डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.
नगर – येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे यांच्या हस्ते झाले. सदर प्रसंगी कविवर्य चंद्रकांत पालवे, साहित्य परिषदेचे
विभागीय कार्यवाह व शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर, रोटरीचे दिपक गुजराथी, स्नेहालय परिवाराचे प्रविण कदम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया, प्रशांत
गायकवाड, महेश सुर्यवंशी उपस्थित होते. सुरूवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत केले व पुस्तकाची भुमिका मांडली. त्या म्हणाल्या कि रोटरी व स्नेहालय
परिवाराच्या वतीने जिल्हाभर अनेक ग्रामपंचायत, विद्यालय, महाविद्यालयातुन बालविवाह मुक्त अ.नगर ही मोहिम राबविण्यात आली. त्यावेळेस लोकशिक्षण व जनजागृतीसाठी सदर नाटिका मी लिहिली. जिल्हाभरात
त्याचे चौकाचौकातुन सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रयोग झाले. आकाशवाणी वरूनही ती प्रसारीत झाली. परंतु
पुस्तकाच्या रूपाने ती आज प्रकाशीत होत आहे. आज आदरणीय सरोजनी नायडू यांची १४६ वी जयंती आहे. हा
दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर
होत्या तसेच त्या कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या ही होत्या. त्यामुळे बालविवाहाची क्रुर प्रथा नष्ट करण्यासाठी
सदर नाटिकेचे प्रकाशन त्यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे ही आनंदाची बाब आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे म्हणाले की, सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची
प्रेरणा देणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे. बालविवाह हा समाजासाठी कलंक असुन आज ही भारतात ४०% पेक्षा
जास्त बालविवाह होतात ही चिंतेची बाब आहे. शासन व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन हा कलंक पुसला
पाहिजे. लोकशिक्षण व समाजजागृतीसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. लवकरच अहिल्यानगर तसेच
भारत बालविवाहमुक्त व्हावा अशी आशा मी बाळगतो. चंद्रकांत पालवे म्हणाले की, मी सुधाताईंना गेल्या
४० वर्षापासुन ओळखतो. समर्पित होऊन कार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. आधी केले मग सांगितले हा त्यांचा
स्वभाव आहे. म्हणूनच सदर पुस्तकातील नाटिकेचे ३०० पेक्षा जास्त ठिकाणी प्रयोग झाले व आता ती पुस्तक रूपाने येत आहे. नाटिकेतील भाव मनाला भिडतात, चिंतन करायला लावतात. आणि त्यामुळे यातुनच परिवर्तन होण्याची
अपेक्षा आहे. यंत येलूलकर म्हणाले कि, नाटिका अत्यंत सोप्या शब्दात, सहज बोलया भाषेत, सर्वांना समजेल अशा
छोटया छोटया वायात प्रस्तुत झाली आहे. त्यामुळे शाळकरी मुलामुलींनाही ती समजणार आहे. आता योग्य वेळी
विवाह होण्याच्या दृष्टीने घराघरातुनही संस्कार व्हायला हवेत मी डॉ. सुधाताईंचे अभिनंदन करतो.
स्नेहालय परिवारातील प्रविण कदम म्हणाले की मी स्वत: सदर नाटिकेचे दिग्दर्शन केले असुन आमच्या
टिमने त्याचे जिल्ह्यातील कानाकोपर्यातुन सादरीकरण केले आहे. शाळा शाळातुन जेव्हा आम्ही सादरीकरण
करत होतो तेंव्हा तेथील मुल मुली ही उत्साहाने सहभागी होत होते. गांवागांवातुन त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
बालविवाहामुळे होणारे बालमृत्यू तसेच मातामृत्यू प्रमाण थांबविण्यासाठी, तसेच कोमल वयात होणारे अत्याचार
रोखण्यासाठी बालविवाह थांबलेच पाहिजेत. त्यासाठी ही नाटिका नक्कीच उपयोगी ठरते. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले व म्हणाले की सदर पुस्तिका शाळेच्या लायब्ररीसाठी व या क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांसाठी मोफत देण्यात येईल