दैनिक पंचांग मंगळवार, दि. २० फेब्रुवारी २०२४

जया एकादशी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ शुलपक्ष, आर्द्रा १२|१३
सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०६ वा. ३४ मि.

राशिभविष्य

मेष : वैवाहिक जीवनात मतभेदांची शयता आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. विनाकारण खर्च वाढतील. कृपया कामे घाईघाईने करू नयेत.

मिथुन : महत्त्वाचे निर्णय नकोत. मनस्ताप संभवतो. वादविवाद टाळावेत. पितृचिंता सतावेल.

कर्क : घरातील कलह वाढण्याची शयता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत. कार्यालयातील वरिष्ठांशी जपून वागावे.

सिंह : वाहने सावकाश चालवावीत. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

कन्या : आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शयतो टाळावेत.

तूळ : काहींना मानसिक अस्वस्थता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. पत्नीकडून उत्तम विवाहसौख्य प्राप्त होईल.

वृश्चिक : नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे शयतो दुपारनंतर करावीत. भाऊबंद डोके वर काढण्याची शयता आहे.

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. मुले व पत्नी यांचा आज दिवसभर उत्तम सहवास लाभेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दिवसाची सुरुवात जरी निराशाजनक झाली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल आणि मनोबल वाढेल.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धडाडीचे निर्णय घेऊ शकाल. दिवस आनंदात जाईल. जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण होईल.

मीन : खर्चाचे प्रमाण कमी होईल. दुपारनंतर मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. पुर्वसुकृत फळास येईल. संततीसौख्य लाभेल.

                                                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

पती-पत्नीचा रतगट एक असेल तर मुले व्हायला काही प्रॉब्लेम येतो का?

पती-पत्नीचा रतगट एक असेल तर मुले व्हायला काही प्रॉब्लेम येतो का?

आपल्याकडे पत्रिका बघून एक नाडी असेल तर लग्नाला मनाई करतात. आणि त्यात किती तथ्य आहे आणि ही बाब वैज्ञानिक दृष्टीने किती बरोबर आहे याबद्दल मी काही सांगू शकत नाही. त्या बाबतीत तथ्यपूर्ण माहिती वाचायला आवडेल. मात्र ही समजूत आहे. मात्र यावर पण तोडगे अनेक ज्योतिषी सांगतात. एक नाडी आहे तरी अमुक केल्याने चालते वगैरे वगैरे. आपल्याकडे एक गोत्र असेल तर सहसा लग्न नाही करत. पण कारण एक गोत्र असेल तर एकाच पुरुषापासून व्युत्पत्ती झालेले आहे असे मानले जाते आणि मग ते बहीण भाऊ असे काहीसे नाते समजतात. पण वैज्ञानिक दृष्टीने साधारण ७ पिढ्या गेल्या की गुणसूत्रे बदलून जातात. त्यामुळे मूळ पुरुष एक असला तरी वेगवेगळ्या मूळ स्त्रिया त्यात सामील झाल्याने आणि स्त्रिया आपल्या अपत्यांना आपले ाळीेंलहेपवीळरश्र ऊछ देत असल्याने तो दोष ही नाहीसा होतो. अर्थात आपल्याकडे सगोत्री विवाह करतात, मुलीला मामाच्या मांडीवर देऊन. म्हणाजे आपल्या आईच्या गोत्रात जाऊन. अर्थात अर्धी आणि सुतभर अधिक ती मुलगी आईच्या गोत्रचीच असते ही बाब गौण समजून दुर्लक्ष करतात. मात्र एक रक्त गट असेल तर काहीही फरक पडत नाही. मुले होण्यास काहीच अडचण नाही. अपत्याचा रक्त गट बहुतेक तोच राहील. रक्त गट आणि मुले होणे यांचा काहीच संबंध नाही. अर्थात, इ, ज आणि इ हे रक्तगट. हे काहीही असू शकतात. पण ठह फॅटर हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो. जर वडील ठह िेीळींर्ळींश आणि आई ठह पशसरींर्ळींश असेल आणि जर होणारे अपत्य ठह िेीळींर्ळींश झाले तर पोटात असताना बाळाच्या रक्तातील ठह फॅटरच्या विरोधात आईच्या शरीरात रपींळलेवळशी निर्माण होतात. आणि मग दोघांच्याही आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. जुन्या काळी जेव्हा हे माहीत नव्हते तेव्हा मुलींना खूप धोका असायचा. पण आजकाल रक्त तपासणी करून त्यासाठी औषध योजना करून हा धोका टाळता येतो. मात्र त्यासाठी आईचे रक्त तपासणे गरजेचे आहे. जर ती स्वतः ठह िेीळींर्ळींश असेल तर बाळ ठह पशसरींर्ळींश चालते. फक्त आई पशसरींर्ळींश असेल तर काळजी घ्यावी लागते. मग वडलांचे रक्त तपासण्यात येते. जर आई इ + असेल, तर वडील इ, इ, की ज + की काहीच फरक पडत नाही. पण आई इ – असेल तर वडलांचा ठह षरलीेीं तपासावा लागेल.

सुविचार

बुद्धी असणार्‍यांजवळ सर्व काही असते; परंतु मूर्खाजवळ सर्व असूनही काहीच नसते. : तिरुवल्लुवर

आईस्क्रीमच्या अतिसेवनाने होणारे नुकसान

0

आईस्क्रीमच्या अतिसेवनाने होणारे नुकसान

आईस्क्रीम अतीप्रमाणात खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकते. आईस्क्रीममध्ये शुगर
कंटेंट जास्त असते. अशात जर तुम्ही जास्त प्रमाणात याचे सेवन करता तर लठ्ठपणाचा धोका
वाढतो. त्याशिवाय बटर आणि चॉकलेटने तयार आईस्क्रीममध्ये कॅलरी देखील जास्त असते,
जी शरीरासाठी नुकसानकारक ठरते.

पेसारट्टू डोसा

0

पेसारट्टू डोसा

साहित्य : २ कप मूग डाळ, १/४
कप तांदूळ, १ छोटा तुकडा आलं, २ हिरव्या
मिरच्या, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार
मीठ.
कृती : मूग डाळ आणि तांदूळ ७-८
तास भिजत ठेवा. मूग डाळ आणि तांदुळामध्ये
बाकी आवश्यक साहित्य घालून बारीक वाटून
घ्या. चवीप्रमाणे मीठ घालून एक तास ठेवा.
नॉनस्टिक तव्यावर डोसे बनवा. नारळाच्या
चटणीबरोबर सर्व्ह करा.

त्वचेच्या कोमलतेसाठी

त्वचेच्या कोमलतेसाठी
* लिंबाचा पाला पाण्यात उकळून,
गार करून त्या पाण्याने केस धुवावे.

सल्ला

0

जर फर्निचरवर कोठेही गंज आढळून
आला तर तो मऊ कापडाने वा स्कोअरिंग
पेज (पातळ सँड पेपर) ने घासावा.

वास्तू

0

* या मूर्तीच्या प्रभावामुळे कुटुंबिय
निराश, दुःखी, वैफल्यग्रस्त व उदासीन न
बनता आनंदी, सक्रिय व आशावादी राहतात,
असे फेंगशुईने मानले आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

बंटी अभ्यास करीत बसलेला असतो…पाहुणे घरी येतात,
बंटीला विचारतात ‘बंटी बाबा घरी आहेत का?’
बंटी ‘मग मी काय येडा म्हणुन अभ्यासाला बसलोय का?’

दैनिक पंचांग रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४

शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, रोहिणी ०९|२३
सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०६ वा. ३४ मि.


राशिभविष्य
मेष:  श्रम अधिक झाल्यामुळे  दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे
अप्रसन्न राहाल.

वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल.

मिथुन:  मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्यउत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे.
महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

कर्क : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ
होईल. लेखन कार्यात यश मिळेल.

सिंह :  कोणताही अर्ज देण्यासाठी उत्तमवेळ. आरोग्य चांगले राहील.

कन्या :  कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील.

तूळ :  शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद
देतील .

वृश्चिक :  मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण
उत्तम राहील.

धनु :  कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

मकर :  मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ  : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल.

मीन :  एखाद्या प्रोजेटसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची
वेळ आली आहे.

                                                               संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.