पाककला

0
22

पायनॅपल राईस


साहित्य – दोन वाट्या जुना बासमती तांदूळ, पाव वाटी साजूक तूप, चार लवंगा,
चार वेलदोडे, दोन काजूचे तुकडे, अननसाच्या लहान लहान चिरून फोडी दोन वाट्या, दोन
वाट्या साखर, पाव चमचा मीठ, नारळाचं दूध एक वाटी.

कृति – तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात नारळाचं दूध घालून अर्धा तास भिजत ठेवावे. मग एका नॉनस्टिक कढईत तूप घालावे
(चमचाभर तूप शिल्लक ठेवावे). त्या तुपात काजू, लवंग, वेलदोडे घालावे व वरून तांदूळ टाकून परतावेत. पाऊण कप पाणी घालून मंद आचेवर भात शिजवून घ्यावा. आता अननसाच्या फोडी व साखर एक करून जाड बुडाच्या कढईत उकळायला ठेवावी. हलवून साखर विरघळवून घ्यावी. मग उकळायला लागले की गॅस बारीक करावा. पाक गोळीबंद झाला की गॅस बंद करावा. भात झाल्यावर परातीत उपसून वाफ जाऊ द्यावी. मग या अननसाच्या मिश्रणात भात घालून
हलके मिसळावा. कडेने उरलेले तूप सोडावे. त्यात हलके हलवून पुन्हा परतावा व कोरडा होऊ द्यावा.