डॉ.प्रशांत पटारे यांचे प्रतिपादन; डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे र्हिदम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
नगर – शालेय जीवनात स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या
कला-गुणांना वाव देणारे पहिले व्यासपीठ असते. त्यांच्या
कलागुणांचा चा विकास झाल्यास पुढे करिअरची दिशा ठरते.
ही दिशा योग्य ठरवण्यासाठी महाविद्यालयामधील संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांचा
आत्मविश्वास वाढवून जीवन घडविते. सेवा शिक्षण मंडळाने खुप मोठी संस्काराची
शिदोरी प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिल्याने कला, क्रिडा,
सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच स्पर्धा परिक्षांसह १०० टक्के निकाल विद्यालयाचे लागले.
राज्य, राष्ट्रीय पातळीवर या शाळेने नाव उंचावले असे प्रतिपादन अस्थिरोग तज्ञ डॉ.
प्रशांत पटारे यांनी केले.
अहिल्यानगर येथील वसंत टेकडी जवळील डॉ.ना.ज. पाउलबुधे कॉलेज ऑफ
फॉर्मसीचे फार्मा र्हिदम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत पटारे, नेत्रतज्ञ डॉ.स्मिता पटारे सेवा शिक्षण
प्रसारक मंडळाचे रामभाऊ बुचकूल, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे, राघुनाथ
कारमपूरी, संजय पवार, साई पाऊलबुधे, डॉ.श्रध्दा पाऊलबुधे संकुलाच्या प्रमुख डॉ.
रेखाराणी खुराणा, एम.फार्मचे समन्वयक डॉ.वेणू कोला संकुलातील सर्व विद्यालय,
महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
डॉ.पटारे यांनी आपल्या भाषणातून कॉलेजच्या जुन्या अभ्यासक्रमाचा व नवीन
अभ्यासक्रमांमधील फरक स्पष्ट केला. तंत्रज्ञान युगात सोशल मिडीयात तरुण जास्त रमतात.
त्याचा योग्य तो वापर करुन स्वत:ला स्ट्राँग ठेवून आपण पुढे कसे जाऊ हा विचार
करावा. नवीन जनरेशला प्रगतीसाठी वेळ चांगली आहे. या फार्मसी क्षेत्रात नोकर्यांबरोबरच
व्यवसायाला खुप चांगल्या संधी आहेत असे सांगितले.
डॉ.स्मिता पटारे यांनी सेवा शिक्षण प्रसारक मंडळ
विद्यार्थ्यांसाठी एक संस्कार केंद्रच आहे. या माध्यमातून
सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना चांगले शिक्षण सोयी-सुविधा
देत असल्याने विद्यार्थी सक्षम बनतात. डॉ.नाथ सरांचे स्वप्न खर्या अर्थाने विद्यार्थी,
शिक्षक हे पुर्ण करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बी. फॉर्मसी कॉलेजचा वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ.श्याम
पंगा यांनी केले तर डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी वर्षभर राबविलेले
विविध उपक्रम, स्पर्धा, उत्सवांमधील विद्यार्थ्यांनी घडविलेले सांस्कृतिक कलेचे दर्शन,
क्रिडा स्पर्धेतील यशाचा अहवालात माहिती दिली.उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
पारितोषिक वितरण करण्यात आले.
फार्मा र्हिदम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरी ढवळे,
प्रियंका कर्डिले, खेळ विभाग प्रमुख मिलिंद क्षीरसागर, पल्लवी अडागळे सांस्कृतिक
विभागाचे सुधीर गर्जे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम
घेतले.
फार्मा र्हिदम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय
पाऊलबुधे यांनी सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोशनी सूर्यवंशी यांनी केले तर आभार सुवर्णा येमुल यांनी मानले.