टॉरल इंडिया कंपनीची सुपा एमआयडीसीत ५०० कोटींची गुंतवणूक

१२०० जणांना रोजगार मिळणार, अजूनही कंपन्या संपर्कात – खा.निलेश लंके  

नगर – टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे पारनेर तालुक्यातील १ हजार २०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या बरोबरच अजूनही अनेक कंपन्या येणार असल्याची माहिती खा. निलेश लंके यांनी दिली.

टॉरल इंडियाने त्यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सांमजस्य करार केला आहे. पुण्यातील टॉरल इंडियाची सध्याची ३ लाख चौरस फुट सुविधा उत्पादन डिझाईनपासून ते गुणवत्ता चाचणी, रंगकाम, असेंब्ली, आणि वितरणापर्यंत व्यापक ॲल्युमिनियम सॅड-कास्टिंग सोल्यूशन प्रदान करते. उर्जा संरक्षण एरोस्पेस, सागरी, रेल्वे आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रातील वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी विस्तारित सुपा येथील सुविधा चार पट मोठी असेल.

या महत्वपुर्ण गुंतवणूकीसह टॉरेल इंडियाचे उद्दीष्ट नवोपक्रमांना चालना देणे, स्थानिक प्रतिभेला सक्षम करणे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक महत्वाकांक्षेत योगदान देताना महत्वाच्या उद्योगांमध्ये भारताचे स्वावलंबन वाढविणे आहे.

५०० कोटी रूपयांची गुतवणूक टॉरल इंडियासाठी एक निर्णायक क्षण आहे, कारण आम्ही प्रगत उत्पादनात नवीन उंची गाठत आहोत. सुपा प्लान्टचा  विस्तार केवळ क्षमता वाढविण्यासाठी नाही तर तो उद्योगांचे विकेंद्रीकरण टियर २ आणि टियर ३ क्षेत्रांना सक्षम बनविणे आणि १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून योगदान देण्याबद्दल आहे. असे कंपनीचे एमडी व सीईओ भरत गिते यांनी सांगितले.

सुपा एमआयडीसीची बदनामी करणाऱ्यांना चपराक

सुपा एमआयडीसी हे शांततेचे प्रतिक आहे. त्यामुळे अनेक उद्योग येथे येत आहेत. अनेक कंपन्या या औद्योगिक क्षेत्रात येण्यास तयार असून ते उद्योजक, कंपनी व्यवस्थापन आपल्या संपर्कात आहेत. असे सांगत सुपा औद्योगिक क्षेत्राची बदनामी करणे हा काही लोकांचा धंदा आहे. त्यांनी आपल्याकडे काय चालले आहे हे आगोदर पहावे त्यानंतर  इतरांवर चिखलफेक करावी. असा टोला खा. निलेश लंके यांनी लगावला आहे.

परीक्षा कालावधीत जारी केलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक पुढे ढकला अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालणार

परीक्षेत गुंतलेले शिक्षक उमेदवार प्रचार कसा करणार? विरोधी संचालकांची मागणी

नगर – परीक्षा कालावधीत जारी करण्यात आलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी विरोधी संचालकांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन १४ फेब्रुवारीला जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी मुटकुळे यांना देण्यात आले. यावेळी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे
व क्रीडा महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार शितोळे आदी उपस्थित होते. सदर निवडणूक पुढे न ढकळल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक
सोसायटी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. संस्थेचे ९,१५२ सभासद असून हे सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहे. सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या वार्षिक परीक्षा चालू झाल्या असून, त्याचे
कामकाज २० मार्चपर्यंत चालणार आहे. सदर परीक्षेच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी पूर्णपणे गुंतलेले आहेत. मार्च २०२५ च्या शेवटच्या आठवड्यापासून पाचवी
ते नववीच्या परीक्षेचे शासनाने आयोजन केलेले आहे. परीक्षा काळात शिक्षकांच्या सभा आयोजन,
भेटीगाठी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. जिल्ह्यात १४ तालुयात सुमारे ७०० शाळा
असून त्यामध्ये ९१५२ सभासद विखुरलेले आहेत. निवडणूक काळात परीक्षा असल्याने उमेदवारांना
फॉर्म भरणे, प्रचार करण्यासाठी रजा मिळू शकत नाही. या अडचणी पाहता निवडणूक लोकशाही
पद्धतीने होणे अशय असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  ३१ जानेवारी रोजी संस्थेच्या चेअरमनपदाच्या
निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना परिक्षा व पर्यवेक्षण इत्यादी शालेय
कामकाजासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी परिक्षाच्या काळात
निवडणुकीचा प्रोग्रॅम लागणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र
तरी देखील परीक्षा काळात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने शिक्षक वर्गामध्ये नाराजी
पसरली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २३ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द करून ती ३१ मे
च्या दरम्यान घ्यावी, किंवा जून, जुलै २०२५ मध्ये घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
परीक्षा काळात राबविण्यात येत असलेल्या निवडणुक प्रकियेमुळे शिक्षक उमेदवारांना
मतदारापर्यंत पोहचणे अशय होणार आहे. तर परीक्षा काळात कर्तव्य बजवावे की, प्रचार
करावे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. या परिस्थितीची जाणीव ठेऊन जिल्हा उपनिबंधकांनी
सदर निवडणुक प्रक्रिया दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परीक्षा काळात घेऊ नये, असे विरोधी संचालक
महेंद्र हिंगे म्हणाले.

रेडिओ दिनानिमित्त चित्रकूट गुरूकुलचा चिमुरडा अयांश गोंधणे बनला ‘आरजे’

नगर – जागतिक रेडिओ दिनानिमित्त सावेडी येथील चित्रकूट गुरुकुलमधील एलकेजीचा विद्यार्थी
अयांश गोंधणे याने आरजेची भूमिका साकारत रेडिओ ९०.४ एफएमच्या श्रोत्यांना खिळवून ठेवले. चिमुरड्यांना
संपर्क माध्यमांची ओळख व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळेल या दृष्टीने चित्रकूट गुरूकुल
विशेष उपक्रम राबविते. अयांशने संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत प्रसारित होणार्‍या विशेष कार्यक्रमात आपला
सुंदर आवाज आणि निरागस उत्साहाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वर्गशिक्षिका हर्षदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सारिका आनंद, संस्थेचे संचालक संजय चव्हाण यांच्या प्रोत्साहनाने अयांशने अतिशय आत्मविश्वासाने श्रोत्यांना आनंददायी
अभिवादन आणि मनमोहक कवितांनी गुंतवून ठेवले. त्याच्या निरागस
पण प्रगल्भ सादरीकरणाने अनेकांना हसू आणले आणि
हे सिद्ध केले की वय हा प्रतिभेचा अडथळा नाही.
श्रोत्यांनी उत्सुकतेने रेडिओ ट्यून केले आणि या
उपक्रमाची प्रशंसा केली. लहान मुलांना व्यक्त होण्यासाठी
अधिक व्यासपीठांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी चित्रकूट
गुरुकुलच्या प्रयत्नांचे पालक आणि शिक्षकांनी कौतुक
केले. मुलांना अभिव्यक्तीचे नवीन मार्ग शोधण्यासाठी
प्रेरणा देताना या कार्यक्रमाने संवाद आणि मनोरंजनामध्ये
रेडिओचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे यश
चित्रकूट गुरुकुलची सर्वांगीण शिक्षणाची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पलीकडे संधी उपलब्ध होतात. अशा
आशादायक सुरुवातीसह, लहान आरजे अयांशने नवोदितांसाठी एक
प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे

श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिराच्या उत्सवास शोभायात्रेने प्रारंभ

मूर्तीस चांदीचा मुकुट अर्पण करून आरती, विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, समाजोपयोगी कार्यक्रम

नगर – छत्रपती शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड येथील श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिरच्यावतीने बालाजी उत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी श्री बालाजी व विठ्ठल-रुखमाई यांची नवग्रह मंदिर नालेगांव ते छत्रपती शिवाजीनगर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप
यांच्याहस्ते मंदिरात आरती करून श्री बालाजी मूर्तीस चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. या आगोदर शोभायात्रेचा शुभारंभ माजी गटनेते संजय शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, सुरेश तिवारी, राम नळकांडे, संदिप दातरंगे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले कि कल्याण रोड परिसरातील श्री
बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिराच्यावतीने दरवर्षी होणार्या विविध धार्मिक कार्यक्रमात
परिसरातील नागरिक उत्साहाने सहभागी होत असतात. या निमित्त राबविण्यात येणारे
उपक्रम हे सर्वांसाठी लाभदायक ठरत आहे. सामुदायिक विवाह हा चांगला उपक्रम
राबवत आहेत, असे सांगितले.
यावेळी शाम नळकांडे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी उत्सव व सर्वधर्मिय
विवाह आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात विविध सामाजिक, धार्मिक,
सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी
रोजी श्री बालाजी व विठ्ठल-रुखमाई यांची शोभायात्रेने या उत्सवाची सुरुवात झाली
आहे. १५ फेब्रुवारी रोजी डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स, सोलो डान्स १६ फेब्रुवारी रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याच दिवशी दुपारी १२. ३० वाजता सामुदायिक विवाह सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.यावेळी शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम नळकांडे म्हणाले, या उत्सवानिमित्त दररोज सकाळी ७ वा. श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई महाआरती व रुद्राभिषेक, दुपारी ४ ते ५.३० या वेळेत शिवाजीनगर महिला भजनी मंडळाचा हरिपाठ आदि कार्यक्रम होणार आहेत.या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शंभुराजे प्रतिष्ठान, शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे मित्र मंडळ व कल्याण रोड व प्रभागातील सर्व नागरिक परिश्रम घेत आहेत

विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरावे

रेहान काझी यांचे प्रतिपादन; नागोरी मुस्लिम ट्रस्ट संचलित शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात, कव्वाली आणि देशभक्तीवरील गीतांनी जिंकली मने

नगर – शालेय जीवनात पास-नापास व कमी गुण महत्त्वाचे नसून, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेने
स्वत:ला सिध्द करावे. कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरल्यास भविष्यातील वाट सापडणार आहे. विद्यार्थ्यांना
जीवनात ध्येय निश्चित करुन वाटचाल करण्याचे रेहान काझी यांनी आवाहन केले.
नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी, अहमदनगर उर्दू हायस्कूल
व मिसगर ज्यूनिअर कॉलेज आणि एम इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. नृत्याविष्कार व नाटिकेतून कलागुणांचे
सादरीकरण करुन विविध सामाजिक संदेश दिला. विविध गाण्यांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात
रंग भरला होता. माऊली संकूल सभागृहात झालेल्या स्नेहसंमेलनाची सुरुवात कुरआन पठनाने झाली. हज
कमेटीचे अध्यक्ष सलीम बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.
अविनाश मोरे, संस्थेचे सचिव रेहान काझी, इनाम खान, वाजिद खान, इफ्तेखार अहमद, रुमाना खान, नाजनीन
शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात मुनव्वर हुसैन यांनी शाळेत
विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्काराची जोड देऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन,
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला.
विविध गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण व सामाजिक संदेश देणार्‍या नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कव्वाली आणि देशभक्तीवरील गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा
व इतर क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन
लतीफ राजे, फिरदौस खान, आयेशा शेख व सबा परवीन खान यांनी केले. शाहनवाज पटेल यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

अरबी समुद्रामध्ये होणार्‍या स्पर्धेत दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने होणार सहभागी

विखे पाटील फाउंडेशन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचे सहकार्य; रविवारी गाठणार १ कि.मी.चा टप्पा

नगर – शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने हा विखे पाटील फाउंडेशन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या
माध्यमातून मुंबईच्या अरबी समुद्रात रविवारी (दि.१६ फेब्रुवारी) होणार्‍या सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होणार
आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्टेट म्युचर क्वोटिस असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत दिव्यांग
गटातून सहभागी होणारा अभिजीत हा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
अभिजीत माने याने जिल्हा व राज्यस्तरावर जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकाविली
आहे. तो पहिल्यांदाच सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होत आहे. यासाठी त्याला विखे
पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आलेले आहे. त्याच्या
सरावासह स्पर्धेचा खर्च देखील फऊंडेशनच्या वतीने उचलण्यात आलेला आहे.
दिव्यांग गटातून १ कि.मी. चा टप्पा गाठायचा आहे. या स्पर्धेला रविवारी गेट ऑफ
इंडिया येथून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी अभिजीतकडून मुळा
डॅम आणि विळद घाट येथील विखे पाटील कॉलेजच्या जलतरण तलावात
अ‍ॅकॅडमीच्या तज्ञ प्रशिक्षकांकडून सराव घेण्यात आलेला आहे.

दिव्यांगांची आई! म्हणून धनश्रीताईंचा दिव्यांगांना आधार
अभिजीतच्या आईच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जलतरणाचे धडे देण्यात
आलेले आहे. मात्र पुढील वाटचालीसाठी विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून धनश्रीताई विखे यांनी त्याची
जबाबदारी घेतली आहे. फक्त अभिजीत नव्हे तर इतर दिव्यांग खेळाडूंना अतिशय आस्थेने व आपुलकीने
प्रोत्साहन देण्याचे काम त्या करत आहे. दिव्यांगांची आई म्हणून धनश्रीताई दिव्यांगाना आधार देत आहेत.
दिव्यांगांचा सर्व खर्च ते उचलत आहे. आपुलकीच्या भावनेने त्यांचे योगदान सर्व पालकांना भावनिक करत
आहे, असे अभिजीतचे वडिल जगन्नाथ माने म्हणाले.

सत्याचा प्रकाश दिसण्यासाठी महामानवांचे स्मरण करणे गरजेचे

नगर – सत्याचा प्रकाश दिसावा आणि त्या दृष्टीकोनातून पावले पडावीत, यासाठी महामानवांचे स्मरण
आणि त्यांना अभिवादन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य शिवाजीराव देवढे
यांनी येथिल न्यू लॉ कॉलेज आयोजित १८ व्या राज्यभरात आंतमहाविद्यालयीन . राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या
उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे
अध्यक्ष रामचंद्रजी दरे हे होते. व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव जयंत वाघ, प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे, प्रा.
डॉ. रामेश्वर दुसुंगे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राज्यभरातून विविध जिल्हयातील महाविद्यालयाचे
स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. देवडे म्हणाले की, कॉ. बापूसाहेब भापकर हे त्यांच्या कालखंडातील महापुरुषच होते हे त्यांनी त्यांच्या आचार, विचार आणि आदर्श व प्रेरणादायी जीवनातून दाखवून दिले. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य
ही नव्या पिढीसाठी एक परंपराच आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे छोटा प्रदेश, छोटे राज्य यांच्यावर
वर्चस्व असले तरी ते जगभरात पोहचू शकले हे केवळ त्यांच्या अंगभूत गुण आणि जिजाऊ मातेचा आदर्श.
वक्तृत्व स्पर्धेतून चांगले वकिल घडण्याचे कार्य होते. आपल्या पक्षकाराची बाजू समर्थपणे मांडून प्रतिपक्षाचे
म्हणणे खंडण करण्याची कला वक्तृतव स्पर्धेतून चांगल्या प्रकारे निर्माण होते. असे ते म्हणाले.
रामचंद्र दरे म्हणाले की, बापूसाहेब भापकरांनी संस्थेच्या अनेक पदावर काम करताना बहुजन
समाजासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक योगदान दिले. तसेच वकिली करत असताना
समाजातील दीनदुबळयांना न्याय देताना निःस्वार्थ भावनेने वकिली व्यवसाय केला
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव जयंत वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना बापूसाहेब भापकर
यांनी संस्थेसाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण
पिढीने घेणे गरजेचे आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा ही एक प्रकारे विद्यार्थ्यांना बौध्दिक मेजवानी
असल्याचे प्रतिपादन केले. स्वागत प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. रामेश्वर
दुसुंगे यांनी गत स्पर्धेचा आढावा घेवून स्पर्धेचा आलेख यशस्वीरित्या उंचावत असल्याचा
उल्लेख केला. सुरुवातीला बापूसाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पाहुण्यांची ओळख प्रा. अतुल म्हस्के यांनी करुन दिली. सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे-कांडेकर यांनी
केले तर आभार प्रा. ए.एस. घुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविदयालयाचे अधिक्षक हेमा कदम,
प्रा. अनुराधा मते, प्रा. डि. बी. मोरे, प्रा. आर. डी. भवाळ आदींनी परिश्रम घेतले

हिंदी, मराठी, धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले

आयुक्त यशवंत डांगे यांचे प्रतिपादन; महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम

नगर – महापालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्षभर नगरकरांना सुविधा पुरवीत असताना त्यांना ताण-तणाव असतो त्यामुळे त्यांना थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. त्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांनी गीत सादर करत जीवनामध्ये आनंद घेण्याचे काम केले आहे. सर्व कर्मचार्‍यांनी एकापेक्षा एक गीत सादर केले असल्यामुळे कार्यक्रमात उत्साह पाहायला मिळाला. हिंदी मराठी धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम
केले जाते. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम करून राज्यातील १९ ड वर्ग महापालिकेमध्ये आपली
महापालिका एक किंवा दोन नंबर मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे तसेच थकीत वसुली मोठ्या प्रमाणात
गोळा केल्यानंतर कर्मचार्‍यांची फरकापोटी असलेले देणे लवकरात लवकर देता येईल असे प्रतिपादन आयुक्त
यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा
सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी उद्घाटन आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त सपना
वसावा, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, कर्मचारी कामगार युनियनचे
अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, क्रीडा अधिकारी फिलिप्स, इंजिनिअर महादेव काकडे, अनिल
लोंढे, राजेंद्र मेहत्रे, सतीश ताठे, किशोर कानडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
महापालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी ’तुझी चाल तुरु तुरु’ हे मराठी गीत
गायल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये एक प्रकारे जल्लोष निर्माण होता, वन्स मोरचा नारा दिला, तसेच
उपायुक्त सपना वसावा यांनी देखील गीत गात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. यावेळी अधिकारी कर्मचारी
यांनी सुमारे ५० कार्यक्रमाचा आनंद घेतला. मनपा कर्मचारी नितीन गोरे यांनी ’मुंबई से आया मेरा दोस्त’ हे गीत गात
असताना सभागृहात एकच जल्लोष झाला व कर्मचारी यांनी स्टेजवर जाऊन नाचण्याचा आनंद घेतला

अमेझिया फन फेअर मनोरंजन नगरीचे उद्घाटन

यूयॉर्क शहराची प्रतिकृती, विविध जातीचे आंतरराष्ट्रीय पक्षी पार्कमुळे मनोरंजन

नगर – शहर विकास कामातून झपाट्याने बदलत असून
विविध नामांकित कंपनीचे ब्रँड नगरमध्ये येत आहे. नगर शहराची
मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल होत असताना विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत भर पडत असते.
अमेझिया मनोरंजन नगरी महिला आणि चिमुकल्यांसाठी मनोरंजन
पर्वणी ठरणार आहे. तसेच हुबेहूब साकारलेल्या न्यूयॉर्क शहराची
प्रतिकृती देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे प्रतिपादन
आ. संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहरातील कल्याण रोड जाधवनगर येथे अमेझिया फन
फेअर मनोरंजन नगरीचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते
झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत
बारस्कर, अ‍ॅड.जयंत जाधव, वैभव ढाकणे, मयूर राऊत, निलेश हिंगे,
के.एस. हँडलूमचे व्यवस्थापक व
कर्मचारी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, पुढील एक महिना नगरकरांना
विविध खेळाचा आनंद घेता येईल. जयंत जाधव यांनी नागरिकांना
मनोरंजनाची एक पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. नगरकरांना
आता न्यूयॉर्क शहराचा नजराना पाहिला मिळणार आहे, तसेच
विविध जातीचे आंतरराष्ट्रीय पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळणार
आहे. त्यामुळे नगरकरांनी पण फन फेअरचा आनंद घ्यावा.
येथे न्यूयॉर्क शहराची प्रतिकृती तयार केली असून फोटो काढण्यासाठी
सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहे. तसेच विविध जातीचे पक्षी
या ठिकाणी असून संपूर्ण परिसरामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला
मिळतो. लहान मुलांसाठी विविध खेळण्याचे प्रकार या ठिकाणी आहे.
मनोरंजनासोबतच खाद्यपदार्थाचा आस्वादही नागरिकांना घेता येणार
आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीच्या चौकशीसाठी सक्षम व तज्ज्ञ समितीची नियुती

प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी : योगेश दोडके यांची माहिती

नगर – अहिल्यानगरमध्ये २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान
झालेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंयपद महाराष्ट्र केसरी कुस्ती
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम
फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती
झाली. ही कुस्ती मोहोळ यांनी जिकल्याने त्यांची महाराष्ट्र केसरी
किताबासाठी गादी विभागातून निवड झाली होती. मात्र मोहोळ
विरोधात राक्षे या कुस्ती वरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही कुस्ती मोहोळ यांनी जिंकल्याचा
आरोप कुस्ती क्षेत्रात होत आहे. याबाबत शिवराज राक्षे यांनी अद्याप
राज्य कुस्तीगीर संघाकडे कोणतीही तक्रार किंवा चौकशीसाठी अर्ज
दिलेला नाही. मात्र पंचांवर जाहीरपणे आरोप व नाराजी व्यक्त होत
असल्याने राज्य कुस्तीगीर संघाने मोहोळ व राक्षे यांच्यात झालेल्या
लढतीची सखोल चौकशी करण्यासाठी सक्षम तज्ञ समितीची नेमणूक
करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार
प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा.विलास कथुरे यांची नितुक्ती
करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर ४ तज्ञ पदाधिकार्‍यांचीही
नियुक्ती करण्यात आली. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील
पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र
राज्य कुस्तीगीर संघाकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती
राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी पै.योगेश दोडके यांनी
दिली.
याबाबत योगेश दोडके यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे
की, अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी
विभागाची अंतिम लढत पै. पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात
झाली होती. या कुस्तीस पंच म्हणुन छत्रपती संभाजीनगर येथील
आंतराष्ट्रीय पंच नितीश काबीलिये, मॅट चेअरमन म्हणुन शासकीय
कोच पै. दत्तात्रय माने व साईड पंच म्हणुन विवेक नाईकलब यांची
नेमणुक करण्यात आली होती. सदर कुस्तीच्या निकालावरून बराच
गदरोळ निर्माण झाला. स्पर्धा संपल्यानंतर जनमानसात सुध्दा
निकालावरून नाराजी व्यक्त होत आहे.
सदर निकालाच्या विरूध्द पै. शिवराज राक्षे यांनी आजपर्यंत
कोणतीच लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली
नाही. परंतु समाजात सदर निकालाबाबत होत असलेल्या उलट
सुलट चर्चेचा विचार करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने
याबाबत ५ जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
या चौकशीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे
आंतरराष्ट्रीय पंच प्रा.विलास कथुरे यांची नेमणुक करण्यात आली
असुन त्यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय पंच प्रा.दिनेश गुंड पुणे व सुनिल
देशमुख जळगाव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पै.नामदेव बडरे
सांगली व राष्ट्रीय खेळाडू विशाल बलकवडे नाशिक यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील
पंचांच्या निर्णयाची सखोल करून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल महाराष्ट्र
राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करणार आहे.

समाज हितासाठी विद्यार्थ्याने काम केले पाहिजे

कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

नगर – विद्यार्थी हा समाज घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. समाजहितासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला  हिजे. तसेच  विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा हा त्यांना त्यांच्या फक्त वैयक्तिक फायद्यासाठी न होता समाजासाठी पण झाला पाहिजे ही अपेक्षा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना रामचंद्र दरे म्हणाले यांनी व्यक्त केली. समाजात शांतता, स्थिरता व समानता प्रस्थापित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले. याच प्रकारचे काम कै. ह. कृ.
तथा बाळासाहेब काळे यांनी त्यांच्या आयुष्यभर केले असे ते याप्रसंगी म्हणाले. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे व्रत सर्वांनी अनुकरणात आणावे असे मत त्यांनी मांडले.
कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धे चा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी भूषविले. तसेच सदर कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य खासेराव शितोळे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचा समारोप समारंभ संस्थेचे सह-सचिव जयंत वाघ यांच्या
उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. वक्तृत्व कलेच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करता यावी यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. खासेराव शितोळे यांनी आपल्या भाषणात कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केलेल्या शैक्षणिक,
सामाजिक, सहकार तसेच सांस्कृतिक कार्याच्या योगदानाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. बी. बी. सागडे यांनी संस्थेची
व महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. तसेच सहभागी स्पर्धकांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
समारोप प्रसंगी बोलताना जयंतराव वाघ यांनी वक्तृत्व कलेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की आजच्या
युगात प्रभावी वक्तृत्व कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे तसेच उत्कृष्ट वक्तृत्व ही फक्त वक्तृत्व कला नसून
प्रेरणा देणारे साधन आहे. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारणी सदस्या अरुणाताई काळे, कै. काळे-काकांचे नातेवाईक अशोकराव काळे, प्रा. पोपटराव काळे, प्रा. सुनील मांढरे, प्रा. आरतीताई साबळे-मांढरे, प्रा. वर्षाताई काळे, श्री. व सौ. अ‍ॅड भाऊसाहेब काळे, विभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुकाराम म्हस्के व निलेश मोरे यांनी
परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ए. के. अंबाडे तर उद्घाटन समारंभाचे आभार डॉ. मीना साळे यांनी मानले. डॉ. राजेंद्र साबळे यांनी समारोप समारंभाचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. निलेश लंगोटे, डॉ. निखिल गोयल, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. नितीन काळे, प्रा. मयूर रोहकले, डॉ. बळीराम उंद्रे, प्रा. अनिकेत डमाळे यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे: १) प्रथम क्रमांक : ह. कृ. तथा बाळासाहेब काळे फिरता करंडक
: आदित्य दराडे, एम. पी. लॉ कॉलेज संभाजीनगर.
२) द्वितीय क्रमांक : साईराज घाटपांडे, नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, पुणे. ३) तृतीय क्रमांक : अक्षदा
वडवणीकर, अ.नगर होमिओपॅथिक कॉलेज, अ. नगर.
४) एक उत्तेजनार्थ पारितोषिक : प्रमोद भालेराव, गोखले
इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिस अँड इकॉनॉमिस, पुणे.

सारडा महाविद्यालयाचे मैदान व जिमखाना माझे जीव की प्राण असायचे

पद्मश्री पोपटराव पवार यांचे प्रतिपादन; सारडा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप

नगर – सारडा महाविद्यालयातील ब्लेझर घातलेल्या विद्यार्थी खेळाडूंचा गौरव
करताना खूप हेवा वाटला. येथे आल्यावर महाविद्यालयीन काळात क्रिकेटच्या
आठवणींना उजाळा देता आला. मी जरी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा
विद्यार्थी होतो तरी सारडा महाविद्यालयाचे हे मैदान व येथील जिमखाना
माझा जीव की प्राण असायचे. या मैदानामुळेच मी न थकता आज
काम करू शकत आहे. युवा पिढीला मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक
असल्याने मी महाविद्यालयातील कार्यक्रमांना कायम प्राधान्य देत आहे.
येणारा काळ हा कुत्रिम बुद्धिमत्तेचा असल्याने मानवाचे सर्वकाही त्यावरच
चालणार आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचे किती ऐकायचे हे आपल्या हातात
असल्याने संस्कारात कमी पडू नका. मानवी कल्याणासाठीच कुत्रिम
बुद्धिमत्तेचा झाला नाहीतर भविष्यात सर्वत्र फक्त रोबोटच दिसतील
व मानवी अस्तिवाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पद्मश्री पोपटराव
पवार यांनी व्यक्त करून कुत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी न जाता सर्वांनी
आपले संस्कार जपावेत, असे आवाहन केले.
पेमराज सारडा महाविद्यालयात गेल्या ८ दिवसापासून सुरु
असलेल्या ‘रंग शारदा २०२५’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप
व वार्षिक परितोषिक वितरण प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार यांनी
उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत व
क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचा
सत्कार पोपटराव पवार व प्रमुख पाहुणे बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष व उद्योजक
पेमराज बोथरा यांच्या हस्ते करण्यात आला.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास
शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर, संस्थेचे सचिव संजय जोशी, महाविद्यालयाचे
चेअरमन सुमतिलाल कोठारी, उपाध्यक्ष हेमंत गोखले, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,
संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू सुधीर माळवदे, प्राचार्य डॉ.माहेश्वरी
गावित, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक सुजित कुमावत, प्रा.
राजू रिक्कल, स्नेहसंमेलनाचे निमंत्रक प्रा.शैलेश निकम आदींसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी
उपस्थित होते.
पेमराज बोथरा म्हणाले, मी सारडा महाविद्यालयाचाच माजी विद्यार्थी आहे. येथे बर्‍याच
वर्षांनी आल्याने मला शिकवणार्‍या सर्व प्राध्यापकांचे स्मरण करत त्या दिवसांच्या आठवणी
जागृत झाल्या. या महाविद्यालयातून जी प्रेरणा व संस्कार मिळेल त्यामुळेच मी
पारस उद्योग देशभर नेऊ शकलो. त्यामुळे माझ्या प्रगतीत सारडा महाविद्यालयाचे
मोठे योगदान आहे.
सुमतिलाल कोठारी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालय
शैक्षणिक, पोपटराव पावार यांनी देशात जलसंधारानाचे कार्य खूप
महान व कौतुकास्पद आहे. त्यांना पद्मश्री देऊन उचित सन्मान झाला
आहे. उद्योजक पेमराज बोथरा यांच्या मुळे आपले अहिल्यानगर पूर्ण
देशात नावाजले आहे. असे दिग्गज पाहुणे सारडा महाविद्यालयाच्या
स्नेहसंमेलनास लाभणे भाग्याचे आहे.
संजय जोशी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयाची
चौफेर प्रगतीत सर्व प्राध्यापकांचे मोलाचे योगदान आहे. सर्व प्राध्यापक
व विद्यार्थी उत्साही असल्यानेच दरवर्षी सारडा महाविद्यालयाचे
स्नेहसंमेलन तब्बल ८ दिवस मोठ्या धुमधडायात होत असते.
प्रा.शिरीष मोडक म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयातील
बहुतांशी प्राध्यापक हे डॉटरेट पदवीधारक असल्यने हे महाविद्यालय
डॉटरांचे महाविद्यालय म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळेच महाविद्यालय
सर्व क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहे.
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी महाविद्यालयाच्या वर्षभराच्या प्रगतीचा अहवाल सादर
करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या चौफेर प्रगतीची सविस्तर माहिती दिली. प्रा.शैलेश निकम
यांनी प्रास्ताविकात स्नेहसंमेलनाच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. प्रा. राजू रीक्कल यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या विविध
गुणदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक नृत्य प्रकार, गाणे
सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

महापालिका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा डोक्यात वार करून खुन

पिंपळगाव माळवी शिवारातील घटना, घरातच रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

नगर – अहिल्यानगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा  त्यांच्या घरातच अज्ञात इसमाने डोक्यात कशाने तरी वार करत खुन केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावच्या शिवारात असलेल्या आढाव वस्ती वर १३ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली आहे. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता.नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत नानाभाऊ नामदेव कराळे (वय ५९) यांनी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील आढाव वस्तीवर पत्नी व मुलासोबत रहावयास आहेत. ते महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात १९८५ पासून वॉटर सप्लायर म्हणून नोकरीस आहेत. तर त्यांचा मुलगा जालिंदर हा ही गेल्या ५ महिन्यापासून महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. दोघे पितापुत्र दररोज सकाळी ९ च्या दरम्यान नगरमध्ये कामावर येतात व सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत गावी जातात. त्यांच्या पत्नी लताबाई या दिवसभर एकट्याच घरी थांबून पाळीव जनावरांना चारापाणी तसेच शेतात काम करत असत.

१३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता नेहमी प्रमाणे पितापुत्र नगरला कामावर आले. नानाभाऊ यांनी दिवसभर निर्मलनगर, लेखा नगर, ढवण वस्ती या भागात पाणी सोडून ते सायंकाळी ६ वाजता घरी गेले. त्यांना त्यांची पत्नी घरी दिसून आली नाही तसेच गोठ्यातील जनावरांना चारा पाणी दिले नसल्याचे दिसले. त्यामुळे ते शेतात पत्नीला शोधायला गेले. मोठ्याने हाक मारूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ते पुन्हा घराजवळ आले. तो पर्यंत त्यांचा मुलगाही आला होता. दोघांनी घराचा दरवाजा उघडला आणि आत गेले असता त्यांना लताबाई या जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्याजवळ रक्ताचे थारोळे दिसले. तसेच शेजारी एक वाकलेला चाकू दिसून आला.

त्यावेळी दोघांनी आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. त्यातील काहींनी पोलिसांना फोन केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे पोलिस पथकासह घटनास्थळी गेले. त्यांच्या पाठोपाठ पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा  नानाभाऊ नामदेव कराळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात हल्लेखोराविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून खुनाच्या कारणाचा शोध सुरु

मयत लताबाई कराळे यांचा डोक्यात काहीतरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटून खून करण्यात आला असावा. असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. भरदुपारी हा खून करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत लताबाई या वस्तीवर एकट्याच असल्याने हा खून लुटीच्या उद्देशाने करण्यात आला असण्याची शक्यता आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून खुनाचा उद्देश काय असावा याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचे अनुकरण करत आपल्या संस्कृतीवर प्रेम करावे

आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता अभियान

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे अनुकरण करून आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर तरुण पिढीने प्रेम करावे, उड्डाणपुलाचे असणारे नगरकरांचे स्वप्न पूर्ण झाले असून पिलर वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा
जीवनपट रेखाटला आहे त्यांचा इतिहास महान आहे, डीएसपी चौक ते शिल्पा गार्डन पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली
असून महापालिकेने दोन महिन्यातून एकदा उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे १९ फेब्रुवारी रोजी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखालील फुटपाथ, डिव्हायडर, गटारीची स्वच्छता
करण्यात आली असून माती उचलण्यात आली, तसेच खांबावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रे पाण्याने धुवून
काढण्यात आली असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापालिका यांच्या वतीने उड्डाणपूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात
आले, यावेळी आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा
आठरे, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अजिंय बोरकर, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते
संपत बारस्कर म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या युवकांचे
संघटन करून लढवय्ये मावळे तयार केले. त्यांच्याच प्रेरणेतून आज युवकांनी संघटित होऊन समाजोपयोगी कार्य केले
पाहिजे. स्वच्छता मोहीम ही काळाची गरज आहे. आपण समाजामध्ये वावरात असताना समाजाचे काहीतरी देणे लागते
या भावनेतून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळा परिसर आणि उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात
आली असे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल परिसरामध्ये महापालिकेला स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र महापालिकेने स्वच्छतेचा फक्त दिखावा केला होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल परिसरातील स्वच्छता मोहिमेची फिरून पाहणी केली असता नाराजी व्यक्त करत प्रभाग अधिकार्‍यांना सूचना देत सांगितले की, शिल्पा गार्डन ते महेश टॉकीज पर्यंतची स्वच्छता मोहीम आज पूर्ण करावी. शहरातील काही नागरिक उड्डाणपूल परिसर व खांबावर आपल्या व्यवसायाची जाहिरात लावतात त्यामुळे शहराचे विद्रोपीकरण होत आहे, यापुढे कोणत्या व्यावसायिकांनी उड्डाण फुलाच्या खांबावर जाहिरात लावली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल तसेच त्याच्या व्यवसायाचे ठिकाण देखील सील केले जाईल असा इशारा प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी दिला.

भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या साहित्याची अवैध वाहतूक; संशयित कंटेनर पकडला

१ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नगर – भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या
साहित्याची अवैध वाहतूक करत सदर साहित्य काळ्याबाजारात विक्री
साठी घेवून चाललेला संशयित कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
नगर एमआयडीसी परिसरात १३ फेब्रुवारीला सायंकाळी पकडला आहे.
या कारवाईत कंटेनर सह १ कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे
शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार
संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर
शिरसाठ व प्रशांत राठोड यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत
असताना पथकाला खबर्‍यामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, एक
कंटेनर बेकायदेशीरपणे तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल काळ्या
बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे येथून दिल्लीकडे जात असून तो
सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे
थांबलेला आहे, ही माहिती मिळताच पथकाने एमआयडीसी येथे जाऊन
खात्री केली असता संशयीत कंटेनर मिळून आला. कंटेनर चालकाकडे
चौकशी केली असता त्याचे नाव शैलेंद्र सोरन सिंह (वय ४५, रा.
स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली) असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस
केली असता तो अर्धवट व दिशाभुल करणारी माहिती सांगु लागला. पथकाने कंटनेरचा दरवाजाचा
उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याचे पाईप असलेले बंडल, तांब्याचे जुने भांडे, तांब्याची
तार, ऍ़ल्युमिनीअमची वेगवेगळया आकाराचे तुकडे असलेला माल मिळून आला. कंटेनर चालकाकडे
मुद्देमालाचे पावतीबाबत विचारपूस केली असता त्याने मुद्देमालाची पावती
दाखविली. त्यात मुद्देमालाबाबत बिल्टी व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल
यामध्ये तफावत दिसुन आली.
त्यामुळे पथकाने कंटनेर चालक शैलेंद्र सोरन सिंह यास ताब्यात
घेऊन, ३० लाखांचा कंटनेर, १ कोटी ८ लाख रुपये किमतीचे एकुण
१८ हजार किलोग्रॅम वजनाचे तांबे व ऍ़ल्युमिनीअम धातुचे साहित्य
असा एकुण १ कोटी ३८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला.
ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत
विचारपूस केली असता त्याने ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज
अग्रवाल, रा.पुणे (फरार) यांचे सांगणेवरून मालाचे पुरवठादार एच.
एस. ट्रेडींग कंपनी, तामीळनाडू यांचेकडील मालापैकी तांब्याचे पाईप
असलेले बंडल हे बब्बु (पुर्ण नाव माहिती नाही) व बब्बु याचा मित्र यांनी
वाघोली, जि.पुणे येथून कंटेनरमध्ये भरून दिला.कंटनेरमधील मुद्देमाल
हा दिल्ली येथे गेल्यानंतर माल कोठे पोहच करावयाचा आहे याबाबत
माहिती नंतर सांगणार होते अशी माहिती सांगीतली.
त्यामुळे पोलिसांनी कंटनेर चालक, वाहनाचे मालक, मालाचे
खरेदीदार व पुरवठादार यांचे मदतीने तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल बेकायदेशीरपणे भरून, खोटी
व बनावट बिल्टी तयार करून, सदरचा मुद्देमाल काळया बाजारात विक्री करण्याचे हेतुने दिल्ली येथे
घेऊन जाण्याकरीता मिळून आल्याने ५ आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३
चे कलम ३०३ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय बजेट लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी देणारे

सी.ए. आयपी अजय मुथा यांचे प्रतिपादन; जितो अहमदनगरच्या कार्यक्रमात सी.ए. आयपी अजय मुथा यांनी सहज सोप्या शब्दात उलगडले बजेटचे अंतरंग

नगर – जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भारताचे यंदाचे केंद्र सरकारचे बजेट अर्थकारणाला
मोठी बळकटी देणारे आहे. कृषी, उद्योग, गुंतवणूक, निर्यात हे चार आधारस्तंभ समोर ठेवून तसेच आयकर दात्यांसाठी या
बजेटमध्ये अनेक दूरगामी परिणाम करणार्‍या चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेट सादर करून देशाच्या भविष्यातील सक्षम अर्थकारणाचा भक्कम पाया रचला आहे, असे मत नगर येथील मर्चंटस बँकेचे माजी चेअरमन तथा सी. ए. असोसिएशनचे माजी अध्यक्ष सी. ए. आयपी अजय मुथा यांनी केले.
जितो अहमदनगरच्या वतीने केंद्र सरकारच्या सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाच्या बजेटबाबत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जितो अहमदनगरचे चेअरमन आलोक मुनोत, सेक्रेटरी तुषार कर्नावट, सल्लागार समिती सदस्य तथा
मर्चंटस बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, जितो अहमदनगरचे व्हाईस चेअरमन
विजय गुगळे, अमित पोखरणा, प्रितेश दुगड, जितेंद्र लोढा, जितो युथ विंग चेअरमन
चेतन भंडारी, गौतम मुथा, कार्यक्रमाचे कन्व्हेनर मनोजकुमार चोपडा आदींसह सभासद
उपस्थित होते.
सी ए. आयपी अजय मुथा यांनी अतिशय सोप्या भाषेत बजेटमधील तरतुदी व
त्याचा होणारा लाभ उलगडून सांगितला. ते म्हणाले की, यंदाच्या केंद्रीय बजेटमध्ये
कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. पंतप्रधान धनधान्य योजना मिशन अंतर्गत
कृषी क्षेत्रासाठी सिंचनाची सोय करण्यात येणार आहे. डाळींच्या उत्पादन वाढीसाठी
विशेष प्रयत्न करून आत्मनिर्भरता आणली जाणार आहे. काढणी पश्चात पिकांसाठी
स्टोरेजची क्षमता वृद्धी करण्यात येणार आहे. पीक कर्जाची उपलब्धता वाढविण्यासाठी
विशेष प्रयत्न केले जातील. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिक पाठबळ मिळण्यास मदत
होईल. त्याचा दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू शकतो.
शेती क्षेत्राबरोबरच एम एस एम ई क्षेत्रावर यंदा बजेटमध्ये विशेष लक्ष केंद्रित
करण्यात आले आहे. एम एस एम ई या क्षेत्राची व्याख्येची व्याप्ती वाढवून या क्षेत्रातील
गुंतवणूक अडीच पट वाढवून टर्न ओव्हर लिमिट दुप्पट करण्यात आला आहे. को
लॅटरल फ्री क्रेडिट लिमिट ५ कोटी वरून १० कोटी करण्यात आले आहे. याचा फायदा
देशातील बहुतेक लघु उद्योगांना होईल. स्टार्ट आपला प्रोत्साहन देताना को लॅटरल फ्री
क्रेडिट लिमिटवर २० कोटींपर्यंतचे पाठबळ दिले गेले आहे. रोजगार निर्मितीसाठी पोषक
असलेल्या फुटवेअर, लेदर तसेच टॉईज इंडस्ट्रीवर अधिक लक्ष
केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे चीनच्या जागतिक वर्चस्वाला
आव्हान दिले गेले आहे. लघु उद्योगांना प्रोत्साहन देताना केंद्र
सरकारने नवनवीन उद्योजक घडवतात रोजगार निर्मितीसाठी
विशेष प्रयत्न केले आहेत.
गुंतवणूक क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी
सरकारने यंदा ११.२४ लाख कोटींची तरतूद केली आहे. रस्ते तसेच
इतर पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून देशाच्या भविष्याच्या
गरजांचा विचार करण्यात आला आहे. याशिवाय सरकारने १
लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा महत्वकांक्षी
प्रोजेट हाती घेतला आहे. वाढत्या शहरीकरणात सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी
हा फंड गेमचेंजर ठरेल. याशिवाय सर्व राज्य सरकारांनाही अर्बन डेव्हलपमेंटसाठी
बिनव्याजी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. भारताला मोठा सागरी
किनारा लाभला आहे. त्यामुळे शिपिंग इंडस्ट्रीला बळ देण्यासाठी २५ हजार कोटींचा
सागरी विकास फंड यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. हायस्पीड रेल्वेला चालना
तसेच अणुऊर्जेतून १ गिगा मेगा वॅट ऊर्जेचे लक्ष्य या गोष्टी देशाला स्वयंपूर्ण होण्याच्या
मार्गावर नेणार्‍या आहेत.
पब्लिक, प्रायव्हेट गुंतवणूक केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहे. यामुळे
उद्योजकता विकास, रोजगार निर्मिती आणि एकूणच अर्थकारण जागतिक स्तरावर
बळकट कसे होईल यादृष्टीने सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. आयकराच्या
रचनेतही सरकारने आमूलाग्र बदल अंगिकारले आहेत. आयकराच्या कलम ८७ ए
तरतुदीत मोठा बदल करून १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.
थेट करदात्यांची दरमहा ५ ते २० हजार रुपये कराची बचत होऊ शकते. याशिवाय
आयकरात अधिकाधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली गेली
आहेत. टिडिएस, टिसीएस मधील लिष्टता सुलभ पद्धतीने होईल अशी व्यवस्था
करण्यात आली आहे. आयकर सेशन २०६ सी (१ एच) तरतूद रद्द करण्याचा
अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक
कारभारात अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत.
एकूणच यंदाचे केंद्रीय बजेट सर्वसमावेशक आणि अर्थकारणाला बळकटी देणारे आहे,
असे मत सी ए, आय पी अजय मुथा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थितितांचे
स्वागत तुषार कर्नावट यांनी केले. आभार आलोक मुनोत यांनी मानले.

डॉ.सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

नगर – येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे यांच्या हस्ते झाले. सदर प्रसंगी कविवर्य चंद्रकांत पालवे, साहित्य परिषदेचे
विभागीय कार्यवाह व शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर, रोटरीचे दिपक गुजराथी, स्नेहालय परिवाराचे प्रविण कदम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया, प्रशांत
गायकवाड, महेश सुर्यवंशी उपस्थित होते. सुरूवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत केले व पुस्तकाची भुमिका मांडली. त्या म्हणाल्या कि रोटरी व स्नेहालय
परिवाराच्या वतीने जिल्हाभर अनेक ग्रामपंचायत, विद्यालय, महाविद्यालयातुन बालविवाह मुक्त अ.नगर ही मोहिम राबविण्यात आली. त्यावेळेस लोकशिक्षण व जनजागृतीसाठी सदर नाटिका मी लिहिली. जिल्हाभरात
त्याचे चौकाचौकातुन सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रयोग झाले. आकाशवाणी वरूनही ती प्रसारीत झाली. परंतु
पुस्तकाच्या रूपाने ती आज प्रकाशीत होत आहे. आज आदरणीय सरोजनी नायडू यांची १४६ वी जयंती आहे. हा
दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर
होत्या तसेच त्या कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या ही होत्या. त्यामुळे बालविवाहाची क्रुर प्रथा नष्ट करण्यासाठी
सदर नाटिकेचे प्रकाशन त्यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे ही आनंदाची बाब आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे म्हणाले की, सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची
प्रेरणा देणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे. बालविवाह हा समाजासाठी कलंक असुन आज ही भारतात ४०% पेक्षा
जास्त बालविवाह होतात ही चिंतेची बाब आहे. शासन व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन हा कलंक पुसला
पाहिजे. लोकशिक्षण व समाजजागृतीसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. लवकरच अहिल्यानगर तसेच
भारत बालविवाहमुक्त व्हावा अशी आशा मी बाळगतो. चंद्रकांत पालवे म्हणाले की, मी सुधाताईंना गेल्या
४० वर्षापासुन ओळखतो. समर्पित होऊन कार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. आधी केले मग सांगितले हा त्यांचा
स्वभाव आहे. म्हणूनच सदर पुस्तकातील नाटिकेचे ३०० पेक्षा जास्त ठिकाणी प्रयोग झाले व आता ती पुस्तक रूपाने येत आहे. नाटिकेतील भाव मनाला भिडतात, चिंतन करायला लावतात. आणि त्यामुळे यातुनच परिवर्तन होण्याची
अपेक्षा आहे.  यंत येलूलकर म्हणाले कि, नाटिका अत्यंत सोप्या  शब्दात, सहज बोलया भाषेत, सर्वांना समजेल अशा
छोटया छोटया वायात प्रस्तुत  झाली आहे. त्यामुळे शाळकरी  मुलामुलींनाही ती समजणार आहे. आता योग्य वेळी
विवाह होण्याच्या दृष्टीने घराघरातुनही संस्कार व्हायला हवेत मी डॉ. सुधाताईंचे अभिनंदन करतो.
स्नेहालय परिवारातील प्रविण कदम म्हणाले की मी स्वत: सदर नाटिकेचे दिग्दर्शन केले असुन आमच्या
टिमने त्याचे जिल्ह्यातील कानाकोपर्यातुन सादरीकरण केले आहे. शाळा शाळातुन जेव्हा आम्ही सादरीकरण
करत होतो तेंव्हा तेथील मुल मुली ही उत्साहाने सहभागी होत होते. गांवागांवातुन त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
बालविवाहामुळे होणारे बालमृत्यू तसेच मातामृत्यू प्रमाण थांबविण्यासाठी, तसेच कोमल वयात होणारे अत्याचार
रोखण्यासाठी बालविवाह थांबलेच पाहिजेत. त्यासाठी ही नाटिका नक्कीच उपयोगी ठरते. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले व म्हणाले की सदर पुस्तिका शाळेच्या लायब्ररीसाठी व या क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी मोफत देण्यात येईल

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे २८ विद्यार्थी स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत

शाळेच्या गुणवत्तेबाबत असलेला रोल मॉडेल संस्थेत घेऊन जाणार : नवनाथ बोडखे

नगर – हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई
भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी चमकले. शाळेच्या ६० विद्यार्थ्यांनी जिल्हा व शहर गुणवत्ता यादीत स्थान मिळवून, सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत २८, तर शहर गुणवत्ता यादीत ३२ विद्यार्थी आले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता
वाढीसाठी विशेष उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा
परीक्षेत बसविले जात आहे. यासाठी तज्ञ शिक्षक करत असलेल्या मार्गदर्शनाने विद्यार्थी
विविध परीक्षेत यश मिळवत असल्याचे स्पष्ट केले.
नवनाथ बोडखे म्हणाले की, ही प्राथमिक शाळा संस्थेत व राज्यात गुणवत्तेने
नावाजली आहे. अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकत आहे. या शाळेने पुढाकार
घेऊन रयतची एक स्पर्धा परीक्षा निर्माण करावी. त्याला संस्थेचे पूर्ण सहकार्य राहणार
आहे. या शाळेचे गुणवत्तेबाबत असलेले वेगळेपण रोल मॉडेल म्हणून संस्थेत घेऊन
जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ज्ञानदेव पांडुळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन सर्व गुणवंतांचे
अभिनंदन केले. तसेच यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल,
शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे,
भाग्यश्री लोंढे, भारती सुरसे आदींचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षत यश प्राप्त करणार्‍या
विद्यार्थ्यांचे संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी
सदस्य अभिषेक कळमकर, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी,
प्रमोद तोरणे, अर्जुनराव पोकळे, शौकतभाई तांबोळी यांनी अभिनंदन केले.
जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
इयत्ता पहिली- जिल्ह्यात ६ वा क्रमांक- भोंडवे अपूर्वा अमोल, पवार सिद्धी
अरुण, मोकाटे स्वरणीम जयदीप,
जिल्ह्यात ११ वा क्रमांक- कोहक सानवी नितीन, अनभुले स्वरव नारायण,
गंभीरे आयुष योगेश, गारूडकर कैवल्य प्रदिप.
इयत्ता दुसरी- आराध्या रावसाहेब जाधव (जिल्ह्यात ३ क्रमांक), नाबगे विनय
सचिन (जिल्ह्यात ६ वा), अंधारे वेदांत प्रमोद (जिल्ह्यात ८ वा), गुंजाळ रुद्र कैलास (जिल्ह्यात ९ वा), बारगजे भक्ती बळीराम (जिल्ह्यात ९ वा), ठाणगे गार्गी संतोष (जिल्ह्यात ११ वा), हंबर्डे शामवी अमोल (जिल्ह्यात १२ वा).
इयत्ता तिसरी- शेख सरफराज शाकिर (जिल्ह्यात ७ वा), शिंदे सत्यजित
विठ्ठल (जिल्ह्यात १३ वा), धामणे अनुष्का विलास (जिल्ह्यात १५ वा), पार्थ विक्रम जाधव (जिल्ह्यात १७ वा).इयत्ता चौथी- अनभुले अथर्व विकास (जिल्ह्यात ४ था), बोरुडे अर्णव भारत (जिल्ह्यात ५ वा), टकले कपिश मीनीनाथ (जिल्ह्यात ६ वा), बडवे ओवी अशोक (जिल्ह्यात ८ वा), कीर्ती प्रवीण शिरसे (जिल्ह्यात ९ वा), रक्ताटे श्रेया रवींद्र (जिल्ह्यात १२ वा), भद्रे स्वरा अजय (जिल्ह्यात १६ वा), जाधव आर्या रवींद्र (जिल्ह्यात १७ वा), बनकर आरुषी मल्लिकार्जुन (जिल्ह्यात २० वा), वरद बाबाजी झावरे (जिल्ह्यात २१ वा)

महाविद्यालयातील संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून जीवन घडविते

डॉ.प्रशांत पटारे यांचे प्रतिपादन; डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे र्‍हिदम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

नगर – शालेय जीवनात स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या
कला-गुणांना वाव देणारे पहिले व्यासपीठ असते. त्यांच्या
कलागुणांचा चा विकास झाल्यास पुढे करिअरची दिशा ठरते.
ही दिशा योग्य ठरवण्यासाठी महाविद्यालयामधील संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांचा
आत्मविश्वास वाढवून जीवन घडविते. सेवा शिक्षण मंडळाने खुप मोठी संस्काराची
शिदोरी प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिल्याने कला, क्रिडा,
सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच स्पर्धा परिक्षांसह १०० टक्के निकाल विद्यालयाचे लागले.
राज्य, राष्ट्रीय पातळीवर या शाळेने नाव उंचावले असे प्रतिपादन अस्थिरोग तज्ञ डॉ.
प्रशांत पटारे यांनी केले.
अहिल्यानगर येथील वसंत टेकडी जवळील डॉ.ना.ज. पाउलबुधे कॉलेज ऑफ
फॉर्मसीचे फार्मा र्‍हिदम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत पटारे, नेत्रतज्ञ डॉ.स्मिता पटारे सेवा शिक्षण
प्रसारक मंडळाचे रामभाऊ बुचकूल, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे, राघुनाथ
कारमपूरी, संजय पवार, साई पाऊलबुधे, डॉ.श्रध्दा पाऊलबुधे संकुलाच्या प्रमुख डॉ.
रेखाराणी खुराणा, एम.फार्मचे समन्वयक डॉ.वेणू कोला संकुलातील सर्व विद्यालय,
महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
डॉ.पटारे यांनी आपल्या भाषणातून कॉलेजच्या जुन्या अभ्यासक्रमाचा व नवीन
अभ्यासक्रमांमधील फरक स्पष्ट केला. तंत्रज्ञान युगात सोशल मिडीयात तरुण जास्त रमतात.
त्याचा योग्य तो वापर करुन स्वत:ला स्ट्राँग ठेवून आपण पुढे कसे जाऊ हा विचार
करावा. नवीन जनरेशला प्रगतीसाठी वेळ चांगली आहे. या फार्मसी क्षेत्रात नोकर्‍यांबरोबरच
व्यवसायाला खुप चांगल्या संधी आहेत असे सांगितले.
डॉ.स्मिता पटारे यांनी सेवा शिक्षण प्रसारक मंडळ
विद्यार्थ्यांसाठी एक संस्कार केंद्रच आहे. या माध्यमातून
सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना चांगले शिक्षण सोयी-सुविधा
देत असल्याने विद्यार्थी सक्षम बनतात. डॉ.नाथ सरांचे स्वप्न खर्‍या अर्थाने विद्यार्थी,
शिक्षक हे पुर्ण करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बी. फॉर्मसी कॉलेजचा वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ.श्याम
पंगा यांनी केले तर डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी वर्षभर राबविलेले
विविध उपक्रम, स्पर्धा, उत्सवांमधील विद्यार्थ्यांनी घडविलेले सांस्कृतिक कलेचे दर्शन,
क्रिडा स्पर्धेतील यशाचा अहवालात माहिती दिली.उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
पारितोषिक वितरण करण्यात आले.
फार्मा र्‍हिदम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरी ढवळे,
प्रियंका कर्डिले, खेळ विभाग प्रमुख मिलिंद क्षीरसागर, पल्लवी अडागळे सांस्कृतिक
विभागाचे सुधीर गर्जे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम
घेतले.
फार्मा र्‍हिदम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय
पाऊलबुधे यांनी सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोशनी सूर्यवंशी यांनी केले तर आभार सुवर्णा येमुल यांनी मानले.

नगर-पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी केली जेरबंद

टोळीत नागापूर, बोल्हेगाव येथील आरोपींचा समावेश, ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

नगर – नगर – पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत लुटणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या चौघांच्या टोळीतील १ नागापुरचा, दोघे बोल्हेगावचे तर एक श्रीगोंदा तालुयातील आरोपीचा समावेश आहे. समीर गफ्फार शेख (वय ३०, रा.बोल्हेगाव), वैभव सुरेश कोठाळे (वय ३२, रा.इरिगेशन कॉलनी, देवदैठण, ता.श्रीगोंदा), अक्षय दशरथ पडवळ (वय २९, रा.बोल्हेगाव) या तिघांना पकडण्यात आले आहे तर त्यांचा आणखी एक साथीदार खंडू उर्फ संदीप मिठू काळे (रा. नागापूर, ता.अहिल्यानगर) हा फरार आहे. या टोळीने
११ फेब्रुवारीला रात्री ८.३० च्या सुमारास सतीष मधुकर पठारे (रा.बँक कॉलनी, सुपा, ता.पारनेर) यांना सुपा येथील वाळवणे चौकात गाडी बंद असल्याचा बहाणा करून मदत करण्यास कारमध्ये बसविले. कारमध्ये बसल्यानंतर कार सुपा येथून वाळवणे गावाकडे घेवून जात पठारे यांना चाकुचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या मोबाईलमधील फोन पे वरून ७९
हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर पठारे यांना त्या परिसरात कार मध्ये फिरवून त्यांचे कपडे काढुन घेत
त्यांना नगर पुणे महामार्गावर सुप्याजवळील पवारवाडी घाटात सोडून दिले होते. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात
जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे हे करत होते. १३ फेब्रुवारीला हे पथक तांत्रीक विश्लेषणाचे आधारे गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांना सदर गुन्हा बोल्हेगावच्या समीर गफ्फार शेख याने त्याचे साथीदारासह केला असल्याची
माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा एमआयडीसी परिसरात शोध घेवून त्याला पकडले. त्याने साथीदारांसह गुन्हा
केल्याची कबुली दिल्यावर वैभव कोठाळे व अक्षय पडवळ यांना ही पकडण्यात आले. तर खंडू उर्फ संदीप मिठू काळे
हा फरार झाला आहे. पोलिसांनी समीर शेख याने गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कार (क्र. एमएच १२ ईएस ६७७८) सह
१५ हजारांची रोकड जप्त केली. आरोपींना सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास महिला पोलिस
उपनिरीक्षक मोनिका जेजोट या करत आहेत