चेहर्‍यावरील उष्णता व जळजळ

पुदिना- चेहर्‍यावर उष्णता व जळजळ
जाणवत असेल तर पुदिन्याची पाने वाटून त्यात
गुलाब पाणी टाका व २० मिनिटे चेहर्‍यावर
लावून धुवा. चेहर्‍याला गारवा मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
’आई संजयने माझी पाटी फोडली.’
’कशी फोडली? थांब बघते मी संजयला.’
’मी त्याच्या डोयावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.

वास्तू

0


लॉफिंग बुध्दाची मूर्ती घरात ठेवणे सुख-समृध्दी व समाधानकारक मानले
जाते. स्वतः खरेदी केलेल्या मूर्तीपेक्षा भेट मिळालेली मूर्ती घरात ठेवणे जास्त लाभदायक
ठरते, अशीही धारणा आहे.

                           संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0

 


बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स
रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात.
बटाट्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते.
त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत
होते.

मुलायम चेहर्‍यासाठी 

 


मुलायम चेहर्‍यासाठी  एक चमचा मधात एक चमचा पाणी मिसळून चेहर्‍यावर व मानेवर लावा. वाळल्यानंतर
पाण्याने धुऊन घ्यावे. यामुळे त्वचा मुलायम व कोमल होईल.

सुविचार

 धर्माचे सर्वांत मोठे तत्त्व म्हणजे नम्रता होय

कर्माचे फळ

 कर्माचे फळ

एका अरण्यात एक सिंह राहत होता. शिकार करण्यात तर तो तरबेज होताच. पण अरण्यात त्याचा असा दरारा आणि वचक होता की, त्याचे नाव काढताच इतर प्राणी भीतीने चळचळा कापत असत. त्याच्या नुसत्या आवाजानेच सर्व प्राणी आपापल्या घरात लपून बसत. असे दिवस चालले असताना सिंह महाराज हळूहळू म्हातारे झाले. आता तर त्याला बसल्या जागेवरुन उठतासुद्धा येत नव्हते. तोंडातले सर्व दात पडले होते. नख्या झिजल्या होत्या. बरेच दिवस खायला न मिळाल्यामुळे तो अगदी मरायला टेकला होता. सिंहाची ही अवस्था सर्व प्राण्यांना समजली. सिंह महाराज आता जगत नाहीत, हे ओळखताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता, ते सर्व एकएक करुन त्याचा सूड घ्यायला येऊ लागले. प्रथम रेड्याने आणि बैलाने शिंगांनी त्याला जखमी केले. तरसाने त्याच्या पाठीचा लचका घेतला. कुत्रे त्याला चावू लागले. रानडुकराने आपले तीक्ष्ण सुळे त्याच्या पोटात खुपसले. कोल्ह्याने त्याची शेपटी करंडून घेतली. गाढवाने त्याच्या तोंडावर लाथा हाणल्या. सांबर त्याच्या अंगावर थुंकले. हे सर्व पाहून मरायला टेकलेला सिंह मनात म्हणाला, “हाय रे दैवा, काय ही माझी दैना? या अरण्याचा राजा म्हणून माझा किती मान होता. शुरातला शूर प्राणीसुद्धा मला पाहून चळचळ कापत होता. आणि आज? काय ही माझी गत. कोणी मला चावतो, कोणी शिंगे खुपसतो, माझ्यावर थुंकतो आणि ते हलके नीच गाढव मला लाथा मारते? देवा, यापेक्षा मरण आलेले मी सुखाने पत्करीन. तात्पर्य ः आपण इतरांवर अत्याचार करतो. पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा अत्यंत हलके गरीबही सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे?

मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे?

मधुमेह अथवा डायबीटीज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण टाइप २ बद्दल बोलत असतो कारण ९५% लोकांना टाइप २ असतो़. आता टाइप २ मधुमेह हा मुख्यतः २० वर्षां पुढील लोकाना कॉमन असतो. यात इन्सुलिनचे बनण्याचे प्रमाण कमी होते अणि त्याची एशन पण कमी होते अस समजा की निकृष्ट दर्जाचे इन्सुलिन बनते. याला इन्सुलिनअस म्हणतात. हा लठ्ठ माणसांमधे जास्त पाहावयास मिळतो. पोटावरची चरबी हे याच मुख्य कारण आहे. मधुमेह मागे २ प्रकारचे रिस्क फैटर असतात – बदलू शकणारे अणि न बदलू शकणारे बदलू न शकणारे फैटर म्हणजे वाढते वय, जेनेटिक हिस्टरी, एशियन रेस, इत्यादि. जस एशियन लोकांना पोटावर जास्त चरबी असते अमेरीकन लोकांशी तुलना केल्यास हे आपण बदलू शकत नाही. त्यामुळे मधुमेह टाळण्यासाठी आपण फक्त शर्पींळीेपाशपींरश्र किंवा बदलू शकणारे फॅटर्स वर लक्ष घेऊया. आता त्यात पुढील फैटर आहेत जे आपण बदलू शकतो. यात सकस आहार अणि नियमित व्यायाम ह्याला विशेष महत्व आहे. व्यायामाने फॅट अणि स्नायू पेशींच्या आत जायला मदत होते.

सकस आहाराने सर्व जीवनसत्व मिळतात अणि शुगर लेवल वाढत नाही. मधुमेह होण्याची रिस्क वाढते धुम्रपान केल्याने आपले ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवणे तळलेल्या गोष्टीं ऐवजी भाजलेल्या किंवा उकडलेल्या गोष्टी खाणे. आहारात पिष्टमय पदार्थ कमी करणे. प्रोसेस फूड कमी करणे. एक प्रकारे बारीक राहून आपण मधुमेह पासून वाचू शकतो मधुमेह हा एक ाशींरलेश्रळल ीूपवीेाश चा भाग आहे व त्यात लठ्ठपणा, वळीश्रळळिवशाळर म्हणजे चरबी गुंतागुंत, उच्च रक्तदाब हे सर्व येत. आज जर मधुमेह निदान झालाय तर अस समजा की ५ ते १० वर्षा आधी पासून ते रोप लावलाय ज्याचा झाड आता दिसतय. हळू हळू वजन वाढलं मग पोट पुढे आल मग रक्तदाब मग चरबी, मग मधुमेह. म्हणजे जर यापासुन जर वाचायचे आहे तर हे सर्व नियंत्रणात ठेवण महत्त्वाचे

रगडा ऑन टोस्ट

0

रगडा ऑन टोस्ट

साहित्य : २ कप पांढरे वाटाणे, १/४ चमचा खायचा सोडा, १ चमचा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे टोमॅटो, १ चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला १ चमचा, १ मोठी वेलची, २ लवंगा, दालचिनी १/२ इंचीचा तुकडा, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा लिंबाचा रस, ८ ब्रेडचे स्लाईस.

कृती : वाटाण्यांना रात्रभर भिजत ठेवावे. कुकरमध्ये पाणी, लवंग, दालचिनी, मोठी वेलची आणि १/२ चमचा मीठ टाकून गळेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर उकळलेल्या वाटाण्यांमधून लवंगा, दालचिनी आणि मोठी वेलची वेगळी काढून घ्यावी. त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ इत्यादी सामग्री टाकून मिश्रण एकजीव करावे. रगडा (भाजी) तयार आहे. आता टोस्टरमध्ये ब्रेड भाजून त्यावर थोडीशी भाजी आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

आरोग्यदायी गुळ

0

आरोग्यदायी गुळ

गूळ हा उष्ण असतो, म्हणूनच हिवाळ्य़ात तीळगुळाचे लाडू खाणे शरीरासाठी लाभकारी
ठरते. अशा प्रकारे वेगवेगऴया कारणांसाठी याचा उपयोग केला जाता