हसा आणि शतायुषी व्हा!

मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना
मुलगा : कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
मुलगा : आमच्या घरचे म्हणतात खा, प्या मजा करा पण
पैशाचा लाड नाही करायचा…!

 

वास्तू


देवघरात नंदादीप व निरांजन सतत
तेवत ठेवा. हे शक्य नसेल, तर झिरो वॅटचा
दिवा सतत जळत ठेवा.
                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

त्वचेतील रंगकणां


दोन चमचे ज्वारीच्या पीठात, एक
चमचा मध, अर्धा चमचा दूध, अर्धा चमचा दही
घालून लेप तयार करावा. यामुळे त्वचेतील
रंगकणांचा गडदपणा कमी होतो.

फ्रिजची निगा

फ्रिजची निगा


* फ्रिजमध्ये खाद्यपदार्थांचा वास येत
असेल तर फ्रिजमध्ये बेकिंग सोड्याचा डबा
उघडून ठेवावा.
* चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये
वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर
टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने
साबणाच्या पाण्याने धुवावे.

गाढवाची गुर्मी

गाढवाची गुर्मी

एका माणसाने एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. एकदा काही खाण्याच्या जिनसा गाढवावर लादून तो माणूस परगावला चालला होता. बरोबर कुत्राही घेतला होता. चालून थकल्यावर एके ठिकाणी विश्रांती घ्यावी, म्हणून तो माणूस थांबला आणि थोड्याच वेळात झोपी गेला. इकडे गाढव जवळच चरू लागले. कुत्र्याला फारच भूक लागली होती म्हणून ते गाढवाला म्हणाले,” अरे मित्रा, मला फारच भूक लागली बघ. तुझ्याकडे खाण्याचे पदार्थ आहेत. त्यातले थोडे मला खायला दे.” त्यावर गाढव गुर्मीतच म्हणाले, “थोडा वेळ दम धर. आपला मालक उठला, की तो तुला देईल खायला.” यावर बिचारे कुत्रे गप्प बसले. असा काही वेळ जाताच तिकडून एक मोठा थोरला लांडगा आला आणि त्याने गाढवावर झडप घातली असता गाढव ‘आपल्याला मदत करून वाचव’ म्हणून कुत्र्याची विनवणी करू लागले. तेव्हा कुत्रा म्हणाला,” अरे थोडा वेळ थांब. आपला मालक उठला की तो तुला मदत करील. ”असे कुत्रा म्हणत आहे, तेवढ्यात लांडग्याने गाढवाचे नरडे फोडून त्याला ठार केले.

तात्पर्य : गुर्मीने वागल्यास संकटकाळी कोणी मदतीला धावून येत नाही.

भोपाळ दुर्घटना का झाली?

भोपाळ दुर्घटना का झाली?

१९८५ मध्ये भोपाळच्या युनियन कार्बाईड या कंपनीत वायूगळती झाली व त्यात ५००० लोक बळी पडले. कित्येक हजार लोक आजारी पडले. या घटनेविषयी, त्यानंतरच्या नुकसान भरपाईसाठीच्या आंदोलनाविषयी, तसेच न्यायालयातील साक्षीपुराव्यांविषयीही तुम्ही वृत्तपत्रात वाचले असेल. भारतातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेविषयी सर्वांचे डोळे उघडणार्‍या या दुर्घटनेविषयी माहिती घेऊ. भोपाळच्या कारखान्यात वायूगळती झाली. मिथाईल आयसोसायनेट हा तो वायू. सामान्यपणे मिथाल आयसोसायनेट द्रव अवस्थेत असते, पण तापमान ३१ सेंटिग्रेडच्या वर गेले तर मात्र हा द्रव वायूरूप होतो. पाणी व इतर नेक द्रावणाशी मिथाईल आयसोसायनेट संयोग पावत असल्याने चांगल्या प्रकारे निष्क्रीय अशा परिस्थितीत तो साठवावा लागतो. मिथाईल आयसोसायनेट हा अत्यंत विषारी पदार्थ आहे. हायड्रोजन सायनाईड व फॉस्जीन या विषारी वायूपेक्षाही तो जास्त विषारी आहे व त्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात शरीरात गेला, तरीही गंभीर परिणाम होऊ शकतात. हा वायू त्वचा, डोळे व शरीरातील इतर आवरणांमध्ये दाह निर्माण करतो. वायू शरीरात गेल्यानंतर ४८ तासात मरणार्‍या व्यक्तींमध्ये घशात जळजळ, असह्य अशी डोळ्यांची जळजळ, छातीत वेदना व श्वसनाला खूप त्रास अशी लक्षणे दिसतात. फुफ्फुसाला सूज आल्याने मृत्यू येतो. ५-६ दिवसांत मरणार्‍या व्यक्तींमध्ये स्नायूमध्ये शक्तिपात, लुळेपणास झटके, कोमा ही लक्षणे दिसतात व मृत्यू मेंदूच्या सुजेमुळे होतो. गरोदर स्त्रियांमध्ये या वायूमुळे गर्भपात, अपेक्षित तारखेच्या आधी बाळंतपण व मृत बालकाचा जन्म अशा गोष्टी आढळून आल्या. रक्ताची रासायनिक तपासणी केल्यास त्यात मिथाईल आयसोसायनेट, सायनाईड आयन तसेच मोनोमेथीलामीन हे पदार्थ सापडले. यांच्यावरून सहजगत्या निदान होऊ शकते. या विषबाधेवरचे उपचार लक्षणानुरुप करावे लागतात. प्रतिजैविके, स्टेरॉईडस, डोळ्यांत औषधाचे थेंब व श्वसनासाठी प्राणवायू इ. उपायांचा यात समावेश होतो. अशी दुर्घटना होऊ न देणे, हाच उत्तम उपाय होय. त्यासाठी कारखान्यातील सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यंत्रसामुग्री, रसायने साठवण्याचे टँकर, रसायने वाहून नेणार्‍या नळ्या इत्यादींची देखभाल नीट केल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.

पायनॅपल राईस

पायनॅपल राईस


साहित्य – दोन वाट्या जुना बासमती तांदूळ, पाव वाटी साजूक तूप, चार लवंगा,
चार वेलदोडे, दोन काजूचे तुकडे, अननसाच्या लहान लहान चिरून फोडी दोन वाट्या, दोन
वाट्या साखर, पाव चमचा मीठ, नारळाचं दूध एक वाटी.

कृति – तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात नारळाचं दूध घालून अर्धा तास भिजत ठेवावे. मग एका नॉनस्टिक कढईत तूप घालावे
(चमचाभर तूप शिल्लक ठेवावे). त्या तुपात काजू, लवंग, वेलदोडे घालावे व वरून तांदूळ टाकून परतावेत. पाऊण कप पाणी घालून मंद आचेवर भात शिजवून घ्यावा. आता अननसाच्या फोडी व साखर एक करून जाड बुडाच्या कढईत उकळायला ठेवावी. हलवून साखर विरघळवून घ्यावी. मग उकळायला लागले की गॅस बारीक करावा. पाक गोळीबंद झाला की गॅस बंद करावा. भात झाल्यावर परातीत उपसून वाफ जाऊ द्यावी. मग या अननसाच्या मिश्रणात भात घालून
हलके मिसळावा. कडेने उरलेले तूप सोडावे. त्यात हलके हलवून पुन्हा परतावा व कोरडा होऊ द्यावा.

सुंदर ओठांसाठी

सुंदर ओठांसाठी


फाटलेल्या ओठांसाठी शुद्ध तूप लवकर
आराम देते. ओठ तडकून रत येत असेल
तर तूपाबरोबर कोकम तेलाचा अर्क वापरावा.
एसआरएफ असलेली क्रीम्स आणि बाम
ओठांना घातक सुर्यकिरणांपासून सुरक्षित
ठेवतो.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. १४ मे २०२४

गंगोत्पत्ति-गंगापूजन, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष, पुष्य
१३|०५ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने
विवाहोत्सुकांना यश मिळेल. मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.

वृषभ : दुपारनंतर मात्र तब्येत बिघडूशकते. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात
विरोध होईल. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या

मिथुन: इतरांच्या भानगडीत पडू नये. वाहन चालवताना अपघातापासून जपा.
उपकरणे जपून वापरा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.

कर्क: व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात
मान- प्रतिष्ठा वाढेल. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी
आपल्यासाठी फलदायी आहे.

सिंह : कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल. दांपत्य जीवनात
आनंद दरवळेल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील.

कन्या : नवीन कार्याच्या आयोजनासाठी चांगला काळ. सामाजिक आणि आर्थिक लाभ
होण्याचे योग आहेत. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये.

तूळ : एखाद्या मनोरम्य स्थळी जाण्यासाठी सहलीचे आयोजन कराल.
प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका. आपण आपल्या महत्वाकांक्षा कराल.

वृश्चिक : आनंददायक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च होईल. व्यवसायात
वातावरण चांगले राहील. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप
येण्याची शयता आहे. काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.

धनु : मानसिकस्वास्थ्य पण चांगले असेल दुपारनंतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या
अनुकूलता जाणवेल. आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य
करण्यास आपली मदत करेल. घरातील वातावरण आनंददायी राहील.

मकर : वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. धनप्राप्तीचे योग आहेत. परिवारात
सुख शांती नांदेल. संततीविषयक काळजी राहील. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी
आपणास यश आणि आनंद मिळेल. शांत राहाण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश
देतात. वाणीवर संयम ठेवा. वरिष्ठांशी केलेला व्यवहार तुमच्या मनाला दुःख देईल. आपण
जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

मीन : कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर
परदेशातून वार्ता येतील. तरीही प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.
पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

                                                                          संकलक :अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सुविचार

ज्ञानाचा प्रकाश पडताच पापरूपी अंध:कार नाहीसा होतो. – कवी कालिदास.