आरोग्य

0
39

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे


पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे,
उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने जंतुसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या
दिवसांत काही पदार्थ टाळले पाहिजेत. या दिवसांत सलाड खाणे टाळावे. कापल्यानंतर फळे
लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅटेरियाची वाढ होते.