आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

0
49

कला व छंद जोपासा – या वयापर्यंत आपण नोकरी, व्यवसाय तसेच संसारातील जबाबदार्‍यांमध्ये बर्‍यापैकी स्थिर झालेलो असतो. आपल्यामधील कर्तृत्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने काही स्त्रिया अति कष्ट व मानसिक ताणतणाव सहन करतात. रोजच्या कामामधून थोडा विरंगुळा हवा यासाठी काही छंद, कला जोपासणे गरजेचे असते. यामधून शरीर व मनाचे संतुलन होते. रोजच्या दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्याचा बर्‍याच जणींना कंटाळा येतो. एवढे दिवस नांगराला बैल जुंपल्याप्रमाणे बहुसंख्य स्त्रिया काम करत असते. परंतु चाळिशीमध्ये स्वतःचे मन रमेल, ज्या कलेमध्ये आनंद वाटेल असा एखादा छंद जोपासावा. तारुण्यात शिक्षणामुळे, घरच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे, एखादीला गाणे म्हणणे, नृत्य करणे या गोष्टी करायला जमल्या नसतील, तर नक्कीच तुम्ही या वयात त्या गोष्टी करा. शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चाळिशीमध्ये उगाचच उदास वाटणे, एकदम रडायला येणे, हताश झाल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे, माणसांमध्ये असूनही एकटे असण्याची भावना निर्माण होणे ही लक्षणे दिसून येतात. असे होऊ नये म्हणून शरीर व मन कायम आनंदी व प्रफुल्लित ठेवणे गरजेचे आहे. मन आनंदी ठेवण्यासाठी छंद जोपासायला हवा. चित्र काढणे, कॉम्प्युटर शिकणे, इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करणे, चांगली पुस्तके वाचणे, वृद्धाश्रमांना भेट देऊन तेथील वृद्धांना मदत करणे, अनाथालयाला भेट देऊन तेथील मुलांना एखादी कला शिकवणे हे सर्व या वयात करू शकतो. मुले मोठी झाल्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. तेव्हा स्वतःचा छंद जोपासावा.

हसणे ही एक कला आहे, ती आत्मसात करा – मानसिक ताण कमी करण्यासाठी खळखळून हसणे उत्तम होय. हसण्यामुळे चिंता आणि नैराश्य भावना कमी होते. चेहन्यावर काळजीने पडणार्‍या आठवा कमी होतात. इतरांशी संवाद साधताना नातेसंबध दृढ होतात. याकरिता सध्याच्या काळात हास्यक्लब सुरू झाले आहेत. हास्य ही कला जोपासल्यामुळे शरीर व मन नेहमी आनंदी राहते. त्यामुळे तारुण्य टिकण्यास मदत होते. सुरक्षितता पाळा तारुण्यामध्ये शरीर व मनाचा जोश उत्साहपूर्वक असतो. परंतु चाळिशीमध्ये शरीराची एक-एक तक्रार सुरू होते. मनावर कामाचा अतिताण आल्यामुळे व ’ब’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश बर्‍याच स्त्रियांमध्ये आढळून येतो. एखादे काम करत असताना हे काम कशासाठी करत आहे, फ्रिज कशासाठी उघडला हेच आठवत नाही. त्यामुळे कोणतेही काम करताना, वाहन चालवताना, एखादे उपकरण हाताळताना जाणीवपूर्वक, सावकाशपणे व सुरक्षितता बाळगून वापरावे. वाहन चालवताना पाठीचा कणा ताठ ठेवून सावकाश वाहन चालवावे. सनकोट, गॉगल हेल्मेटचा वापर करावा. चार चाकी वाहन चालवताना किंवा बसताना सीट बेल्टचा वापर करावा. कारण या वयामध्ये अपघात झाल्यास शरीराची हानी भरून येण्यास वेळ लागतो. या वयात शरीराला कमी प्रमाणात कॅल्शिअम मिळते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व एखादा अपघात झाला.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400