बैलाचेमुखी बाऊलचा शोध

0
48

ब्रिटनच्या वेल्समध्ये एका मेटल डिटेक्टोरिस्टने लोह युगातील भांडी शोधून काढले आहे. तसेच याठिकाणी रोमन काळातील नाणीही सापडली आहेत. मात्र, या खजिन्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे बैलाचे मुख असलेले वैशिष्ट्यपूर्ण बाऊल. हे वाडगे कलाकुसरीच्या दृष्ठीनेही अतिशय सुंदर आहे. या शोधाला खुद्द ब्रिटीश सरकारनेच ‘खजिना’(ट्रेजर) घोषित केले आहे. जॉन मॅथ्युज या माणसाने हा खजिना शोधला. नैऋत्य वेल्समधील मॉनमाऊथशायर या कौंटीमध्ये हा खजिना शोधण्यात आला. हा खजिना खरोखरच अत्यंत सुंदर आहे असे त्याने म्हटले आहे. त्याने हा शोध घेतल्यानंतर त्याने स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधून तिथे पुढील संशोधन करण्याची विनंती केली. या खजिन्यात इसवी सन पूर्व 750 ते इसवी सन 43 या काळातील अनेक भांड्यांचा समावेश आहे. त्यामध्येच मुठीवर बैलाचे मुख असलेल्या या बाऊलचा समावेश होतो. त्याचे मुख आणि बाकदार शिंगे उठावदार आहेत.