हुताशनी पौर्णिमा (होळी), शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, पूर्वा ०७|३४ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष: जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे
शय आहे. आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे.
वृषभ : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल. सहकार्यांकबरोबर प्रतिष्ठा वाढेल.
आरोग्य उत्तम राहील. आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. प्रसिद्धी वाढण्याची
शयता आहे. आपले धाडस वाढेल.
मिथुन : मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनात वातावरण
मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल.
कर्क : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची
स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. कौटुंबिक
विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.
सिंह : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या नव्या संधी देईल परंतु घाई
करणे वादाला कारण ठरू शकते. मागील उधारी वसुल होईल.
कन्या : कौटुंबिक वातावरण सुखदराहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात
बनवेल. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. आनंदाची बातमी मिळेल. स्थावर संपत्ती व
कोर्ट-कचेरी यांच्या झंझटमध्ये आज पडू नका.
वृश्चिक: आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये
कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. पैसाही खर्च होईल. आजचा आपला दिवस मित्र
आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल.
धनु : व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल.
वरिष्ठांशी वितुष्ट येण्याची शयता आहे. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम
ठेवा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.
मकर : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात
एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. कुटुंबियांबरोबर वार्तालापाने फायदा. स्थिती
अनुकूल राहील.
कुंभ : एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता आहे. व्यापार-व्यवसायात
आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा.
मीन : वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या
हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय
आहे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.