पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे


पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे,
उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने जंतुसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या
दिवसांत काही पदार्थ टाळले पाहिजेत. या दिवसांत सलाड खाणे टाळावे. कापल्यानंतर फळे
लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅटेरियाची वाढ होते.

हसा आणि शतायुषी व्हा!

पया दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला
म्हणाले,
पया परिक्षेची तयारी झाली का ?
पया : होय काका, काळी पेन, निळी पेन,
शिस पेन्सिल, खोड रबर
आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.

वास्तू

 


* दाम्पत्यजीवन सुखी करण्यासाठी तसेच रोमान्म वाढण्यासाठी फेंगशुईप्रमाणे
क्रिस्टल बॉल बेडरूममध्ये टांगावा. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. बेडरुमम
ध्ये पाणी असलेले कोणतेही पेंटींग लावू नये, त्याऐवजी एखादी रोमँटिक कलाकृती, युगल
पक्षाचा फोटो लावावा.

* जेवणाच्या खोलीच्या दरवाजावर फुलांचे चित्र लावावे. शेजार्‍यांच्या घराकडून
येणार्‍या घातक प्रभावांपासून वाचण्यासाठी विंडचाईम किंवा वेली लावाव्यात.

                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

फ्रीजच्या आत वस्तूंचा गंध येत असेल तर

 


फ्रीजमध्ये एका छोट्या प्लॅस्टिक
पाकिटात खायचा सोडा ठेवला तर फ्रीजला
आत ठेवलेल्या वस्तूंचा गंध येणार नाही.

ओठांची निगा

ओठांची निगा


* ओठांना जर भेगा पडत असतील
तर शुद्ध तूप आणि गुलाबपाणी एकत्र करून
हे मिश्रण रात्री झोपताना ओठांना चोळावे.
* वाटून त्यात १ चमचा दूध व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व
१० मिनिटांनंतर चेहरा धुवा.

मनाचे वर्तन

काही अंतर जात नाही, तोच परत एक माणूस आडवा येत म्हणाला, “बाबा, घोडा तुमचाच आहे ना?” “हो तर, हा आमचाच आहे”. असे म्हातारा उत्तरला असता तो माणूस म्हणाला, “मला काही हे खरे वाटत नाही. हा जर तुमचाच घोडा असता, तर तुम्ही बिचार्‍याचे असे हाल केले नसते. खुशाल दोघे आरामात त्याच्यावर बसलात. बिचारा ओझ्याने अगदी थकून गेलेला दिसतो. आता तुम्ही दोघे त्याला उचलून घ्या आणि चालू लागा.” असा सल्ला मिळताच दोघे बापलेक घोड्यावरून खाली उतरले. मग त्यांनी घोड्याला जमिनीवर आडवे पाडून त्याचे पाय दोरीने बांधून त्यात एक जाडजूड वेळू अडकवला आणि ते घोड्याचे धूड खांद्यावर घेऊन ते पुढे चालू लागले असता हे अजब दृश्य पाहून सर्व लोक त्यांच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले. काही लोक टाळ्या वाजवू लागले. हा कोलाहल ऐकून घोडा बिथरला. त्याने पायांना हिसके देत दोर तोडला. पायाचे दोर तुटताच घोडा खाली वाहत असलेल्या नदीत पडला आणि बुडून मेला.

तात्पर्य : एखादे काम करीत असता जो तो वेगवेगळ्या सूचना देत असतो. त्यावेळी योग्य अयोग्य हे आपल्या मनाशी ठरवून वर्तन करावे.

हिमोग्लोबिन म्हणजे काय 

हिमोग्लोबिन म्हणजे काय 

हिमोग्लोबीन म्हणजे आपल्या शरीराचा प्राणच आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिमोग्लोबीन रक्तातील लाल पेशीत असते. हिमोग्लोबीन हे हिम व ग्लोबीन या दोन घटकांचे बनलेले असते. ग्लोबीन हे एक प्रथिन असून हिम या रंगद्रव्यात पार्फायरीन असते. पार्फायरीनमध्ये लोह असते व चार पायरॉल रचना असतात. हिमोग्लोबीनच्या या विशिष्ट रचनेमुळे ते ऑसिजन वा कार्बनडायऑसाईडशी संयोग पावते व अनुक्रमे ऑसी व कार्बोसी हिमोग्लोबीन तयार होतात. या त्याच्या गुणधर्मामुळेच शरीराला ऑसिजन पुरविणे व शरीरात तयार झालेला कार्बन डायऑसाईड फुप्फुसापर्यंत पोहोचविणे, हे कार्य ते करू शकते. हिमोग्लोबीन लाल असते व त्यामुळे रक्ताला लाल रंग असतो. फुप्फुसामध्ये कार्बोसी हिमोग्लोबीनमधून कर्बवायू सोडला जातो व ऑसिजनशी हिमोग्लोबीनचा संयोग होऊन ऑसिहिमोग्लोबीन तयार होते. त्याद्वारे शरीरात ऑसिजनचा पुरवठा होतो. हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी प्रथिने, जीवनसत्वे लोह यांची आवश्यकता असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्यास रक्तक्षय असे म्हणतात. प्रौढ माणसाच्या रक्तात दर मिलीला १३ ते १५ ग्रॅम इतके हिमोग्लोबीन असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासाठी समतोल आहार, हिरव्या पालेभाज्या यांचे खूप महत्त्व आहे. गरज पडल्यास लोहाच्या गोळ्या देऊन वा औषध देऊन वा क्वचित प्रसंगी व्यक्तीस रक्त देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविता येते. माणूस गुदमरल्यास वा श्वसनात ऑसिजन न मिळाल्यास रक्तातीत कार्बोसी हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. माणूस निळसर दिसतो. त्याला श्वास घेता येत नाही. दम लागतो व मृत्यूही ओढवतो. असे हे हिमोग्लोबीन.

ओवा किडनीस्टोनसाठी टॉनिक

ओवा किडनीस्टोनसाठी टॉनिक

 


ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात,
मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा, असा डॉटरही सल्ला देत असतात. कारण,
लघवीला चालना देण्यात ओवा उपयुत ठरतो.

हसा आणि शतायुषी व्हा!

 

शिक्षक : असं कोणतं पिक आहे,
ज्याचा रस खूप गोड असतो?
बंड्या : माहीत नाही.
शिक्षक : आठव जरा, तुमच्या घरात
येणारी साखर कुठून मिळते?
बंड्या : शेजारच्यांकडून..

दैनिक पंचांग रविवार, दि. २४ मार्च २०२४

हुताशनी पौर्णिमा (होळी), शके १९४५ शोभननामसंवत्सर,  फाल्गुन शुलपक्ष,                                               पूर्वा  ०७|३४ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

 

राशिभविष्य

मेष:  जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे
शय आहे. आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे.

वृषभ : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल. सहकार्यांकबरोबर प्रतिष्ठा वाढेल.
आरोग्य उत्तम राहील. आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. प्रसिद्धी वाढण्याची
शयता आहे. आपले धाडस वाढेल.

मिथुन :  मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनात वातावरण
मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल.

कर्क : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची
स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. कौटुंबिक
विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.

सिंह : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या नव्या संधी देईल परंतु घाई
करणे वादाला कारण ठरू शकते. मागील उधारी वसुल होईल.

कन्या : कौटुंबिक वातावरण सुखदराहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल                                            राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात
बनवेल. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. आनंदाची बातमी मिळेल. स्थावर संपत्ती व
कोर्ट-कचेरी यांच्या झंझटमध्ये आज पडू  नका.

वृश्चिक: आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये
कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. पैसाही खर्च होईल. आजचा आपला दिवस मित्र
आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल.

धनु : व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल.
वरिष्ठांशी वितुष्ट येण्याची शयता आहे. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम
ठेवा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

मकर : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात
एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. कुटुंबियांबरोबर वार्तालापाने फायदा. स्थिती
अनुकूल राहील.

कुंभ :  एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता आहे. व्यापार-व्यवसायात
आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा.

मीन : वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या
हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय
आहे.

                                                             संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.