बटाट्याचे शंकरपाळे

0

बटाट्याचे शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या उकडलेल्या
बटाट्याचा लगदा, सव्वा वाटी मैदा, १ टी
स्पून लाल तिखट, १ टी स्पून जिरेपूड, पाव
टी स्पून हळद, तीळ भाजून गार केलेले पाव
वाटी, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे उकडून किसावेत व
मळून घ्यावे. अर्धी वाटी पाणी गरम करून
त्यात हळद, मीठ, तीळ, जिरेपूड, तिखट
घालून उकळावे. पाण्यातच दोन टी स्पून तेल
घालावे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर
त्यात बटाट्याचा लगदा मिस करावा व
परातीत ओतून मिश्रण थोडे गार करून त्यात
मैदा मिस करावा व घट्टसर गोळा करून
पोळपाटाला तेलाचा हात लावून पिठाची
पोळी लाटून कातण्याने शंकरपाळीचे आकार
कापावेत व तेलात खुसखुशीत तळावेत.
भाजीत घातलेल्या मसाल्यामुळे भाजीला
वेगळीच सुंदर चव येते.

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी
डोळ्याच्या खालील काळे डाग
घालवण्यासाठी बदामाचे थोडे तेल व
केळ्याच्या कुस्करलेला गर एकत्र करून
नियमित लावावे.

सल्ला

0

रात्री मुल बिछाना ओला करत असतील
तर त्यांना झोपायच्या आधी थोडा मध चाटवून
लघवी करायला लावा.

वास्तू

0

* मिठाचे खडे जर ईशान्य दिशेला
ठेवल्यास घरातील नकारात्मक उर्जा निघून
जाते. शौचालय चुकीच्या जागी बांधले
असल्यास त्याचे दोषही ईशान्येला ठेवलेल्या
मिठामुळे नष्ट होतात.
* टॉयलेटच्या दारासमोरील भिंतीवर
देवांचे फोटो लावू नयेत. झोपताना आपले
पाय देवाकडे नसावेत. तसेच या खोलीत
तामसी भोजनही करू नये.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,
तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
आजोबा : सूनबाई का आराडतीयास पोरावर….
सूनबाई : बघा ना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…
आजोबा : बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत…

दैनिक पंचांग शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०२४

राशिभविष्य

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, धनिष्ठा २०|३४
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

मेष : काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना
थारा देवू नका.

वृषभ : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश,
जागा खरेदीसाठी चांगला दिवस.

मिथुन : सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. संततीविषयक समस्या, खर्चात
वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. पितृचिंता सतावेल.

कर्क : धर्मविषयक कार्यांमध्ये मन रमवावेसे वाटेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. स्थावर इस्टेटी संदर्भात अडचणी, राजकारण्यांना अती ताण. संततीसौख्य लाभेल.

सिंह : कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. अतःमनावर नियंत्रण ठेवा. सर्व प्रकारचे लाभ, प्रवासात यश, व्यावसायिक प्रगती. दिवस आनंदात जाईल.

कन्या : आरोग्य चांगले राहील. आरोपय्प्रत्यारोपांपासून दूर रहा. शत्रू प्रभावहीन होतील. वैवाहिक जोडीदाराच्या चुकीमुळे आर्थिक तणाव वाढेल.

तूळ : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. आप्तजनाशी वितुष्ट, शारीरिक आळस वाढेल.
वाहने सावकाश चालवावीत. भावंडांचा सहवास लाभेल.

वृश्चिक : निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. बेपर्वाईने वागु नका. खर्च अधिक होईल. योग्य विचारसरणीमुळे व्यक्तींना नमवाल. मानसिक स्थिती चांगली राहिल.

धनु : मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग. आज पुर्वसुकृत फळास येणार आहे. मागील योजना यशस्वी होती.

मकर : कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील. आर्थिक उत्पन्न वाढेल,
कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

कुंभ : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. मान-सन्मानात वाढ होईल. करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास
होईल. पत्नीकडून उत्तम प्रकारचे विवाहसौख्य प्राप्त होईल.

मीन : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा. वाहने सावकाश चालवावीत.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पाहा आणि त्याचाच आधार घ्या. : स्वामी विवेकानंद

गुणकारी बटाटा

0

गुणकारी बटाटा

एखाद्या कमी वजनाच्या व्यक्तीस बटाटा खाण्याचा सल्ला डॉटर देतात. कारण त्यामुळे त्या
व्यक्तीचे वजन वाढण्यास मदत होते. एखादी व्यक्ती भाजली असेल किंवा त्याला जखम झाली
असेल तर त्या जखमेवर बटाट्याची साल लावतात. त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.

कैरीचा मुरंबा

0

कैरीचा मुरंबा

साहित्य : कैरीची साले काढून, फोडी
कराव्यात. अर्धा किलो फोडी, साखर एक
किलो, वेलची पूड, पाऊण टी स्पून, पाणी
पाऊण कप.
कृती : कैरीच्या फोडी स्वच्छ धुवाव्यात.
काळ्या पडू देऊ नयेत. चाळणीत ठेवून मग
कुकरमध्ये ठेवून, वाफवून घ्याव्यात; निवेपर्यंत
साखरेचा गोळीबंद पाक करावा; त्यात थंड
फोडी घालाव्यात.
मग पाकास दोन उकळ्या आणाव्यात.
आच मंद असावी; मग फोडी काढून घ्याव्यात.
पाक परत गॅसवर ठेवून घट्ट करावा. त्यात
वेलची पूड व फोडी घालाव्यात. थंड झाल्यावर
बाटलीत भरून ठेवाव्यात.

केसांच्या आरोग्यासाठी

केसांच्या आरोग्यासाठी

केस खूप गळत असतील तर आहारात
रोज राजगीरा लाडू किंवा राजगीरा लाह्या
खाव्यात. दूध किंवा ताक घ्यावे. अन्यथा
गव्हासह राजगीरा दळून आणावा. याचे प्रमाण
पाच किलो गव्हास एक किलो राजगीरा घेऊन
दळून आणावा. त्याचप्रमाणे हेअर डायचा वापर
केसांसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.