परम संत कृपालसिंहर्जीचे देहावसान होऊन एक वर्ष झाले होते संगत आपल्या येणार्या मार्गदर्शकाचे खुप अधिरपणे वाट पाहत होती. या घोर दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराजजींच्या रूपात एक तेजःपुंज प्रकट झाला. काही काळानंतर महाराजजींनी मुंबईचा दौरा करण्याचे ठरविले. महाराजजी मुंबईला आणि आपल्या अमृत वचनाने सर्व संगतला कृतकृत्य केले. यानंतर महाराजींनी अमुल्य नामदान देऊन संगतला संतुष्ट केले. मला पण हुजूरांनी नामदान दिले. मी नामदान घेऊन एवढी खुष होती की या संपत्तीच्या समोर जगाचे कोणतेही ऐश्वर्य कमीच होते. मुंबईच्या नंतर महाराजजींचा ठाणे जिल्ह्यात दोन जागी सत्संग करायचा कार्यक्रम होता. महाराजजींनी सत्संगमध्ये प्रामाणिक कमाईच्या बाबतीत सांगितले आणि म्हणाले. कोणाकडून काहीही घेतले तर तुम्हाला ते परत करायला लागेल, हे कर्ज उतरण्यासाठी कदाचित दुसरा जन्मही घ्यावयास लागेल. हे ऐकताच मी बेचैन झाले कारण मी घरोघरी जाऊन सफाईचे काम करते आणि मला लोक काही ना काही देतच राहतात. मला वाटले की महाराजजींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल. माझ्या अंगावर शहारे आले आणि मी महाराजजींना भेटण्याचा निश्चय केला कारण नंतर परत भेटण्याची संधी मिळेल ना मिळेल. सत्संग संपताच मी स्टेजकडे जाऊ लागले कारण महाराजजी बरोबर बोलू शकेन. जवळ जाऊन मी प्रार्थना केली, महाराजजी मी तर अस्पृश्य आहे, खालच्या जातीची आहे. मला घरोघरी जाऊन सफाईची कामे करावी लागतात. लोक मला काहीतरी देत असतात. तर त्यांचे कर्जफेड करावयास मला परत जन्म घ्यावा लागेल काय? मला काहीच समजत नाही मी काय करू? हे ऐकून महाराजजींनी मला प्रेमळ आशिर्वाद दिला आणि जशी एक आई आपल्या मुलांची वेडीवाकडी बडबड ऐकून आपल्या मुलाला छातीशी कवटाळून घेते, मला पण तसाच अनुभव झाला. महाराजजींनी आपल्या पवित्र वाणीने मला समजावले आणि म्हणाले, अरे खुळी की काय तू? तू स्वतः ला अस्पृश्य का समजतेस? तू माझ्या हृदयाला विचार, मी तुला किती प्रेम करतो ते. तु कधीही स्वतःला खालच्या जातीची समजू नकोस. मी या देण्या-घेण्याच्या भानगडीतून तुला मुक्त करतो. तु आपल्या मनातून सारी भीती काढून टाक. एवढे महान होते माझे सद्गुरू परमसंत दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराज.
(कृपाल आश्रम, अहमदनगर)