चेहर्‍यावर डाग असतील तर

* जर चेहर्‍यावर डाग असतील तर
मुलतानी मातीत चंदन पावडर, चिमूटभर हळद
व २-३ थेंब कापराचे तेल टाकून चेहर्‍यावर
लेप लावल्यास हळूहळू डाग नाहीसे होतात.
* रिठा-आवळा-शिकेकाई यांची
पूड काष्ठौषधीच्या दुकानात मिळते. ते तिन्ही
समप्रमाणात २-२ चमचे घेऊन शुध्द खोबरेल
तेलात एकत्र करावी. हे उटणे केसांना व
केसमुळांना लावून १५ मिनिटे आराम करावा.
मग स्नान करावे. आठवड्यातून २ दिवस हा
प्रयोग केल्याने केस सुगंधीत व मऊ रेशमी
होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दही विरजताना

* हातापायाला भेगा पडल्यास जुने तूप
लावा.
* वापरलेली चहा पावडर पाण्यात
टाकून ढवळा व त्या पाण्याने लाकडी फर्निचर
व काचा स्वच्छ करा. सर्व डाग जातील.
* डोळ्यांची आग थांबण्यासाठी
काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात.
* दही विरजताना भांड्याला जर
थोडीशी तुरटी चोळली तर दही उत्तम विरजते
व चवही चांगली येते.

वास्तू

वास्तूदोष दूर करण्यासाठी ईशान्य कोपर्‍यामध्ये एक अंडरग्राऊंड
वॉटर टँक निर्माण करून तसेच त्यात पाण्याचा साठा करून त्या क्षेत्रातील वास्तुदोष
दूर करता येतात.

घोडा आणि म्हातारा

घोडा आणि म्हातारा

एका गावात एक म्हातारा आपल्या मुलांसोबत राहात होता. त्यांनी एक घोडाही पाळला होता. पुढे काही दिवसांनी घोडा विकून टाकावा, असे वाटल्याने म्हातारा व त्याचा मुलगा घोडा विकण्यासाठी बाजाराच्या रस्त्याने चालले होते. काही अंतर गेल्यानंतर वाटेत त्यांना एक माणूस भेटला आणि म्हणाला, “आजोबा, अहो, त्या मुलाला पायीच कशाला चालायला लावता? त्यापेक्षा त्याला घोड्यावर बसवा आणि तुम्ही लगाम धरून चालत जा.’ असे म्हणताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसवले आणि स्वतः लगाम धरून पुढे चालू लागला. असे काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा त्यांना एक माणूस आडवा आला आणि घोड्यावर बसलेल्या मुलाला म्हणाला, “अरे आळशा, मूर्खासारखा स्वतः घोड्यावर बसलास आणि आपल्या म्हातार्‍या बापाला खुशाल चालायला लावतोस. तुला काही शरम तरी आहे की नाही?” असे ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावरून खाली उतरवले आणि स्वतः घोड्यावर बसला आणि मुलगा लगान धरून पुढे चालू लागला. अशा प्रकारे काही अंतर जाताच वाटेतील दोन स्त्रियांचे लक्ष त्यांच्याकडे जाताच त्या बोट दाखवीत म्हणाल्या, “बिचारा मुलगा पायी चालला आहे आणि बाप बघा कसा आरामात बसून प्रवास करीत आहे! याला काही मुलाविषयी प्रेम दिसत नाही.” तसा त्या स्त्रियांचा संवाद ऐकताच म्हातार्‍याने आपल्या पाठीमागे मुलाला बसविले आणि वाट चालू लागला. (क्रमश:)

वडस म्हणजे काय?

वडस म्हणजे काय?

वडस हा डोळ्यांचा विकार आहे, तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांचा नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणार्‍या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतीमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो. वडस म्हणजे डोळ्यातली श्लेष्मल आवरणाची एक त्र्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या बाजूने वाढते. बाहुलीवर पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात. वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत असेल तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.

मँगो चॉकलेट

मँगो चॉकलेट

साहित्य : आंबा रस ताजा चार कप,दूध पावडर दोन कप, साखर तीन कप,
ग्लुकोज पूड एक कप, पाव कप शुध्द तूप.

कृती : आंब्याच्या रसात साखर घालून ती पूर्ण विरघळून घ्या. नंतर दूध पावडर व ग्लुकोज पूड एकत्र करुन चांगली मिसळून आंबा मिश्रणात टाकून भांडे मंदाग्नीवर ठेवा. ढवळत राहा. मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत थांबा. थाळीला तुपाचा हलकासा हात लावून हे घट्ट झालेले आंबा मिश्रण त्यात ओता.पसरुन थापा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. आंबा चॉकलेट तयार

पांढर्‍या रंगाच्या भाज्यांमुळे आरोग्यास लाभ

पांढर्‍या रंगाच्या भाज्यांमुळे आरोग्यास लाभ

पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्याने देखील कर्करोगाची
आणि ट्यूमरची शयता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात उपयुक्त असल्यामुळे
हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात. पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये अलिसिन
आणि फ्लेव्होनॉइड भरपूर प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा,
कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता.

वडस म्हणजे काय?

वडस म्हणजे काय?

वडस हा डोळ्यांचा विकार आहे, तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांचा नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणार्‍या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतीमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो. वडस म्हणजे डोळ्यातली श्लेष्मल आवरणाची एक त्र्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या बाजूने वाढते. बाहुलीवर पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात. वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत असेल तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.

पांढर्‍या रंगाच्या भाज्यांमुळे आरोग्यास लाभ

पांढर्‍या रंगाच्या भाज्यांमुळे आरोग्यास लाभ
पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्याने देखील कर्करोगाची
आणि ट्यूमरची शयता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात उपयुक्त असल्यामुळे
हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात. पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये अलिसिन
आणि फ्लेव्होनॉइड भरपूर प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा,
कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता.

सुविचार

भीरुतेवर आत्म्याचा शानदार विजय हाच पराक्रम होय. : एनियल