर्यंत 71,610 डॉलर्स म्हणजे 58 लाख रूपयांपेक्षाही अधिक कमाई केली आहे. मार्जोरीचे म्हणणे आहे की ‘एआय साथीदार’हा भविष्यात ऑनलाईन टॉकचा इक अभिन्न हिस्सा बनू शकतो. ‘कॅरिनएआय’च्या यशाने तिची मासिक कमाई 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 41.12 कोटी रूपयांची होऊ शकते. जर तिच्या 1.8 फॉलोअर्सपैकी वीस हजार लोकांनीही लॉगइन केले तर हे सहजशक्य आहे. लोक कॅरिनच्या व्हर्च्युअल क्लोनबरोबर वेळ घालवण्यासाठी ‘कॅरिनएआय’वर साईनअप करीत आहेत. तिचे म्हणणे आहे की जगात एकाकी माणसांची संख्या मोठी आहे. एकाच वेळी एक व्यक्ती अनेकांना सोबत करू शकत नाही. अशावेळी हे काम ‘एआय’करू शकते!