केसांच्या समस्येसाठी उपयुत मेथी

0

केसांच्या समस्येसाठी उपयुत मेथी

केसांच्या समस्येवर मेथी उपयुत ठरते. मेथ्या मिसरला लावून दह्यामध्ये रात्री भिजत
घालावे. केसांना अर्धा तास मॉलिश करावे. अर्धा तासाने केस धुतल्यास केस तजेलदार आणि
चमकदार दिसतात. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मेथी उपयुत ठरते.
यामध्ये भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर ठरते.

सुविचार

सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणचे नम्रता. : कन्फ्यूशियस

मक्याचे व्हेजिटेबल इडलीफ्राय

0

मक्याचे व्हेजिटेबल इडलीफ्राय

साहित्य : १ ते २ कप मुगाची डाळ,
गाजर, फरसबी, कोबी, फ्लॉवर या भाज्यांचे
तुकडे, २ हिरव्या मिरच्या, आलं, लसूण
पेस्ट, कांदा, २ टेबलस्पून दही, बेकिंग सोडा,
तेल, मीठ.
कृती : मुगाच्या डाळीला २ तास
भिजवून घ्या. मीठ आणि पाणी मिस करून
ती वाटून घ्या. भाज्या शिजवून घ्या. भाज्या,
बेकिंग पावडर आणि दही हे वाटलेल्या
डाळीच्या मिश्रणात एकत्र करा. इडली पात्रात
टाकून त्याच्या इडल्या बनवून घ्या. थोड्या
वेळाने या इडल्यांचे तुकडे करून घ्या आणि
त्यांना तेलात डीप फ्राय करा. सॉस किंवा
हिरव्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

आकर्षक त्वचेसाठी

आकर्षक त्वचेसाठी

* एका कुस्करलेल्या केळामध्ये २
चमचे मध व्यवस्थित मिस करा. हे मिश्रण
त्वचेवर लावून २० मिनिटे ठेवा. या पॅकचा
वापर त्वचेत तुकतुकी आणून त्वचा आकर्षक
करण्यासाठी होतो. चेहर्‍याच्या सुंदरतेसाठी
मुलतानी मातीचाही वापर करता येतो.
* शिकेकाई आणि आवळ्याच्या
पाण्याने डोके धुऊन केसांना शुद्ध खोबरेल
तेल लावल्यास पांढरे केस काळे होतात.
ओठांना कात्रे पडल्यास साजूक तूप व लोणी
लावावे.

वास्तू

0

घराची उत्तर दिशा खुली असावी. दारे
व खिडया या उत्तर पूर्व दिशेला असल्यास
उत्तम. दक्षिण दिशा ही बंद असावी.

सल्ला

0

* कच्च्या बटाट्याची चिप्स करताना
तळण्यापूर्वी थोडा वेळ तुरटीच्या पाण्यात
टाकावीत. चिप्स एकदम कुरकुरीत व पांढरेशुभ्र
बनतील.
* चहाची उकळलेली पावडर फेकून
देण्याऐवजी वाळवून जाळावे. या धुराने डास
पिटाळले जातील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

नन्या : आई आई, मन्या येतोय, आधी सगळी खेळणी आत ठेवूयात.
आई : का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
नन्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!

दैनिक पंचांग मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी २०२४

श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी  (अंगारक योग), शके १९४५ शोभननाम
संवत्सर, माघ शुलपक्ष, उ.भा.१२|३५ सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य :

मेष:  महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार
घडेल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

वृषभ: यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील.
मुले व पत्नी यांचा उत्तम सहवास लाभेल.

मिथुन : बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. कोणत्याही प्रकारची जोखीम
टाळा. मात्र संयमाने सामोरे गेल्यास दिवस आनंदात जाईल.

कर्क : दिवस चांगला आहे. आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू
शकतील. कार्यालयाच्या ठिकाणी सहकार्यांशी वाद घालू नयेत.

सिंह :  इतर लोकांना आपण प्रभावित कराल. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी
मिळेल. संततीसौख्य प्राप्त होईल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बढती व
पगारवाढीचे योग आहेत.

कन्या : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी
उत्तम काळ आहे. वाहने व तांत्रिक उपकरणे जपून वापरावीत.

तूळ :  आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. काही महत्वपूर्ण प्रश्नांची
सोडवणूक होण्याची शयता आहे. मागील नियोजित कामे पूर्ण होतील.

वृश्चिक : कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. शत्रू वर्ग पराभूत होईल. आपल्या
फटकळ व उतावीळ स्वभावावर नियंत्रण मिळविल्यास यश प्राप्ती होईल. मागील उधारी
व उसनवारी वसुल होईल.

धनु :  स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात आर्थिक
लाभ मिळेल. पितृचिंता सतावेल. वडीलांशी वाद करू नकात. वाहने चोरीस जाण्याचा
संभव आहे.

मकर : नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळा. आनंदाची बातमी मिळण्याची शयता
आहे. दिवस अत्यंत आनंदात व समाधानात व्यतीत होईल.

कुंभ : पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी
बाळगा. आजचे काम उद्यावर ढक़लू नयेत यामुळे आपली प्रतिमा मलीन होऊ शकते.
वरिष्ठांकडून स्तुतीसमुमने उधळली जातील.

मीन : पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. पुर्व सुकृत
आज फळास येईल. मागील देणी पुर्ण होतील. दिवस आनंदात व उत्साहात जाईल. जुन्या
मित्र-मैत्रिणींची भेट होईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर
सासू आणि सूनेची जुळली पाहिजे…
संसार सुखाचाच होईल…
मुलगा कशाही परिस्थितीत जुळवून घेतो… बिच्चारा!

वास्तू

0

बोअरिंग करावयाचे असेल, हात पंप लावायचा असेल वा अंडर ग्राऊंड वॉटर टँक बनवायचा असेल, तर तो उत्तर वा पूर्व दिशेला असावा. याउलट ओव्हर हेड टँक दक्षिण वा पश्चिम दिशेलाच असावा. घरात इन्व्हर्टर, जनरेटर वा विजेचे मेन कनेशन आग्नेय वा वायव्य कोपर्‍यात असावे.

                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.