सत्याचा प्रकाश दिसण्यासाठी महामानवांचे स्मरण करणे गरजेचे

0
41

नगर – सत्याचा प्रकाश दिसावा आणि त्या दृष्टीकोनातून पावले पडावीत, यासाठी महामानवांचे स्मरण
आणि त्यांना अभिवादन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य शिवाजीराव देवढे
यांनी येथिल न्यू लॉ कॉलेज आयोजित १८ व्या राज्यभरात आंतमहाविद्यालयीन . राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या
उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे
अध्यक्ष रामचंद्रजी दरे हे होते. व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव जयंत वाघ, प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे, प्रा.
डॉ. रामेश्वर दुसुंगे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राज्यभरातून विविध जिल्हयातील महाविद्यालयाचे
स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. देवडे म्हणाले की, कॉ. बापूसाहेब भापकर हे त्यांच्या कालखंडातील महापुरुषच होते हे त्यांनी त्यांच्या आचार, विचार आणि आदर्श व प्रेरणादायी जीवनातून दाखवून दिले. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य
ही नव्या पिढीसाठी एक परंपराच आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे छोटा प्रदेश, छोटे राज्य यांच्यावर
वर्चस्व असले तरी ते जगभरात पोहचू शकले हे केवळ त्यांच्या अंगभूत गुण आणि जिजाऊ मातेचा आदर्श.
वक्तृत्व स्पर्धेतून चांगले वकिल घडण्याचे कार्य होते. आपल्या पक्षकाराची बाजू समर्थपणे मांडून प्रतिपक्षाचे
म्हणणे खंडण करण्याची कला वक्तृतव स्पर्धेतून चांगल्या प्रकारे निर्माण होते. असे ते म्हणाले.
रामचंद्र दरे म्हणाले की, बापूसाहेब भापकरांनी संस्थेच्या अनेक पदावर काम करताना बहुजन
समाजासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक योगदान दिले. तसेच वकिली करत असताना
समाजातील दीनदुबळयांना न्याय देताना निःस्वार्थ भावनेने वकिली व्यवसाय केला
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव जयंत वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना बापूसाहेब भापकर
यांनी संस्थेसाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण
पिढीने घेणे गरजेचे आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा ही एक प्रकारे विद्यार्थ्यांना बौध्दिक मेजवानी
असल्याचे प्रतिपादन केले. स्वागत प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. रामेश्वर
दुसुंगे यांनी गत स्पर्धेचा आढावा घेवून स्पर्धेचा आलेख यशस्वीरित्या उंचावत असल्याचा
उल्लेख केला. सुरुवातीला बापूसाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पाहुण्यांची ओळख प्रा. अतुल म्हस्के यांनी करुन दिली. सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे-कांडेकर यांनी
केले तर आभार प्रा. ए.एस. घुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविदयालयाचे अधिक्षक हेमा कदम,
प्रा. अनुराधा मते, प्रा. डि. बी. मोरे, प्रा. आर. डी. भवाळ आदींनी परिश्रम घेतले