मेथ्यांमुळे शरीरातील ऊर्जा

मेथ्यांमुळे शरीरातील ऊर्जा
मेथ्यांमुळे शरीरातील उर्जा वाढते. मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. नियमित
मेथीचे सेवन करणार्‍या व्यक्तीला अशक्तपणाची जाणीव कमी होऊन उत्साह आणि चैतन्य वाटत
राहते. त्याचप्रमाणे हाडे बळकट होण्यासाठी मेथी उपयुत असते.

तिखट शंकरपाळे

तिखट शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या गव्हाचे पीठ, दीड
चमचा साखर, थोडी हळद, अर्धा चमचा मीठ,
पाव चमचा जिरे, तेल.
कृती : गव्हाच्या पिठात तिखट, मीठ,
हळद, जिरे एकत्र करून पाणी घालून घट्ट पीठ
भिजवावे. गोळे करून पातळ पोळी लाटून
कातणीने बारीक शंकरपाळ्या कापाव्यात व
मंद गॅसवर तेलात लाल रंगावर तळाव्यात.

होममेड लिप प्रोडेटिव क्रीम

होममेड लिप प्रोडेटिव क्रीम

सामग्री : २ टीस्पून मेण (वोजवैस),
४ टीस्पून बदाम तेल, २ टीस्पून गुलाब जल.
कृती : छोटे बलून घेऊन त्यात मेण
वितळवा. बदाम तेल मिस करावे. गॅसवरून
उतरवून गुलाब जल टाकावे. मिश्रण हलवत
रहावे. जोपर्यंत घट्ट होते हलके गरम असेपर्यंत
बॉटलमध्ये टाकावे व उपयोग करावा. थंडीत
ओठ मुलायम राहतील.

वास्तू

दिवाणखान्यात कोणते चित्र असावे
हे फार महत्त्वाचे आहे. चित्रे आपल्याशी
बोलतात. अनेक घटनांचे संकेत देतात.
त्यांच्यावर आपली मनःस्थिती अनेकदा
अवलंबून असते.

जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये

जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून
चूळ भरतो त्याला आपण गुळण्या करणे
म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही
स्वस्थ राहते. शास्त्रानुसार गुळण्या १६ वेळा
करण्याची पद्धत आहे. आपण १० ते १५ वेळा
गुळण्या केल्या म्हणजे कोपर्‍यात अडकलेले
कण बाहेर पडतात व तोंडाला दुर्गंधी येत
नाही. जेवणादरम्यान आपल्या शरीरात उष्णता
निर्माण होते. गुळण्या केल्याने व डोळ्यांना
पाणी लावल्याने उष्णता शांत होते. जेवणानंतर
लगेच पाणी पिऊ नये. कमीत कमी अर्ध्या
तासाने पाणी प्यावे. पचनक्रिया व्यवस्थित
होते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

बायको : ‘रईस’ चित्रपट बघायला जाऊयात का?
नवरा : मी तेवढा ‘काबिल’ नाही.
बायको : मग ‘काबिल’ बघायला जाऊयात.
नवरा : मी तेवढा ‘रईस’ नाही.
नंतर त्यांच्या मुलांनी घरात ‘दंगल’ पाहिला

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २९ मार्च २०२४

गुडफ्रायडे, शके १९४५ शोभननाम संवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, विशाखा २०|३६
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील.

वृषभ : तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल.

मिथुन : प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.

कर्क : दुसर्‍यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. दुसर्‍यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा.

सिंह : आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या.
तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात\ स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे.

कन्या : तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे!

तूळ : मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची
खबरदारी घ्या. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक : आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा.

धनु : कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. आनंदासाठी नव्या
नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल

मकर : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा.

कुंभ : आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळजी घ्या. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल.

मीन : आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

नारू म्हणजे काय?

नारू म्हणजे काय?

‘नारू, नारू निर्मूलन’ या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, नारूमध्ये शरीरातून धाग्यासारखे जंतू बाहेर येतात असेही आपण कुठेतरी वाचलेले असते. नारू हा ड्रॅकन्युलस मेडीनेन्सीस नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. त्वचेखालच्या भागात हा जंत राहतो. या रोगामुळे रुग्ण मरत नसला, तरी हैराण मात्र होतो. नारूची प्रौढ मादी रुग्णाच्या शरीरात सामान्यपणे पायाच्या त्वचेखालील असते. तिची लांबी ५५ ते २२० सेंमी. एवढी असते. तर नर २ ते ३ सेंमी लांब असतो. फलन झालेली मादी रुग्णाच्या अंतःत्वचेत दाह निर्माण करते व परिणामी पायाच्या त्वचेवर फोड येतो. अशी व्यक्ती पाण्यात गेल्यास हा फोड फुटतो व मादी पाण्यात सुमारे १० लाख इतया सूक्ष्म अळ्या सोडते. पाण्यातील सायलोप नावाची कीटक या अळ्यांना खातात. सायलोपच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होतो. दुसर्‍या निरोगी व्यक्तीने हे पाणी प्याले, तर पाण्यातील सायलोप्स त्याच्या पोटात जातात. जठरात सायलोपचे पचन होते व या अळ्या बाहेर पडतात. कालांतराने या अळ्या लहान आतड्यातून बाहेर पडतात. मजल दरमजल करत त्वचेखालच्या भागात पोहोचतात. ९ ते १२ महिन्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मादी व नर तयार होतात व पुन्हा हे चक्र चालू राहते. नारू टाळण्याचे अनेक उपाय आहेत, पण परिणामकारक उपचार नसल्याने त्याचा प्रतिबंध करणेच जास्त महत्त्वाचे ठरते. पायर्‍या असलेल्या विहिरीमुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विहिरींना पायर्‍या नसाव्यात, त्या पया बांधणीच्या असाव्यात. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वारंवार बाहेर खावे प्यावे लागणार्‍या लोकांनी रुमालाची चौपदरी घडी पाण्याच्या ग्लासवर ठेवावी व पाणी गाळून प्यावे, त्यामुळे सायलोप्स पोटात जाणार नाहीत व नारू होणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, सायलोप्स मारण्यासाठी किटकनाशकांचा वापर व लोकांना आरोग्यशिक्षण या तीन मार्गांनी हा रोग नियंत्रणाखाली आणता येईल. भारत सरकारने केलेल्या अविरत परिश्रमांमुळे पाच वर्षांपूर्वी या रोगाचे आपण निर्मूलन करू शकलो आहोत. देवी नंतर देशातून निर्मूलन झालेला हा दुसरा रोग आहे.

केसांच्या आरोग्यासाठी

केसांच्या आरोग्यासाठी
मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते कुटून त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीपूर्वी
तासभर ती पेस्ट केसांच्या मुळाशी लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि भरपूर पाण्याने
केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस गळण्याचे कमी होते आणि केसातील कोंडा दूर होतो.

सुविचार

महान समुद्राच्या अजस्र लाटांमध्ये ज्याप्रमाणे लहान होडी बुडून जाते, तद्वत विवेकाची जोड नसणारा पराक्रम लोप पावतो.