हसा आणि शतायुषी व्हा!

 

पत्नी : जानू, सोमवारी खरेदी,
मंगळवारी हॉटेल,
बुधवारी फिरायला,
गुरुवारी जेवायला,
शुक्रवारी पिचरला, शनिवारी पिकनीकला
किती मस्त मजा ना…!
पती : हो ना आणि रविवारी मंदीर…
पत्नी : कशाला?
पती : भीक मागायला…!

उंदीर-मांजराचे युद्ध

उंदीर-मांजराचे युद्ध

एके ठिकाणी उंदीर आणि मांजरात तुंबळ युद्ध सुरु होते. गेेले कित्येक दिवस रणकंदन चालले होते. या युद्धात प्रत्येक वेळी उंदरांचा पराभव होत होता. उंदरांचे अनेक खंदे योद्धे लढाईत वीरमरण पत्करीत होते. होता-होता अनेक योद्धे शहीद झाल्याने उंदरांचे सैन्य कमी होऊ लागले. तेव्हा याचा विचार करण्यासाठी उंदरांनी एक बैठक भरविली. युद्धात आपलाच पराभव सारखा का होत आहे, यावर विचार करता असे दिसून आले की, आपला सेनापती कोण, हेच उंदरांना न समजल्याने लढताना त्यांचा गोंधळ उडतो. तेव्हा चर्चेअंती असे ठरले की, जे सेनापती आहेत, त्यांनी आपल्या डोयावर गवताची मोळी बांधावी, म्हणजे इतर उंदरांना ते ओळखू येतील. अशा प्रकारे डोयावर गवताची मोळी बांधून सेनापती व इतर उंदीर लढाईत उतरले. पुन्हा घनघोर लढाईला तोंड फुटले. उंदरा-मांजरात जोराची जुंपली. मांजरांची सेना उंदीर सेनेवर तुटून पडली. अखेर पुन्हा उंदरांचा पराभव झालाच. पराभव होताच उंदीरसेना सैरावैरा पळत आपापल्या बिळात लपून बसली. मांजरांनी त्यांचा पाठलाग केला. पण सेनापतींनी आपल्या डोयांवर गवताची मोळी बांधली असल्याने त्यांना लवकर बिळात शिरता न आल्याने पाठलागावरील मांजरांनी त्यांना गाठले आणि झडप घालून त्यांना खाऊन टाकले.

तात्पर्य : मोठेपणा प्राप्त झाला, तर कर्तव्ये आणि जबाबदारीही वाढते.

कार्बन मोनॉसाईडचे काय दुष्परिणाम होतात?

कार्बन मोनॉसाईडचे काय दुष्परिणाम होतात?

कार्बन मोनॉसाईड हा रंगहीन, गंधहीन वायू आहे. या वायूचे अस्तित्व आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जाणवू शकत नाही. कार्बन आणि सेंद्रिय पदार्थाच्या अर्धवट ज्वलनानंतर हा वायू तयार होतो. जुनाट, वापरात नसलेल्या विहीरी, घर जळताना, डायनॅमाईटचा स्फोट झाल्यानंतर अशा विविध ठिकाणी हा वायू तयार होतो. पाश्चिमात्य देशांत घरोघरी वापरल्या जाणार्‍या ‘कोलगॅस’ मध्ये कार्बन मोनॉसाइडचे प्रमाण ७ ते १५ टक्के इतके असते. अशा वायुमुळे २ ते ५ मिनिटांत मृत्यू ओढवू शकतो. कार्बन मोनॉसाइड रक्तातील हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोसीहिमोग्लोबीन तयार होते. सहिजिकच त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नाही. प्राणवायूच्या अभावामुळे रक्तवाहिन्यांची आवरणे दुबळी होतात, हृदयाला प्राणवायू न मिळाल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेतही घट होते. हिमोग्लोबीनला या वायूचे खूप आकर्षण असते. किती हिमोग्लोबीन प्राणवायू वाहण्यासाठी निकामी झाले आहे, यावर कोणती लक्षणे दिसून येतील हे अवलंबून असते. या लक्षणांमध्ये दम लागणे, डोकेदुखी, थकवा, घाम येणे, कानात आवाज येणे, चक्कर, मळमळ, उलटी, भ्रम, दृष्टी क्षीण होणे, छातीत धडधड होणे, झटके येणे, कोमा इत्यादींचा समावेश होते. श्वसन बंद पडल्याने मृत्यु ओढवतो. आपल्याकडे या वायूची विषबाधा अपघातानेच पाहायला मिळते. परंतु पाश्चिचमात्य देशात मात्र या वायूमुळे खूप आत्महत्या होतात. उपचारात प्रथमतः रुग्णाला वायूचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणापासून दूर न्यावे. या वायूचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्ण परत पूर्वपदावर येतो. ५ ते ६ तासात रक्तातील सर्व कार्बन मोनॉसाइड बाहेर पडतो. गंभीर रुग्णांमध्ये रक्त द्यावे लागते. मेंदूवर वायूचा झालेला परिणाम जर कायमस्वरूपी नसेल, तर रुग्ण पुनः पूर्ववत होऊ शकतो

काचाचे तुकडे हटवण्यासाठी


काचाचे तुकडे हटवण्यासाठी ओला
कागद किंवा ओले फडके वापरावे. यामुळे
काचेचे बारीक तुकडेही गोळा होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,नगर.

गालावरचे डाग


* कोरफड रसात मुलतानी माती किंवा
चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर
असणारे डाग, फोड दूर होतात.
* कच्च्या दुधात हळद उगाळून
लावल्यास गालावरचे डाग कमी होतात.

वास्तू

जिन्या संबंधी टिप्स


* घरात बरोबर मध्यभागी किंवा
ईशान्य दिशेस जिना असू नये. तो दक्षिणेकडून
पश्चिमेकडे किंवा नैर्ऋत्येकडे जाणारा असावा.
जिना गोलाकार असणे किंवा त्याच्या पायर्‍या
उघड्या असणेही अशुभ आहे. जिन्याचा
कठडा दोन्ही बाजूस कठडा असावा.
* रोज सकाळी पूजेनंतर व सायंकाळी
दिवेलागणीला संपूर्ण घरात फिरून घंटानाद
करा. या योगे दुष्ट शती घराबाहेर निघून
जातात.

मिश्र डाळींची भजी

मिश्र डाळींची भजी


साहित्य – मूग, मसूर, उडीद, हरभरा, तूर इ. सर्व प्रकारच्या डाळी एकूण २५०
ग्रॅम होतील एवढ्या घ्या. थोडीशी कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, खाण्याचा सोडा अर्धा
लहान चमचा, मीठ १ लहान चमचा, मिरची पूड १ लहान चमचा, कांदे २, आले २ गाठी,
तूप २५० ग्रॅम.

कृति – सर्व डाळी निवडून ४-५ तास आधीच भिजत घाला. त्या व्यवस्थित
भिजल्यानंतर बारीक वाटून घ्या. आले व कांदा बारीक किसून घ्या. सारे मसाले वाटलेल्या
डाळीत मिसळून व्यवस्थित फेटून घ्या व गरम तुपात भजी तळून घ्या व टोमॅटोच्या किंवा
कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

हातांची स्वच्छता व आहार

हातांची स्वच्छता व आहार

अधिकतर आजारांचे कारण अस्वच्छता
असते, हे आपण जाणतो. पावसाळ्यात
तर याचा धोका अधिक वाटतो. त्यामुळे
काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.
पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ
खाणे महागात पडू शकते.
त्यामुळे या मौसमात नेहमी घरात
शिजवलेल्या ताज्या, गरम अन्नाचा आस्वाद
घ्या. पचनतंत्र बिघडू नये म्हणून आहारात
भात, दही, ताक, दूध, केळे, जिरं, आलं
किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचा समावेश

दैनिक पंचांग रविवार, दि. १२ मे २०२४

श्री आद्य शंकराचार्य जयंती, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष,
आर्द्रा १०|२७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल.

वृषभ : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. मनावर नियंत्रण ठेवा. मित्रांचा सहयोग मिळेल.
अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

मिथुन : भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शय
आहे. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. आजचा दिवस जोमदार ठरेल. दिवस संमिश्र जाईल.

कर्क : इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. शुभ वार्ता देखील मिळतील. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल.

सिंह : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आपल्या आवडी निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे.

कन्या : धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. महत्वपूर्ण
कार्यांमध्ये यश मिळेल. आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात.

तूळ : आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याला त्रास होऊ शकतो. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल.

वृश्चिक : भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. कुटुंबियांच्या सहवासामुळे दिवस आनंदात जाईल. आरोग्य मध्यम राहील.

धनु : स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील. खाण्या-पिण्यात काळजी घ्या. दिवस आनंदात जाईल. मागील उधारी वसूल होईल. जोखिम असलेले कार्ये टाळा.

मकर : मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. दिवस
कालच्या इतका सकारात्मक जाणार नाही. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. काही नवीन संधी मिळतील.

कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. हसत खेळत वेळ खर्च होईल. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो.

मीन : आरोग्य नरम-गरम राहील. मित्र मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मागील उधारी वसूल होईल. आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते?

धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते?

धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑसिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑसाइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, अ‍ॅर्गान, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. याखेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ, जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात. धुरामध्ये कार्बन डायऑसाइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑसिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑसिजनचे प्रमाण १८ टयांपर्यंत कमी झाले वा कार्बन डायऑसाइडचे प्रमाण ५ टयांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही; असे शास्त्रीय निरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे. धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ. तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ु१४ु१० फुटाच्या खोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडया होत्या. ऑसिजन, कार्बन डॉयऑसाइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमान व आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑसाइडचे प्रमाण ५ टयांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.