
* नेहमी ३० एसपीएफ ग्रेडची सनस्क्रीन
वापरावी. यामुळे बॅकलेस ड्रेस वापरला तरी
त्वचा काळी पडत नाही.
नायलॉन पोह्यांचा चिवडा
नायलॉन पोह्यांचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो नायलॉन पोहे, १ कप भाजून सोललेले दाणे, अर्धा
कप खोबर्याचे अतिशय पातळ काप, १ कप डाळ, ६-७ हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची
अर्धा कप पाने धुऊन, पुसून, चिरून, मीठ, पिठीसाखर, जिरेपूड, नेहमीची जास्त हिंग
घातलेली फोडणी, थोडे साजूक तूप.
कृती : पूर्वतयारी करून ठेवा. हे पोहे फार नाजूक असतात. म्हणून शयतो,
मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्या. खोबरे, दाणे, डाळं तळून घ्या. तुपाची फोडणी बनवून त्यात
मिरच्या, कढीलिंब परता. पोहे, डाळ, दाणे, खोबरे, जिरेपूड, मीठ, साखर इ. घालून चांगले
ढवळून घ्या. (गॅस बंद ठेवा) गार झाल्यावरडब्यात भरा.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. २६ मार्च २०२४
वसंतोत्सवारंभ, अभ्यंगस्नान, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष,
हस्त १३|३४ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष: नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे
सफल होतील. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील. पदोन्नतीचा
योग आहे. कार्यलयात अधिकार्यांकडून सहकार्य मिळेल.
वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न
करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. कौटुंबिक समस्या निर्माण
होण्याची शयता आहे.
मिथुन: मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात
असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आपल्याला आज
प्रतिकूल दिवस आहे.
कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करण्यार्यांना आज फारच लाभदायक दिवस
आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल. अजीर्णचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन यात
रस वाटेल.
सिंह: भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम
करायला उत्साह वाटणार नाही. मित्र व स्नेही भेटल्यामुळे आनंदात असाल. आपल्या
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर
संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.
तूळ: आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार
नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून दूरराहणच आज फायदेशीर होईल. कौटुंबिक
जीवनात सुख-शांती मिळेल. मानसिक व्यग्रता,शारीरिक शिथिलता अनुभवास येईल.
वृश्चिक: शारीरिक व मानसिकस्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी
व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.
अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल.
धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा- वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील.
कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धन आणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून
सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. वाहने काळजीपूर्वक चालवा.
मकर: हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.
आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य
बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. पैशाच्याबाबतीत आपली नड भागेल.
कुंभ: आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे यावेळी
आपल्यासाठी फलदायी आहे. कामात सांभाळूनच पुढे चला. कोर्ट कचेरीपासून दूरच
राहा.
मीन: जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये
स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. भागीदाराबरोबर
सुद्धा मतभेद होऊ शकतात. परिवारात आनंदी वातावरण असेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
वास्तू
* जेवणाच्या खोलीच्या दरवाजावर फुलांचे चित्र लावावे. शेजार्यांच्या घराकडून
येणार्या घातक प्रभावांपासून वाचण्यासाठी विंडचाईम किंवा वेली लावाव्यात.
* झोपण्याच्या खोलीत नेहमी सुंदर, कलात्मक व हसणार्या बाळाची प्रतिमा
लावा.
* जेवणाच्या खोलीचा रंग शांत आणि शीतलता प्रदान करणारा असावा.
* च्युइंगम चावल्याने मानसिक क्षमतेत पन्नास टक्के इतका फायदा होऊ शकतो.
याने आपला हार्ट रेट वाढतो आणि या कारणाने रक्ताचा असरही वाढतो. यामुळे
मेंदूतील ऑसिजनचे प्रमाण वाढते. यामुळे स्मरणशक्तीमध्ये अधिक फायदा होतो.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
जाळ्यात अडकलेला सिंह
जाळ्यात अडकलेला सिंह
एका वनात एक सिंह राहत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. फारच गरम होऊ लागले म्हणून सिंहाची स्वारी एका छायाळ वृक्षाखाली आरामात झोपी गेली. तेथेच उंदरांची वस्ती होती. शांत झोपलेले सिंह महाराज पाहून उंदीर त्याच्या अंगा-खांद्यावर खेळू लागले. थोडा वेळ सिंहाने हे कसे तरी सहन केले; परंतु उंदरांचा त्रास फारच वाढल्याने त्याची झोपमोड झाली. रागानेच त्याने एका उंदराला आपल्या पंज्यात पकडले. त्याला आता फाडून खाणार, तोच उंदराने गयावया करीत त्याला म्हटले, “महाराज, चुकलो मी. मला क्षमा करा. पुन्हा माझ्या हातून अशी आगळीक घडणार नाही. आपण तर सर्व प्राण्यांचे राजे. आपण महान. मी तर आपणापुढे अगदीच किरकोळ. माझ्या रक्ताने आपले पवित्र हात विटाळू नका. मला जीवदान देणे हे आपल्या मोठेपणाला साजेसे होईल.” हे ऐकून सिंहाला त्याची दया आली. त्याने उंदराला सोडून दिले. जाता-जाता उंदीर म्हणाला, “सिंह महाराज, मी आपले उपकार जन्मात विसरणार नाही.” अशा प्रकारे काही दिवस गेले. सिंह महाराज असेच एकदा वनात फिरत फिरत नेमके त्याच झाडाखाली आले. तेथे शिकार्याने आधीच एक जाळे लावले होते. त्यात सिंह महाराज अडकले. जाळ्यात जेरबंद होताच सिंहाने सर्व शक्ती एकवटून जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला असता तो त्यात जास्तच गुरफटला. अखेर निराश झालेला सिंह रागाने ओरडू लागला. हा आवाज उंदराने ओळखला. तो धावतच सिंहाजवळ आला. पाहतो, तर सिंह महाराज जाळ्यात फसलेले. मग उंदीर म्हणाला, “महाराज, असे निराश होऊन भिऊ नका. स्वस्थ पडून राहा.” असे म्हणत उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सिंह महाराज जाळ्यातून मोकळे झाले. त्यांच्यावरील संकट टळले. सिंहाने केलेल्या उपकाराची परतफेड उंदराने अशा प्रकारे केली. तात्पर्य ः कोणाला कमी हलके समजू नये. आपण एखाद्यावर उपकार केले, तर ऐन वेळी त्यातील एखादा तरी आपल्या मदतीला धावून येतो.
हृदयविकार म्हणजे काय?
हृदयविकार म्हणजे काय?
हृदयविकार याचा शब्दशः अर्थ हृदयाचे रोग असा होतो. मग त्यात हृदयाच्या स्नायूंचे रोग, झडपांचे रोग, कर्करोग, रक्तदाबामुळे वा श्वसनसंस्थेच्या रोगांमुळे हृदयावर होणारे विपरित परिणाम इत्यादींचा समावेश होतो; पण सामान्यपणे लोक हृदयविकार म्हणजे हृदयविकाराचा झटका असेच समजतात. हृदयाच्या सर्व रोगांचे विश्लेषण करणे शय नाही. त्यामुळे आपणही याच दृष्टीने हृदयविकाराचा विचार करू. हृदय आपल्या शरीरात पंपाचे कार्य करते. हृदयाचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. यामुळे शुद्ध रक्ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा होतो. या महत्त्वाच्या कार्यात व्यत्यय येऊन चालत नाही. हृदयाचे हे कार्य अविरतपणे चालू असते. त्याला विश्रांती मिळते ती एकदाच- मृत्यूच्या वेळी. इतकेच हृदयाचे महत्त्व! असे कार्य करण्यासाठी हृदयालाही (म्हणजे त्याच्या स्नायूला) रक्तपुरवठा होणे आवश्यक असते. यासाठी रक्तवाहिन्या असतात. काही रोगांमध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. साहजिकच हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो वा बंद पडतो. रक्तपुरवठा बंद पडल्याने संबंधित भागातील पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला हृदयविकाराचा ‘झटका’ असे नाव पडले आहे. लठ्ठपणा, जास्त प्रमाणात मेद पदार्थांचे सेवन, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, मद्यपान, धूम्रपानाची सवय इत्यादी असणार्यांच्या बाबतीत हा रोग होण्याची शयता जास्त असते. हृदयाच्या स्नायूचा जास्त भाग प्रसरण पावला, तर शस्त्रक्रिया बंद पडून रुग्ण दगावल्याची शयता असते. योग्य वेळी उपचार झाल्यास मृत्यूचे प्रमाण खूप कमी होते. सुरुवातीला श्रमानंतर छातीत दुखणे अशी इशारेवजा लक्षणे दिसून येतात. त्याच वेळी उपचार केल्यास पुढील अनर्थ टळू शकतो. हृदयाभिलेखाचा रोगनिदानासाठी चांगला उपयोग होतो. रक्तवाहिनीतील अडथळा काढण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया करता येते. हृदयविकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो टाळलेलाच बरा. दररोज व्यायाम, आहारात मेदपदार्थ कमी खाणे, मद्यपान, धूम्रपान न करणे, उच्च रक्तदाब उपचाराने आटोयात राखणे; अशा उपायांनी हृदयविकाराचा प्रतिबंध करता येईल






