जपानच्या एका कंपनीने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनवण्याचा विक्रम गिनिज बुकमध्ये नोंदवला आहे. या आइस्क्रीमची किंमत 8 लाख 73 हजार 400 जपानी येन इतकी आहे. भारतीय रूपयांत याची किंमत 5.2 लाख इतकी आहे. असे काय खास आहे या आहे इतकी किंमत जाणून घेऊ या सर्व काही…. जपानच्या आईस्क्रीम ब्रँडने जगातील हे सर्वात महागडे आईस्क्रीम तयार केले आहे. हे आइस्क्रीम विकसित करण्यासाठी या कंपनीला तब्बल दीड वर्ष लागला. या आइसक्रीमला बायकुया असे नाव देण्यात आले आहे. सेलाटोने यासाठी जपानमधील रिवी या रेस्टॉरंटमधील मुख्य शेफ तदायोशी यामदा यांना नेमले होते. यामदा हे कल्पनारम्य फ्यूजन पाककृती बनवण्यासाठी ओळखले जातात. या आईस्क्रीममध्ये ब नि वापरलेले घटक हे या आईस्क्रीमचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असून हेच घटक इतक्या अवाढव्य किंमतीसाठी कारणीभूत ठरले. बायकुया नावाचे सर्वात महागडे आईस्क्रीम बनवणे हे सेलाटोचे एकमेव ध्येय नव्हते. त्यांना आइस्क्रीमच्या स्वरूपात युरोपियन आणि जपानी घटक एकत्र करायचे होते. या आईस्क्रमध्ये इटलीत उगवणारा दुर्मिळा पांढरा ट्रफल, ज्याची किंमत प्रति किलो 2 दशलक्ष जपानी येन इतकी आहे. आईस्क्रीमच्या टेस्टिंग दरम्यान ज्या कर्मचार्यांनी याचा आस्वाद घेतला, त्यांनी या आईस्क्रीमविषयी सांगितले की आईस्क्रीम समोर येताच पांढर्या ट्रफलचा मजबूत सुगंध तुम्हाला आकर्षित करतो. नंतर त्यामध्ये पारमिगियानो आणि रेगियानो फळाची चव येते.