भात शिजवताना त्यात दोन तमालपत्रे, चिमूटभर मीठ टाका. भात सुवासिक होतो.
पोट साफ होण्यासाठी
पोट साफ होण्यासाठी व्याधिप्रतिकारक्षमत्व वाढविण्यासाठी सोन्याचे वाळे पाण्यात घालून आटवून पाणी दिल्यास उत्तम फायदा होतो. गूळ घातलेले पाणी पित्तकर आणि मूत्र वाढवणारे असते. पाण्याचा काढा म्हणजे अर्धे आटवून पाणी प्यायल्यास वजन कमी होते. ओवा घालून उकळवलेले पाणी सर्व प्रकारच्या वाताच्या विकारांमध्ये सेवन करावे. त्याचप्रमाणे सकाळी अनुष्टपोटी गरम पाणी, मध, लिंबू रस एकत्र करुन पिल्याने अन्नपचन चांगले होऊन पोट साफ होते.
विचारी अमोल
विचारी अमोल
काळा, बावळा वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुषीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत आठवीची पुस्तकं, वह्या, फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला, त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणार्या मुलांच्या गटात नेऊन बसविलं. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षिसं देण्यासाठी मगनशेठनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय, सगळं सांगितले. मुलांची चुळबूळ सुरू झाली. म्हणून आवरतं घेतलं. बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणार्या बक्षीसासह ५-६ बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला, “ही सर्व बक्षिसं मिळाल्यानं मला खूप आनंद झालयं. पण. मगनशेठनी पैसा मिळविलाय ‘गुटखा’ विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला. त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळविलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा.” सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. ‘अमोल हिरा’ असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून ५०० रुपये बक्षीस दिले.
तात्पर्य : मुलांना, ‘अमोलसारखे विचारी व्हा’ असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले.
उलटी का होते?
उलटी का होते?
उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते; हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की, मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यांमुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते. खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूंवर दाब येऊन उलट्या होतात. ही उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीने बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी-जुलाब होतच राहिले तर मीठ, साखरपाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या-जुलाब होत असतील, तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास; उलटीत रक्त किंवा लाल, काळा करडा रंग दिसल्यास; उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मान ताठरणे अशी लक्षणे असल्यास रुग्णास ताबडतोब डॉटरांकडे न्यावे
मक्याचे गुलाबजाम
मक्याचे गुलाबजाम
साहित्य – १ वाटी मयाचे पीठ, अर्धी वाटी खवा, दोन चमचे आरारुट, दोनशे
ग्रॅम छोटे बत्तासे, अडीचशे ग्रॅम साखर, चार वेलदोडे, तळण्यासाठी तूप.
कृती – मयाचे पीठ चाळून घ्या. त्यात आरारूट मिसळा. खवा कुस्करून मयाच्या
पिठात मिसळा. सर्व साहित्य एकत्र मिसळून भरपूर फेटा. फेटलेल्या मिश्रणाचे समान
आकाराचे पेढे बनवा. सर्व पेढ्यांमध्ये एकेक बत्तासा ठेवून गोल गुलाबजाम बनवा व तळून
घ्या. साखरेचा पाक बनवून त्यात गुलाबजाम टाका.
याने होईल स्मृतीनाश
याने होईल स्मृतीनाश
टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑटोबर या मासात सर्वांनी चहा जपून अल्प प्रमाणात प्यायला हवा.
दैनिक पंचांग रविवार, दि. ११ फेब्रुवारी २०२४
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, शततारा १७|३९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. संततीसौख्य लाभेल. दिवस आनंदात जाईल.
वृषभ : लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी चांगला काळ आहे.
मिथुन : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.
कर्क : मानसिक स्थिरता वाढेल. मानय्सन्मानात वाढ होईल. पुर्वसुकृत फळास येवून अर्धवट राहिलेली सरकारी कामे पूर्ण होतील.
सिंह : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. वाहने जपून चालवा.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. नोकरीत चांगला काळ राहिल. पदोन्नती व पगारवाढ होणार.
तूळ : आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही असाल. पत्नीकडून विवाहसौख्य प्राप्त होईल. अडकलेला पैसा मिळेल. भूमी, घर विकत घेण्याचे योग.
वृश्चिक : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील.
धनु : दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शयता आहे. अडीअडचणीत असलेल्यांना मदत केल्यास तुमचे काम लवकर पूर्ण होईल.
मकर : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. मागील केलेली भती आज फळास येईल व राहिलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ : व्यापार्यांसाठी परिस्थित साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. भातृचिंता सतावेल.
मीन : आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. मागील चिंता दूर होतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
कच्चे मांस खाल्ल्यास काय होते?
कच्चे मांस खाल्ल्यास काय होते?
आदिमानव शिकार करायचा. सुरुवातीच्या काळात तो कच्चे मांस खायचा. आजही जगात काही भागात अत्यंत मागासलेल्या अशा आदिवासी जमातींमध्ये कच्चे मांस खाण्याची प्रथा आढळून येते. जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार मानव चवीचवीने, विविध प्रकारे शिजवून/भाजून मांस खाऊ लागला. आज तर मांसाचे पदार्थ बहुतांश सर्वच हॉटेलांमध्ये उपलब्ध असतात व खवैय्ये या पदार्थांवर हात मारताना दिसतात. कच्चे मांस खाल्ल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे शिजवणे-भाजणे यामुळे अन्न पचायला सोपे होते. मसाल्यांच्या वापरामुळे ते चविष्ट बनते. अर्थात याहून महत्त्वाचे म्हणजे कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला टेपवर्म किंवा टेपकृमींचा संसर्ग होऊ शकतो. टिनिया सोलीयम, टिनीया सजायनाटा, ट्रिचिनॅलीस स्पायरॅलीस आणि फॅस्कीओला हेपॅटीका अशी या टेपकृमींची नावे आहेत. याखेरीज कच्चे मांस खाल्ल्याने अँथ्रॅस, अॅटीनोमायकोसीस (एक बुरशीजन्य रोग), प्राण्यांचा क्षयरोग तसेच अन्नविषबाधा इ. रोगही आपल्याला होऊ शकतात. आजकाल मुद्दाम तर कच्चे मांस कोणी खाणार नाही. पण हॉटेलमध्ये किंवा खूप लोक एकत्र जेवत असतील तशा ठिकाणी (खानावळ, लग्नाच्या मेजवान्या वगैरे) घाईगर्दीने मांस शिजवले जाण्याची शयता असते किंवा मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्यासाठी रोगट जनावरांचे मांस वापरले जाण्याची शयता असते. त्यामुळे मांस खाणार्यांनी त्यांना अशा प्रकारे त्रास होणार नाही याची खात्री करणे आवश्यक ठरते. सर्वात चांगला उपाय म्हणजे एकतर घरीच मांसाहार करणे आणि अनोळखी किंवा खात्री नसेल त्या ठिकाणी मांसाहार टाळणे.
बोराचे आरोग्यदायी फायदे
बोराचे आरोग्यदायी फायदे
रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचे काम बोर करते. अ जीवनसत्व असल्यामुळे नियमित
बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते. बोर वजन कमी करण्यासही मदत करते. त्वचेचे तारुण्य
टिकवण्यासाठी या फळाची मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी याचे सेवन
केल्यास सर्दीपासून बचाव होतो. बोर खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. हे फळ खाल्ल्यास
ताण हलका होतो. यात भरपूर प्रमाणात क जीवनसत्व आहे. यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक
असल्याने हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.





