शेतकर्‍याची आळशी मुले

एका गावात एक शेतकरी राहत होता. दिवसभर शेतात राबून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. त्याला चार मुले होती. आता ती मोठी झाली होती. पण त्यांना काम करण्याचा, शेतात राबण्याचा फारच कंटाळा. आयते खाऊन टिवल्या-बावल्या करण्यातच त्यांचा वेळ जात असे. आता तो शेतकरी फारच म्हातारा झाला होता. कधी मरण येईल, याचा भरवसा नव्हता. आपल्यानंतर आपल्या मुलांचे कसे होणार, याची त्याला चिंता लागली होती. म्हणून एके दिवशी त्याने आपल्या चारही मुलांना जवळ बोलावून सांगितले, ‘‘मुलांनो, माझा आता काही भरोसा नही. मी सर्व जमीन, त्यातील बागा तुमच्या स्वाधीन करतो आहे. याच जमिनीत कुठे तरी मी पैसा पुरून ठेवला आहे. आता नेमका कुठे, ते मला आठवत नाही. तुम्ही सर्व जमीन खोदून काढा. कुठे तरी तो तुम्हाला सापडेल.’’ हे ऐकून मुलांना फारच आनंद झाला. आयते घबाड हाती पडेल, असे त्यांना वाटले. उद्याच्या उद्या शेतं खांदायला सुरुवात करू, असे म्हणून ते झोपी गेले. सकाळी बघतात, तो म्हातारा मरण पावलेला. मग त्याचे सर्व क्रियाकर्म केल्यावर सर्व आले. जमिनीची चांगली मशागत केली, तर पीक चांगले येऊन पैसाही हाती येतो, हे त्यांना कळून चुकले. वडिलांच्या सांगण्याचा हाच अर्थ, हे त्यांना मनोमन पटले.

तात्पर्य – धन-पैसा कशाही स्वरूपात मिळतो. प्रत्यक्ष पैसाच मिळाला पाहिजे, असे नव्हे.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज -एच. आय. व्ही. म्हणजे काय?

एच. आय. व्ही. चा विषाणू हा पेशीतील प्रतिकारशक्तीवरच हल्ला करतो व ती निकामी करतो. यामुळे शरीराची संसर्गाला प्रतिकार करण्याची शक्ती कमी होत जाते. एच. आय. व्ही. ला वैद्यकीय परिभाषेत रिट्रोव्हायरस म्हणतात कारण तो स्वत:ची जनुकं पेशींच्या डि.एन.ए मध्ये सोडून देतो. यामुळे शरीरातील पेशी या एच. आय. व्ही. चे कारखाने बनतात व त्याचा दुहेरी परिणाम होतो. एकीकडे त्या शरीराचे संरक्षण करु शकत नाहीत आणि दुसरीकडे त्या अधिक विषाणुंचे कण निर्माण करुन इतर पेशींना संसर्गीत करतात. एच. आय. व्ही. चा विषाणू हा स्वत:मध्ये प्रचंड बदल घडवून आणू शकतो व शरीरातील लिम्फॅटीक सिस्टिममध्ये किंवा अन्य भागात लपतो व अशा ठिकाणी आपले बस्तान बसवतो की जिथे औषधे किंवा प्रतिकार करणार्‍या पेशी पोचू शकत नाहीत. एच. आय. व्ही. विषाणू हा विर्यातून, योनीस्त्रावातून, रक्तातून व स्तनपानातून संक्रमित होतो.

संक्रमणाचे प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे असुरक्षित यौनसंबंध, दुषित रक्ताद्वारे, दुषित रक्त असलेल्या सुई, इंजेक्शन मधून संसर्गिक महिलेकडून बाळाला गर्भात असताना प्रसुति समयी किंवा स्तनपानाद्वारे लैगीक संबंधातून एच. आय. व्ही. संक्रमणाची शक्यता वाढते. ज्यावेळी व्यक्तीला गुप्तरोग असतात व तो त्यावर उपचार घेत नसतो. बलात्कारामुळे एच. आय. व्ही. च्या संक्रमणाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. एच. आय. व्ही. संसर्गीत व्यक्तीकडून लैगींक संबंधातील त्यांच्या जोडीदाराला विषाणू संसर्गीत होण्याची शक्यता ही प्रतिपिंड निर्माण होण्याअगोदर जास्त असते. अशा व्यक्ती संसर्ग झाल्याच्या पुढील टप्प्यातही अधिक संसर्गीत बनतात. कारण शरीरातील प्रतिकारशक्ती ही विषाणुंच्या तुलनेत कमी पडते. एच. आय. व्ही. चा विषाणू सहजरित्या शरीराच्या बाहेर जगु शकत नाही. त्यामुळे स्वच्छतागृह वापरल्याने, आलिंगन दिल्याने, चुंबनाने किंवा हातात हात घेतल्याने, ताटवाटी किंवा पिण्याची भांडी वापरल्याने किंवा खोकल्याने पसरत नाही. डास चावल्याने ही एच. आय. व्ही. चा प्रसार होत नाही. एच. आय. व्ही. चे विषाणू जरी लाळेत आढळून आले असले तरी प्रदिर्घ चुंबनाने एच. आय. व्ही. संसर्ग झाल्याचा पुरावा नाही. तोंडामध्ये जखमा असल्यास मात्र संक्रमणाची भीती मुखमैथुनाच्या बाबतीत पूर्णपणे नाकारता येत नाही. लक्षणविरहीत प्रदिर्घ अवधी पण प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये रोगाच्या वाढीच आढावा घेता येतो. प्रतिकारशक्तीच्या अभावी संधीसाधू आजार. जे मृत्युचे मुख्य कारण आहेत. (उदा. क्षयरोग)

वास्तू

च्युइंगम चावल्याने मानसिक क्षमतेत पन्नास टक्के इतका फायदा होऊ शकतो. याने आपला हार्ट रेट वाढतो आणि या कारणाने रक्ताचा असरही वाढतो. यामुळे मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे स्मरणशक्तीमध्ये अधिक फायदा होतो.

झोपण्याच्या खोलीत नेहमी सुंदर, कलात्मक व हसणार्‍या बाळाची प्रतिमा लावा.

सल्ला

आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता येते.

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

पपई-चेहर्‍यावर सुरकुत्या दिसत असतील तर पपईचा गर काढून चेहर्‍यावर लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.

नाशिकचा चिवडा

साहित्य – अर्धा किलो भाजके पोहे, अर्धा कप डाळ, खोबर्‍याचे काप, 1 कप शेंगदाणे, स्लाइस करून उन्हात वाळवलेला कांदा, अर्धा कप काळा मसाला, 2 चमचे तिखट, मीठ, 7-8 आमसुलं, धने-जिरे पूड, पिठी साखर, बारीक चिरलेला लसूण, 2 चमचे आल्याचा कीस, 2 चमचे तेल, फोडणीचे साहित्य.

कृती – तेल तापवून, कांदा लालसर तळून घ्या. दाणे, डाळ, खोबरं तळून घ्या. आमसुलं कुरकुरीत तळा. आलं, लसूण तळा. (आमसुलं, आलं, लसूण वाटून घ्या.) फोडणी बनवून त्यात आमसूल इ. वाटलेला मसाला परता.

किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक

किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.

हसा आणि शतायुषी व्हा!

आज गण्याने कमालच केली

पुन्हा बँकेत जाऊन झोपला कारण

तिथे लिहिले होते की ‘यहॉं सोने पर लोन मिलता है

किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक

किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.

ताण दूर करायचा तर…

आपण आनंदी राहण्याचा, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक वेळी यश मिळतंच असं नाही. अर्थात काही मागार्र्ंनी आपण मानसिक आरोग्य संतुलित राखण्यात यश मिळवू शकतो. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यक्त होणं. मनातल्या भावभावना व्यक्त करा. आसपासच्या माणसांशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे तुमचा ताण, अस्वस्थता कमी होईल. दररोज एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोला. अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपल्यावर अपेक्षांचं ओझं नसतं. कोणताही ताण नसतो. यामुळे ताण कमी व्हायला मदत होते. वाचनाची सवय ला- वून घ्या. स्वत:चं कौतुक करा. मदत करणार्‍यांचे आभार माना. आळशीपणा सोडा, आवडीच्या गोष्टी करा. मानसिकदृष्ट्या कार्यरत रहा.