कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
नगर – विद्यार्थी हा समाज घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. समाजहितासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला हिजे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा हा त्यांना त्यांच्या फक्त वैयक्तिक फायद्यासाठी न होता समाजासाठी पण झाला पाहिजे ही अपेक्षा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना रामचंद्र दरे म्हणाले यांनी व्यक्त केली. समाजात शांतता, स्थिरता व समानता प्रस्थापित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले. याच प्रकारचे काम कै. ह. कृ.
तथा बाळासाहेब काळे यांनी त्यांच्या आयुष्यभर केले असे ते याप्रसंगी म्हणाले. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे व्रत सर्वांनी अनुकरणात आणावे असे मत त्यांनी मांडले.
कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धे चा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी भूषविले. तसेच सदर कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य खासेराव शितोळे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचा समारोप समारंभ संस्थेचे सह-सचिव जयंत वाघ यांच्या
उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. वक्तृत्व कलेच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करता यावी यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. खासेराव शितोळे यांनी आपल्या भाषणात कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केलेल्या शैक्षणिक,
सामाजिक, सहकार तसेच सांस्कृतिक कार्याच्या योगदानाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. बी. बी. सागडे यांनी संस्थेची
व महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. तसेच सहभागी स्पर्धकांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
समारोप प्रसंगी बोलताना जयंतराव वाघ यांनी वक्तृत्व कलेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की आजच्या
युगात प्रभावी वक्तृत्व कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे तसेच उत्कृष्ट वक्तृत्व ही फक्त वक्तृत्व कला नसून
प्रेरणा देणारे साधन आहे. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारणी सदस्या अरुणाताई काळे, कै. काळे-काकांचे नातेवाईक अशोकराव काळे, प्रा. पोपटराव काळे, प्रा. सुनील मांढरे, प्रा. आरतीताई साबळे-मांढरे, प्रा. वर्षाताई काळे, श्री. व सौ. अॅड भाऊसाहेब काळे, विभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुकाराम म्हस्के व निलेश मोरे यांनी
परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ए. के. अंबाडे तर उद्घाटन समारंभाचे आभार डॉ. मीना साळे यांनी मानले. डॉ. राजेंद्र साबळे यांनी समारोप समारंभाचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. निलेश लंगोटे, डॉ. निखिल गोयल, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. नितीन काळे, प्रा. मयूर रोहकले, डॉ. बळीराम उंद्रे, प्रा. अनिकेत डमाळे यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे: १) प्रथम क्रमांक : ह. कृ. तथा बाळासाहेब काळे फिरता करंडक
: आदित्य दराडे, एम. पी. लॉ कॉलेज संभाजीनगर.
२) द्वितीय क्रमांक : साईराज घाटपांडे, नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, पुणे. ३) तृतीय क्रमांक : अक्षदा
वडवणीकर, अ.नगर होमिओपॅथिक कॉलेज, अ. नगर.
४) एक उत्तेजनार्थ पारितोषिक : प्रमोद भालेराव, गोखले
इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिस अँड इकॉनॉमिस, पुणे.