सुविचार

अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वांत मोठे पाप आहे. – सुभाषचंद्र बोस.

हसा आणि शतायुषी व्हा!

चिंटू : काकू, थोडी साखर
मागितली आहे आई ने
काकू : अजुन काय म्हणत होती आई?
चिंटू : त्या टवळीनी नाही दिली तर
समोरच्या जाडी कडून आण

बोकडाचा भोळेपणा

बोकडाचा भोळेपणा

एक कोल्हा सकाळपासून शिकारीसाठी हिंडत होता. दुपार उलटली, तरी त्याला सावज काही मिळाले नाही. उन्हा-तान्हात हिंडून तहानेने जीव मात्र व्याकुळ झाला. म्हणून तो इकडे-तिकडे प्यायला कुठे पाणी मिळते का, ते शोधू लागला. एका ठिकाणी त्याला विहीर दिसली, म्हणून पाणी किती खोल आहे, हे तो विहिरीत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात तोल जाऊन तो विहिरीत पडला. आता विहिरीबाहेर कसे पडावे, याचा तो विचार करीत असता एक बोकडही पाणी पिण्यासाठी तेथे आला. विहिरीच्या काठावर उभे राहत तो विहिरीत असलेल्या कोल्ह्याला म्हणाला, “काय रे मित्रा, प्यायला पाणी चांगले आहे का?” त्यावर कोल्हा ढोंगीपणाने म्हणाला, “अरे बोकड़दादा, पाणी नुसते चांगलेच नाही, अमृतासारखे गोड आहे बघ.” हे ऐकताच मागचा-पुढचा विचार न करता बोकडाने विहिरीत उडी टाकली. बोकडाची शिंगे चांगलीच लांब होती. कोल्ह्याने ही संधी हेरली. बोकडाच्या शिंगावर उभा राहात त्याने विहिरीबाहेर उडी मारून संकटातून आपली सुटका करून घेतली. बोकड मात्र पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊन मरण पावला. तात्पर्य ः लबाड लोकांच्या आमिषाला फसू नये.

खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो?

खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो?

खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो. खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो. खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील. खोकल्याच्या औषधांचे एस्पेटोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटसीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम होईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉटरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.

वास्तू


* देवघर जमिनीपासून एक वित
म्हणजे ९ इंचावर असावे. गुप्त अनुष्ठानाने
सिद्ध केलेले, तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले
‘श्रीयंत्र’ देवघरात ठेवा.
* देवाचे तोंडे पश्चिमेला व पूजकाचे
तोंड पूर्वेला येईल अशा पद्धतीने देवघराची
रचना असावी.
संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

दातदुखी


कन्हेरीच्या झाडाची काडी उगळून त्या
पाण्याने गुळण्या केल्यास दातदुखी थांबते.

नॅचरल सनस्क्रीन लोशन


नॅचरल सनस्क्रीन लोशन
* एक काकडी किसून त्याचा रस गाळून
घ्यावा. त्यात टी स्पून गुलाबपाणी व ग्लीसरीन
मिसळावे हे सनस्क्रीन लोशन प्रमाणे वापरावे.
यामुळे सनटैनपण दूर होतो.
* दह्यामध्ये काकडी किसून ते चेहर्‍यावर
लावा. यामुळे सनटैन दूर होतो व त्वचा
मुलायम होते.
* नारळाचे तेल नैसर्गिक प्रकारे सनटैन
दूर करतो. उन्हात बाहेर निघण्यापूर्वी २०-२५
मिनिटे पहिले चेहरा, हात-पायावर लावावे.

मुगाच्या डाळीचे वडे

मुगाच्या डाळीचे वडे


साहित्य – पिवळ्या मुगाची डाळ दीड कप, उडीद डाळ अर्धा कप, कांदा, जिरेपूड
दोन चिमूटभर, बेताचे तिखट, थोडीशी कांदा पात, मीठ, तेल.

कृति – डाळी पाण्यात चार तास भिजत ठेवा. थोडासा कांदा अगदी बारीक चिरून ठेवा. कांदापातही अगदी बारीक चिरा. भिजलेली डाळ वाटून काढा. पाणी घालू नये. त्यात तिखट, कांदा पात, जिरेपूड, मीठ, चिरलेला कांदा घालून चांगले कालवून घ्या. त्याचे लहान लहान गोळे बनवा. मंद आचेवर कढईत तेल गरम करा. गरम तेलात गोळे
चांगले खरपूस तळून काढा. गरम असतानाच खा.

मधुमेहींसाठी जेवणासंबंधी टिप्स

मधुमेहींसाठी जेवणासंबंधी टिप्स


कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा. दिवसातून त्या दोन वेळांनाच जेवण करा.
१५ ते २० मिनिटे फरक झाला तरी चालेल जेवणाच्या वेळा निश्चित करा व त्या पाळा जेवण
५५ मिनिटात संंपवा त्याचप्रमाणे दोन जेवणांच्यामध्ये काहीही खाऊ नका.जेवताना शयतो गोड
कमी खा वा टाळा जेवणातील प्रथिने वाढवा.

सुविचार

जे हृदयात सतत सलत राहते, खटकत राहते त्याचे नाव पाप. – महंमद पैगंबर.