नाशिकचा चिवडा

नाशिकचा चिवडा
साहित्य : अर्धा किलो भाजके पोहे,
अर्धा कप डाळ, खोबर्‍याचे काप, १ कप
शेंगदाणे, स्लाइस करून उन्हात वाळवलेला
कांदा, अर्धा कप काळा मसाला, २ चमचे
तिखट, मीठ, ७-८ आमसुलं, धने-जिरे
पूड, पिठी साखर, बारीक चिरलेला लसूण,
२ चमचे आल्याचा कीस, २ चमचे तेल,
फोडणीचे साहित्य.
कृती : तेल तापवून, कांदा लालसर
तळून घ्या. दाणे, डाळ, खोबरं तळून घ्या.
आमसुलं कुरकुरीत तळा. आलं, लसूण तळा.
(आमसुलं, आलं, लसूण वाटून घ्या.) फोडणी
बनवून त्यात आमसूल इ. वाटलेला मसाला
परता.

वास्तू

मोराची पिसे कोठे ठेवावीत
वास्तूशास्त्रानुसार जर आपल्या हातात
नकारात्मक उर्जा प्रवेश करत असेल तर
येणारा प्रत्येक दिवस नवीन वाद घेऊन येत
असतो. घरात नीटनेटकेपणा असला तर
सकारात्मक उर्जा प्रवेश करते व घरातील
सदस्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणते.
घरातील वस्तूंवर बसलेली धूळ दररोज साफ
करावी. तसे केल्याने घरात येणार्‍या नकारात्म
क उर्जेचा प्रभाव कमी होतो. भिंतीवरील बंद
पडलेले घड्याळ व बिनकामाचे सामान बाहेर
काढा.

चेहरा ताजातवाना

* आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये
ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज
चिरता व किसता येते.
* ओवा भाजून मीठ मिसळून खाणे.
हळद पूड, गूळ, हिंगपूड मिसळून वरचेवर
चिमुटभर खावे.
* थंडीत फ्रेश गाजर व टोमॅटो ज्यूस
प्यायला पाहिजे. त्याने चेहरा ताजातवाना
होतो.

केसांची गळती

कांद्याचा रस केसांना लावल्यास केसांची
गळती बंद होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर : बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध
आहे?
बंडू : सर, भावा-बहिणीचा.
सर : काय ?
बंडू : हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला
मामा म्हणतो..

हसा आणि शतायुषी व्हा!

सुरेश : एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच
अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे.
रमेश : कसे?
सुरेश : लहान असताना पायाचे अंगठे
पकडणं हा अपमान असतो.
रमेश : अभिमान कसा?
सुरेश : चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू
लागतो.

लांडग्याचा मूर्खपणा

लांडग्याचा मूर्खपणा

एका रानात एक लांडगा राहत होता. एकदा भक्ष्य शोधण्याच्या नादात तो मनुष्यवस्तीत येऊन पोहोचला. रात्र झाली होती. एका घराजवळून जात असता एक बाई आपल्या रडणार्‍या मुलाला घेऊन दारात उभी असलेली त्याला दिसली, तेव्हा ती दाराच्या आडोशाला उभा राहिला. रडणारे मूल रडण्याचे थांबेना. तेव्हा त्याला कशाची तरी भीती दाखवावी म्हणून ती लटया रागाने म्हणाली, “आता जर का रडायचा थांबला नाहीस, तर बाहेर बसलेल्या लांडग्याला तुला देऊन टाकीन.” असं ती सहज म्हणाली. लांडग्याने बाईचे बोलणे ऐकले. बोलल्याप्रमाणे खरोखरच ती बाई पोराला आपल्याला देईल, असे वाटून लांडगा तेथेच आशाळभूतपणे वाट पाहत बसला. अखेर ते मूल रडून-रडून झोपी गेले. सकाळ होत आली, तसा लांडगा भानावर आला. उजाडल्यावर जर कोणी आपल्याला येथे पाहिले, तर हकनाक प्राणाला मुकू, असे वाटताच लांडग्याने रानाकडे धूम ठोकली. वाटेत त्याला कोल्हा भेटला. आणि पळणार्‍या लांडग्याला पाहून म्हणाला, “काय लांडगेदादा, वाघ मागे लागल्यासारखे असे धावत का सुटलात?” त्यावर लांडगा म्हणाला, “काय सांगू मित्रा, रात्रभर एका घराच्या दारात वाट पाहात बसलो होतो. एक बाई तिच्या रडणार्‍या मुलाला भीती दाखवण्यासाठी खोटेच म्हणाली, त्याला लांडग्याला देईल म्हणून. मला ते खरेच वाटले. रात्रभर जागरण झालेच; पण चांगला उपासही घडला बघ.” असे म्हणत लांडगा पुढे निघून गेला. तात्पर्य ः एखाद्याच्या बोलण्याकडे मागचा-पुढचा विचार न करता सहजपणे बोललेल्या शब्दांवर विश्वास ठेवला, तर अशी फसवणूक तर होतेच; पण मूर्खपणाही वाट्याला येतो

नाकात औषध टाकल्याने कावीळ उतरते का?

नाकात औषध टाकल्याने कावीळ उतरते का?

कावीळ म्हणजे डोळे पिवळे होणे, जीभ पिवळी होणे इत्यादी हे आपल्याला माहीत असते; पण ती का होते, हे तितकेसे माहीत नसते. कावीळ हा संसर्गजन्य आजार आहे. काही प्रकारच्या विषाणूंमुळे हा आजार होतो. हे विषाणू रोग्याच्या विष्ठेने अन्न-पाणी दूषित झाल्याने दुसर्‍याच्या शरीरात जातात व यकृतात बिघाड करतात. ही झाली सामान्यतः होणार्‍या काविळीची कारणमीमांसा. काविळीचे अनेक प्रकार आहेत. पैकी एका प्रकारची कावीळ रक्ताद्वारे संक्रमित होते किंवा लैंगिक संबंधाद्वारे संक्रमित होते. यकृतास विषकारक असणार्‍या औषधी जसे क्षयरोगावरील आय.एन.एच. हे औषध, भूल देण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे यांच्यामुळेही कावीळ होते. पित्ताशयात खडा झाल्यास, कर्करोग झाल्यास, पित्ताचे वहन करणार्‍या नळीचत अडथळा येऊन पित्त वाहून नेले जात नाही व ते शरीरात पसरून कावीळ होते. रक्तातील लाल पेशींचा नाश जास्त प्रमाणात झाल्यासही कावीळ होते. आता कावीळ म्हणजे नेमके काय? ते आपण बघू. शरीरात नवीन रक्त निर्माण होण्याची तसेच जुन्या रक्तपेशींचा नाश होण्याची प्रक्रिया संतुलित प्रमाणात चालू असते. लाल रक्तपेशी यकृतात, प्लीहेत नष्ट झाल्यावर त्यातून बिलीरुबीन नावाचा पिवळा पदार्थ निर्माण होतो. सामान्यतः हा पदार्थ शौचावाटे बाहेर पडतो. त्यामुळे विष्ठेचा रंग पिवळसर असतो. या पदार्थाचे म्हणजे बिलीरूबीनचे रक्तातील प्रमाण वाढते. यास कावीळ म्हणतात. हा पदार्थ रक्तात प्रमाणाबाहेर साठण्याने डोळे, त्वचा यांत उतरतो व डोळे, त्वचा पिवळे दिसतात. लघवी पिवळी होते. सांगितलेल्या प्रत्येक प्रकारच्या काविळीसाठी वेगवेगळे उपचार करावे लागतात. जसे पित्तवाही नलिकेतील अडथळ्यांसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. सामान्यपणे होणार्‍या (विषाणूंमुळे होणार्‍या) काविळीमध्ये विश्रांती घेणे, भरपूर कर्बोदके व नियंत्रित प्रमाणात प्रथिने व स्निग्ध पदार्थ असा आहार घेणे व जीवनसत्त्वांचा पुरवठा करणे, हेच प्रभावी उपाय आहेत. कारण या विषाणूंवर परिणामकारक ठरणारे औषध अजून उपलब्ध नाही. आयुर्वेदामध्ये या आजारावर अनेक चांगले उपचार आहेत; परंतु नाकात थेंब टाकून २-३ दिवसांत कावीळ बरी करणे अजून तरी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे भोंदू वैद्याकडून तसे कोणतेही उपचार करून घेऊ नयेत.

कोरड्या त्वचेसाठी

कोरड्या त्वचेसाठी


* थंडीमध्ये कोरड्या त्वचेवर संत्र्याचे
साल चोळल्याने तेजस्वीपणा येतो.
* ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेलाचे
मसाज, तसेच कोमट पाण्याने अंघोळ हा
थंडीमधील कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय
आहे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,नगर.

आरशाची फ्रेम तुटल्यास


दुकान आणि शोरूममध्ये छतावर आरसे
लावले जातात. दुकान आणि शोरूममधील
छतावर ईशान्य दिशेला आणि मध्यभागी
आरसा लावू नये. आरशाची फ्रेम तुटल्यास
तत्काळ दुरुस्त करून घ्यावी किंवा आरसा
तुटल्यास त्वरित बदलावा.