तजेलदार चेहर्‍यासाठी

तजेलदार चेहर्‍यासाठी

२५ मिली ग्लिसरीन व २५ मिली शुद्ध
गुलाबपाणी एकत्र मिसळून त्यात ५ गॅ्रम सल्फर
पावडर मिसळा. हा लेप रात्री चेहर्‍याच्या
डाग-मुरमांवर लावून ठेवा. सकाळी चेहरा
पाण्याने धुवा. या लेपामुळे आठवडाभरातच
अ‍ॅनेच्या समस्येतून आपली सुटका होईल.
उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी आठवड्यातून
३ वेळा हा लेप लावा. जर आपण संगणकावर
८ तास काम करत असाल तर डोळ्यावर
पाण्याचा शिडकावा दर १ तासाने मारावा.

सल्ला

0

पाय मुरगळल्यावर गरम पाण्यात मीठ
घालून पाय बुडवून ठेवावा.

वास्तू

0

दक्षिणेस असलेल्या कपाटात खूप
सामान असेल; परंतु रोकड आणि दागिने मात्र
कमी असतील, तर ते कपाटाच्या वरच्या
खणात ठेवावेत. खटला किंवा कर्जासारख्या
वादग्रस्त विषयांचे दस्तऐवज या दिशेच्या
कपाटात ठेवणे कटाक्षाने टाळावे. त्यासाठी
पूर्वेकडील किंवा उत्तर-पुर्वेकडील कपाट सर्वोत्तम होय..

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी २०२४

गुरुपुष्यामृत, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ शुलपक्ष, पुष्य १६|४३
सूर्योदय ०६ वा. ३१ मि. सूर्यास्त ०६वा. ३३ मि.

राशिभविष्य 

मेष : आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. शत्रूंना मात द्याल.

वृषभ : स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील.

मिथुन : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल.

कर्क : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.

कन्या : स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल.

तूळ : कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.

वृश्चिक : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील.

धनु : एखाद्या महत्वाच्या प्रोजेटमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.

मकर : हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा.

कुंभ : देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

मीन : जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

                                                                                    संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

काही व्यक्तींना उंचीची भीती का वाटते?

काही व्यक्तींना उंचीची भीती का वाटते?

भीती वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकाला
कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते.
अंधाराची, सापाची, वाघाची, आजारपणाची अशा
अनेक प्रकारच्या भीतीने लोक ग्रासलेले असतात.
काही लोकांना उंचीची भीती वाटते. डोंगरावर
गेल्यानंतर काही व्यक्ती घाबरून जातात. आपल्यापैकी
कोणीही १०० मजली इमारतीच्या छतावर जाऊन
खाली पाहू लागला, तर त्याला नक्कीच भीती वाटेल;
पण पाचव्या मजल्यावर गेल्यावर क्वचितच कोणाला
भीती वाटेल. उंचीची भीती वाटणारी व्यक्ती नुसते
गिर्यारोहणाचे नाव काढताच घामाघूम होते. अशी
भीती वाटणार्‍या व्यक्तींमध्ये उंचावर गेल्यास झोप न
येणे, भूक न लागणे, वाईट स्वप्न पडणे, हातपाय
थरथरणे, खूप घाम येणे; ही लक्षणे दिसतात.
रक्तदाबही वाढतो. वागण्यात चिडचिडेपणा येतो.
एखाद्या वस्तूविषयी अवास्तव भीती बाळगणे, यालाच
‘फोबिया’ असे म्हणतात.
तणावग्रस्त मानसिकता असण्याचे हे उदाहरण
होय. हा एक प्रकारचा सौम्य असा मनोविकारच
आहे. मनाचा विग्रह करून ही भीती काढण्याचा
प्रयत्न केल्यास ती कमी होऊ शकते. मनोविकार
तज्ज्ञाचा सल्ला घेणे अशा वेळी श्रेयस्कर ठरते,
अन्यथा हा मानसिक रोग गंभीर रूप धारण करू
शकतो.

बोराचे अनेक आरोग्यदायी फायदे

0

बोराचे अनेक आरोग्यदायी फायदे

रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचे काम बोर करते. अ जीवनसत्व असल्यामुळे नियमित
बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते. बोर वजन कमी करण्यासही मदत करते. त्वचेचे तारुण्य
टिकवण्यासाठी या फळाची मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी याचे सेवन
केल्यास सर्दीपासून बचाव होतो. बोर खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. हे फळ खाल्ल्यास
ताण हलका होतो. यात भरपूर प्रमाणात क जीवनसत्व आहे. यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक
असल्याने हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.

सुविचार

गर्वाने देव दानव बनतात, तर नम्रतेमुळे मानव देव बनतो. : ऑगस्टाईन

स्प्राउट चाट

0

स्प्राउट चाट

साहित्य : २ चमचे तेल, १ चमचा
हिरव्या मिरचीची पेस्ट, १ कप मोड आलेले
मूग, अर्धी वाटी मोड आलेले चणे, अर्धा तास
पाण्यात भिजलेले पाव कप शेंगदाणे, पाव कप
बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक
चिरलेले पत्ताकोबी, पाव कप किसलेले
गाजर, पाव कप बारिक चिरलेली कोथिंबीर,
लिंबाचा रस, मीठ, साखर, चाट मसाला, जिरे
व काळे मिरेपूड चवीनुसार.
कृति : तेल गरम करून त्यात हिरव्या
मिरचीची पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर
त्यात मूग, चणे आणि थोडेसे मीठ घालून
चांगल्या प्रकारे परतून २-३ मिनिटे झाकण
ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बाकी
उरलेले साहित्य टाकावे. या चाटमध्ये द्राक्ष,
डाळिंब किंवा संत्र्यासारखी फळेसुद्धा घालू
शकता.

सल्ला

0

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

माणूस दर मिनिटाला किमान दहा
वेळा पापण्यांची उघडझाप करतो. डोळ्यांच्या
स्नायुंद्वारे आपल्या पापण्या हालचाल करीत
राहतात. डोळ्यांवर पापण्यांखाली अश्रूग्रंथी
असतात. जेव्हा पापण्या हालचाल करतात
तेव्हा जलकणांचा स्त्राव होऊन डोळ्यात
पसरत राहतो. त्यामुळे डोळे ओले पडतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्या ओल्या राहणे
अत्यंत गरजेचे असते.

वास्तू

0

घराचा नैर्ऋत्य कोपरा नेहमी वस्तूंनी
भरलेला असला पाहिजे. येथे जास्त रिकामी
जागा सोडू नये, अशा प्रकारच्या भूखंडाच्या
चारी बाजूंनी रिकामी जागा सोडली पाहिजे.